Prashant Publications

My Account

मूलभूत शैक्षणिक आणि प्रायोगिक मानसशास्त्र

Basic Educational and Experimental Psychology

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403246
Marathi Title: Mulbhut Shaikshanik Ani Prayogik Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 536
Edition: First

575.00

  • DESCRIPTION
  • INDEX

शिक्षणशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय; किंबहुना शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक समाजशास्त्र हे खरेतर शिक्षणशास्त्राचे आधार विषय. प्रस्तुत ग्रंथात मानसशास्त्राचे विविध अर्थ व स्वरुप, मानसशास्त्रातील विविध संप्रदाय, मानवी वर्तनाचे प्रकार – सहजप्रवृत्त वर्तन, संपादित वर्तन, काही सामान्य प्रवृत्ती; अनुवंश व परिस्थिती, व्यक्तिविकास, नैतिक विकास, व्यक्तिमत्त्व, मानसिक आरोग्य, समूह मानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया, मेंदू आधारित अध्ययन, ज्ञानरचनावाद व अध्ययन, स्मरण आणि विस्मरण, विचार-प्रक्रिया, बुद्धिमत्ता व बुद्धिमापन, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बालगुन्हेगारी, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण, अध्यापनाचे व अध्यापकाचे मानसशास्त्र या घटकांचे सविस्तर विवेचन दिलेले असून प्रस्तुत ग्रंथ हा शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास, प्राध्यापकास, एम.पी.एस.सी. किंवा सेट-नेट करणाऱ्या उमेदवारास व शिक्षण क्षेत्रात अधिकारपदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

