- DESCRIPTION
- INDEX
लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.
– डॉ. अक्षय घोरपडे
Lokrangbhumi
- लोकरंगभूमी : संकल्पना व स्वरूप : 1.1 लोकरंगभूमी : संकल्पना, 1.2 लोकरंगभूमी : स्वरूप व वैशिष्ट्ये, 1.2.1 स्वरूप, 1.2.2 वैशिष्ट्ये, 1.3 लोकसाहित्य व लोकरंगभूमी परस्परसंबंध
- लोकरंगभूमी : पारंपरिक रूपे : 2.1 कीर्तन : भूमिका, स्वरूप, प्रकार व वैशिष्ट्ये, 2.1.1 भूमिका, 2.1.2 स्वरूप, 2.1.3 व्याख्या, 2.1.4 प्रकार, 2.1.5 वैशिष्ट्ये, 2.1.6 कीर्तनासाठी कीर्तनकाराकडे आवश्यक गुणवैशिष्ट्ये, 2.2 भारूड : भूमिका, स्वरूप, प्रकार व वैशिष्ट्ये, 2.2.1 भूमिका, 2.2.2 स्वरूप, 2.2.3 प्रकार, 2.2.4 वैशिष्ट्ये, 2.2.5 घटक
- लोकरंगभूमी : प्रादेशिक रूपे : 3.1 वही (खान्देशी) : स्वरूप व वैशिष्ट्ये, 3.1.1 स्वरूप, 3.1.2 वैशिष्ट्ये, 3.2 दशावतार (कोकणी) : स्वरूप व वैशिष्ट्ये, 3.2.1 स्वरूप, 3.2.2 वैशिष्ट्ये
- लोकरंगभूमी : पारंपरिक व आधुनिक रूपे : 4.1 लोकनाट्य : भूमिका, स्वरूप व वैशिष्ट्ये, 4.1.1 भूमिका, 4.1.2 स्वरूप, 4.1.3 वैशिष्ट्ये, 4.2 तमाशा : भूमिका, स्वरूप व वैशिष्ट्ये, 4.2.1 भूमिका, 4.2.2 स्वरूप, 4.2.3 प्रकार
- लोकरंगभूमी : पारंपरिक व आधुनिक रूपे : 5.1 सत्यशोधकी जलसे : भूमिका, स्वरूप व वैशिष्ट्ये, 5.1.1 सत्यशोधकी जलस्याचे घटक, 5.1.2 वैशिष्ट्ये, 5.2 आंबेडकरी जलसा, 5.2.1 आंबेडकरी जलसा : व्याख्या, स्वरूप आणि प्रेरणा, 5.2.2 वैशिष्ट्ये
- लोकरंगभूमी : पारंपरिक व आधुनिक रूपे : 6.1. पथनाट्य : भूमिका, स्वरूप व वैशिष्ट्ये, 6.1.1 स्वरूप, 6.1.2 आधुनिक पथनाट्याचे स्वरूप, 6.1.3 आधुनिक पथनाट्याची वैशिष्ट्ये, 6.2 रिंगणनाट्य, 6.2.1 स्वरूप, 6.2.2 वैशिष्ट्ये