Mulbhut Shaikshanik Ani Prayogik Manasshastra

  1. मानसशास्त्र : अर्थ व स्वरुप : मानसशास्त्राचे स्वरूप; मानसशास्त्राच्या विविध शाखा : 1) शारीरिक मानसशास्त्र, 2) प्राणी मानसशास्त्र, 3) सामाजिक मानसशास्त्र, 4) अपसामान्यांचे मानसशास्त्र, 5) बालमानसशास्त्र, 6) व्यक्तिभिन्नतांचे मानसशास्त्र, 7) औद्योगिक मानसशास्त्र, 8) चिकित्सा मानसशास्त्र, 9) गुन्हेगारीचे मानसशास्त्र, 10) शैक्षणिक मानसशास्त्र; शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप : शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, शैक्षणिक मानसशास्त्राचे उपयोजन; स्वाध्याय.
  2. मानसशास्त्रातील विविध संप्रदाय : रचनावाद : रचनावादाचे योगदान; कार्यवाद : कार्यवादाची मानसशास्त्रास योगदान; वर्तनवाद : वर्तनवादाची ठळक वैशिष्ट्ये, वर्तनवादाची चिकित्सा; मनोविश्लेषणशास्त्र : फ्राईडचा बोध, अबोध सिद्धांत, आल्फ्रेड ॲडलरचा दृष्टिकोन, विकासावस्था, मनोविश्लेषणशास्त्राचे मानसशास्त्राला व शिक्षणशास्त्राला योगदान; हेतूवाद : हेतुवादाची चिकित्सा, सहजाभिनिवेश उपपत्ती, समष्टिवाद, दृक्‌‍ अवबोधन, मर्मदृष्टी; स्वाध्याय.
  3. मानवी वर्तन – सहजप्रवृत्त वर्तन : वर्तन म्हणजे काय?; वर्तनप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक : 1) सहजप्रवृत्ती : सहजप्रवृत्तीची वैशिष्ट्ये, विविध सहजप्रवृत्ती व वर्तन, सहजप्रवृत्ती व त्यानुषंगाने होणारे वर्तन, सहजप्रवृत्ती व आनुषंगिक उदात्त वर्तन, सहजप्रवृत्तींचे उदात्तीकरण, सहजप्रवृत्तीवरील आक्षेप, मानवी वर्तन प्रेरणा, नवा दृष्टिकोन, प्रेरक शक्तीचे वर्गीकरण, शारीरिक गरजा, वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अबोध प्रेरणा; स्वाध्याय.
  4. मानवी वर्तन – संपादित वर्तन : संपादित वर्तन किंवा अर्जित वर्तन, 1) सवय : सवय कशी लागते, सवयी कशा लावाव्यात, चुकीच्या सवयी कशा घालवाव्यात. 2) कौशल्य : कौशल्य संपादन कसे केले जाते., कौशल्य संपादनासाठी आवश्यक घटक. 3) भावना : भावनांची वैशिष्ट्ये, भावनांचे शैक्षणिक महत्त्व 4) स्थिरभाव : स्थिरभावाची वैशिष्ट्ये, स्थिरभावांचे शैक्षणिक महत्त्व 5) गंड : गंडाची वैशिष्ट्ये 6) वृत्ती : वृत्तीचे शैक्षणिक महत्त्व 7) इच्छाशक्ती : इच्छाशक्तीची वैशिष्ट्ये, इच्छाशक्तीचे शैक्षणिक महत्त्व, स्वाध्याय.
  5. मानवी वर्तन – काही सामान्य प्रवृत्ती : 1) सूचना : सूचना प्रकार, सूचना प्रवृत्तीवर परिणाम करणारे घटक, सूचनेचे शैक्षणिक महत्त्व 2) सहानुभूती : सहानुभूती निर्मितीमधील विविध अवस्था, सहानुभूतीचे प्रकार, शैक्षणिक महत्त्व 3) अनुकरण : अनुकरणाचे वर्गीकरण, अनुकरणाचे शैक्षणिक महत्त्व 4) क्रीडन प्रवृत्ती किंवा क्रीडा : क्रिडेविषयीच्या उपपत्ती : 1) फाजील उर्जा उपपत्ती 2) मनोरंजन उपपत्ती 3) पूर्वतयारी उपपत्ती 4) संक्षेपावर्तन किंवा संकलन उपपत्ती 5) नि:स्सारण उपपत्ती, क्रीडा व काम, क्रीडन प्रवृत्तीचे शैक्षणिक महत्त्व, स्वाध्याय.
  6. अनुवंश व परिस्थिती : अनुवंश म्हणजे काय?, मानवी जनन प्रक्रिया, नवीन जीवाची लिंगनिश्चिती, जुळी मुले कशी होतात?; अनुवंशासंबंधीचे नियम : 1) समानतेचा नियम 2) गुणधर्म बदलाचा नियम 3) परागामित्त्वाचा नियम; अनुवंशाचे महत्त्व, परिस्थिती, आंतरिक परिस्थिती, बाह्य परिस्थिती, जन्मपूर्व परिस्थिती, जन्मोत्तर परिस्थिती, अनुवंश व परिस्थिती; स्वाध्याय.
  7. व्यक्तिविकास : वाढ व विकास, विकासप्रक्रियेची वैशिष्ट्ये; बालकाच्या विकासावस्था : 1) शैशवावस्था : शारीरिक विकास, कारक विकास, मानसिक विकास अ) बौद्धिक विकास ब) भावनिक विकास क) सामाजिक विकास 2) बाल्यावस्था : शारीरिक विकास, कारक विकास, मानसिक विकास अ) बौद्धिक विकास ब) भावनिक व सामाजिक विकास, शैक्षणिक महत्त्व 3) कौमार्यावस्था : शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक महत्त्व, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, शाळा; वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक : 1) अनुवंश 2) परिपक्वता 3) प्रशिक्षण; शैक्षणिक महत्त्व, बौद्धिक विकास व जीन पियाजे, जीन पियाजेच्या उपपत्तीचे गुणदोष; स्वाध्याय.
  8. नैतिक विकास : नीती म्हणजे काय? – नैतिक विकास, 1. पियाजेची उपपत्ती 2. कोहलबर्गची उपपत्ती 3. फ्राईडची उपपत्ती, नैतिक विकासाचे पैलू – शिक्षणामध्ये नैतिक विकासाचे महत्त्व, नैतिक विकासात येणारे अडथळे, नैतिक विकासात शिक्षकाची भूमिका, स्वाध्याय.
  9. व्यक्तिमत्त्व : व्यक्तिमत्त्व : व्याख्या व स्वरूप; व्यक्तिमत्त्वाचे उपागम : वर्गतत्त्व उपागम, गुणतत्त्व उपागम, विरचनावादी उपागम, व्यक्तिमत्त्वविषयक उपपत्ती, अल्पोर्टची उपपत्ती, कॅरेलची उपपत्ती, फ्रॉईडची उपपत्ती, व्यक्तिमत्त्व मापन, लक्षण उपागम, समष्टि उपागम, प्रक्षेपण उपागम, व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक, जैविक घटक, अंतस्त्राव, कार्यक्षमता व बुद्धिमत्ता, कुटूंब, शेजारी, शाळा, समाज व संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, प्रसार माध्यमे, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने शिक्षणाची भूमिका; स्वाध्याय.
  10. मानसिक आरोग्य : मानसिक आरोग्यशास्त्र म्हणजे काय?, मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न व्यक्तीची लक्षणे; मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक : आनुवांशिक घटक, परिस्थितीजन्य घटक, समायोजन व विषमायोजन; मानसिक संघर्ष : संघर्षाचे प्रकार, संघर्षाची सर्वसामान्य कारणे; वैफल्य : वैफल्याचे परिणाम, शिक्षकाचे मानसिक आरोग्य चांगले न राहण्याची कारणे, शिक्षकाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी उपाय, विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले रहावे यासाठी उपाय; स्वाध्याय.
  11. समूह मानसशास्त्र : मानसशास्त्रीय समूह, मानसशास्त्रीय समूहाची वैशिष्ट्ये, समूहमन व समूहवर्तन; समूहाचे प्रकार : 1) जमाव : जमाव वर्तनाची वैशिष्ट्ये 2) संहती किंवा मंडळ 3) समाज किंवा जमात : शाळा एक समूह, समूह गतिशीलता, वर्गसमूह, नेतृत्त्व म्हणजे काय?, नेतृत्त्वाची कार्ये, नेतृत्त्वासाठी आवश्यक गुण, नेतृत्त्वाचे प्रकार, नेतृत्त्व प्रशिक्षण; स्वाध्याय.
  12. अध्ययन प्रक्रिया : अध्ययन अर्थ, व्याख्या; स्वरूप : अध्ययन वक्र, पठारावस्था निर्माण होण्याची कारणे, शारिरीक व मानसिक परिसीमा; अध्ययनवक्राचे शैक्षणिक महत्त्व, अध्ययनविषयक उपपत्ती; थॉर्नडाईकची प्रयत्नप्रमाद उपपत्ती, थॉर्नडाकच्या उपपत्तीचे स्वरूप, थॉर्नडाइकचे अध्ययनविषयक नियम, अध्ययनविषयक नियमांचे शैक्षणिक महत्त्व, उपपत्तीच्या मर्यादा; वॉटसनची वर्तनवादी उपपत्ती, वॉटसनच्या उपपत्तीचे महत्त्व व मर्यादा; पाव्हलॉव्हची अभिजात अभिसंधान उपपत्ती, उपपत्तीचे स्वरूप, मर्यादा; स्किनरची साधन अभिसंधान उपपत्ती, गुथ्रीची उपपत्ती, अभिसंधान उपपत्तींचे शैक्षणिक महत्त्व, समष्टिवादी उपपत्ती, समष्टिवाद्यांचे अध्ययनविषयक नियम, शैक्षणिक महत्त्व; गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, अध्ययनाचे विविध स्तर; बु्रनरची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती, ब्रुनरची अनुदेशन उपपत्ती; आसुबेलची अर्थपूर्व अध्ययन व अनुदेशन उपपत्ती; डॉ.ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती; बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती; कार्लरॉजर्सची अध्ययन उपपत्ती; अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, परिस्थितीजन्य घटक, आंतरिक घटक, प्रेरणा, पक्वता, अवधान व अभिरूची, प्रलोभने, पारितोषिके व शिक्षा, प्रशंसा व निंदा, यश व अपयश, थकवा व कंटाळा, उत्तेजक पेये, अध्ययन संक्रमण; थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती; जड्डची सामान्यीकरण उपपत्ती; बॅग्लेची उपपत्ती; अध्ययन संक्रमण होण्यासाठी आवश्यक घटक, शैक्षणिक महत्त्व; स्वाध्याय.
  13. मेंदू आधारित अध्ययन : मेंदू आधारित अध्ययन, व्याख्या व स्वरूप; मेंदूची वैशिष्ट्ये, तीन आवश्यक बाबी : 1) चिंतामुक्त कार्यदक्षता 2) क्षमतावृंद कार्यमग्नता 3) कृतिशील प्रक्रिया; मेंदूआधारित अध्ययनाची तत्त्वे, मेंदूआधारित शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका, अध्ययनाशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबी; स्वाध्याय.
  14. ज्ञानरचनावाद व अध्ययन : जीन पियाजे, जेरोम बु्रनर; अध्ययनाचे तीन मार्ग : 1) कृतियुक्त मार्ग 2) प्रतिमात्मक मार्ग 3) प्रतिकात्मक मार्ग; वायगॉटस्कीची उपपत्ती, वायगॉटस्कीची ‌‘विकासानजीकचा अवकाश संकल्पना’; ज्ञानरचनावादाच्या व्याख्या, ज्ञानरचनावादाचे प्रकार : 1) मूलगामी ज्ञानरचनावाद 2) बोधात्मक ज्ञानरचनावाद 3) सामाजिक ज्ञानरचनावाद; ज्ञानरचनावादाची गृहितके, ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये, ज्ञानरचनावादाचा उपयोग करुन अध्यापन करण्यासाठी शिक्षकांसाठी (5ए) पंचसूत्री; स्वाध्याय.
  15. स्मरण आणि विस्मरण : स्मरण म्हणजे काय? : 1) अनुभव ग्रहण, ग्रहणावर परिणाम करणारे घटक, अनुभवाचे स्वरूप, व्यक्तीची मनोघडण, अध्ययनपद्धती 2) धारणा : धारणेवर परिणाम करणारे घटक, धारणेचे मापन 3) आठवण : प्रत्यावाहनावर परिणाम करणारे घटक, शैक्षणिक महत्त्व, विस्मरण, विस्मरणाचे स्वरूप, विस्मरणाची कारणे; निरोधन : 1) पुरोगामी निरोधन 2) प्रतिगामी निरोधन; दमन, शैक्षणिक महत्त्व, यांत्रिक स्मृती, तार्किक स्मृती, चांगले स्मरण होण्यासाठी घ्यावयाची काळजी, अनुभवांचे पुरश्चरण; स्वाध्याय.
  16. विचार-प्रक्रिया (1) : संवेदन, संवेदनाचे वर्गीकरण, अवबोध, अवबोधासंबंधी समष्टिवादी दृष्टिकोन, आकृती व पार्श्वभूमी, अवबोधन प्रक्रिया, अवबोधनातील विविध रचना, इंद्रियभ्रम व चित्तभ्रम, अपबोध होण्याची कारणे, चित्तभ्रम, शैक्षणिक उपयोजन संबोध निर्मिती, शैक्षणिक महत्त्व; स्वाध्याय.
  17. विचार-प्रक्रिया (2) : विचार म्हणजे काय? विचारप्रक्रियेचे प्रमुख स्तर, प्रतिमाबोधन, प्रतिमाबोधनाचे शैक्षणिक महत्त्व, विचारप्रक्रियेची विविध अंगे, अनुमानन, चिकित्सक विचार, निर्णायक विचार; कूट : उकलन, कूट उकलन क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, कूट उकलनास सहाय्यक घटक, कूट उकलनातील अडथळे, विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व, कल्पना, अनुकरणात्मक, सर्जनात्मक, कल्पनांचे साहचर्य, कल्पनाशक्तींचे शैक्षणिक महत्त्व, निर्णायकता (सर्जनशीलता), निर्णायकतेचे घटक, निर्णायकतेच्या विकासासाठी प्रोत्साहन देणारी तत्त्वे, निर्णायकतेबाबत भारतात झालेले संशोधन; स्वाध्याय.
  18. बुद्धिमत्ता व बुद्धिमापन : बुद्धिमत्तेचे स्वरूप, बुद्धिमत्तेच्या व्याख्या; बुद्धिमत्तेविषयीच्या विविध उपपत्ती; स्पिअरमनची द्विघटक उपपत्ती, थॉमसनची समूह घटक उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती, गिलफर्डची उपपत्ती, गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती; बुद्धिमापन, शारीरिक स्वरूपावरुन बुद्धिमापन, वेदन भेदाभेदन क्षमतेवर आधारित कसोट्या, कारक कसोट्या, मन:शाखावर आधारित कसोट्या; आल्फ्रेड बीनेच्या बुद्धिमापन कसोट्या, बीने सायमन परिमाण श्रेणी, बीनेच्या परिमाण श्रेणीचे गुणदोष, टर्मन स्टॅनफोर्ड, बीने कसोटी, डॉ. कामत यांची बुद्धिमापन कसोटी; मानसिक वय व बुध्यंक, बुद्धिमत्तेचा विकास व वैशिष्ट्ये, बुद्धिमत्तेचा ऱ्हास, बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्तेचे वितरण व अन्वय, बुद्धिमापनाच्या विविध कसोट्या, वैयक्तिक मौखिक शाब्दिक कसोट्या, शाब्दिक लेखी कसोट्या, अशाब्दिक पेपर, पेन्सिल कसोट्या (वैयक्तिक व सामूहिक), अशाब्दिक कृती कसोट्या, (वैयक्तिक), वैयक्तिक व सामूहिक कसोट्या, बुद्धिमापनाचे उपयोग, बुद्धिमापनक्षेत्रात भारतात झालेले संशोधन; स्वाध्याय.
  19. भावनिक बुद्धिमत्ता : भावनिक बुद्धिमत्ता, अर्थ व स्वरूप; भावनिक बुद्धिमत्तेचे घटक: 1) आत्मप्रचिती 2) आत्मनियमन 3) प्रेरणा 4) समानानुभूती 5) सामाजिक कौशल्ये; भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्तीची लक्षणे, बोधात्मक बुद्धिमत्ता व भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्तेचा विकास, भावनिक बुद्धिमत्तेचे मापन; स्वाध्याय.
  20. सामाजिक बुद्धिमत्ता : सामाजिक बुद्धिमत्ता; अर्थ व स्वरूप : अ) सामाजिक जाणीव – 1) समानानुभूती 2) समरसता 3) समानानुभूतितील अचूकता 4) सामाजिक बोधन; ब) सामाजिक सौन्दर्य – 1) सुसंवाद 2) आत्माविष्कार/आत्मप्रकटीकरण/आत्मसादरीकरण 3) प्रभाग 4) आस्था/जिव्हाळा; सामाजिक बुद्धिमत्तेचे शैक्षणिक महत्त्व; स्वाध्याय.
  21. बालगुन्हेगारी : बालगुन्हेगारीची कारणे, बालगुन्हेगारीचे स्वरूप व प्रकार, शाळेमध्ये आढळून येणारे गुन्हेगारी वर्तन, बालगुन्हेगारीसंबंधित प्रतिबंधक उपाय, शाळेच्या माध्यमातून घ्यायची दक्षता, शिक्षकाने घ्यावयाची दक्षता; स्वाध्याय.
  22. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण : 1) अंध विद्यार्थी 2) कर्णबधीर मुलांचे शिक्षण 3) वाचादोष असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण 4) शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांचे शिक्षण 5) मतिमंद विद्यार्थ्यांचे शिक्षण 6) अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांचे शिक्षण; अध्ययन अकार्यक्षमता व भाषिक विकास, अध्ययन कार्यक्षमता व वाचनकौशल्य, अंकगणित व अध्ययन अकार्यक्षमता, अध्ययन अकार्यक्षम मुलांसाठी शिक्षकाने करावयाचे प्रयत्न; स्वाध्याय.
  23. अध्यापनाचे व अध्यापकाचे मानसशास्त्र : अध्यापन म्हणजे काय?, अध्यापनविषयक उपपत्ती, अध्यापन उपपत्तींची आवश्यकता; अध्यापन उपपत्तींचे वर्गीकरण : औपचारिक अध्यापन उपपत्ती, वर्णनात्मक अध्यापन उपपत्ती, सामान्य अध्यापन उपपत्ती, अध्यापन उपपत्ती व अध्यापन उपपत्ती; अध्यापकाचे मानसशास्त्र, शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, शिक्षकाचे वर्गातील अध्यापनवर्तन, फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणातील वर्तनप्रकारांची वर्गवारी; निरीक्षण उपपत्ती, निरीक्षण आव्यूव्हाचा अन्वय, फ्लेंडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचे फायदे, विश्लेषणाच्या मर्यादा, शाब्दिक आंतरक्रिया वर्गप्रणाली; अध्यापनाची प्रतिमाने, अध्यापन प्रतिमानांची ठळक वैशिष्ट्ये, अध्यापन प्रतिमानातील गृहीतके; अध्यापन प्रतिमानांचे मुलभूत घटक : 1) उद्देशबिंदू 2) संरचना 3) सामाजिक प्रणाली 4) सहाय्यभूत प्रणाली; स्वाध्याय.
RELATED PRODUCTS
You're viewing: मूलभूत शैक्षणिक आणि प्रायोगिक मानसशास्त्र 575.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close