लोकसंख्या भूगोल
Population Geography
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भारतातील तसेच जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडील काळात लोकसंख्या वाढ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या हा घटक कोणत्याही देशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असतो. कारण देशाचे आकारमान, वैशिष्ट्ये, विभाजन, रचना, राहणीमान, प्रगती, विकास, सामाजिक रचना हे घटक लोकसंख्येमुळे प्रभावित होत असतात.
प्रस्तुत पुस्तकात भारताची जनगणना, लोकसंख्येच्या सर्वेक्षणाच्या पद्धती, लोकसंख्याविषयक मिळालेल्या आकडेवारीचे सादरीकरण, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक, स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा, वयोगट रचना, व्यवसाय संरचना, अवलंबता गुणोत्तर, दीर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या विषयक समस्या, लोकसंख्या धोरणे, मानव विकास निर्देशांक, आरोग्य निर्देशांक तसेच नागरीकरण व त्यासंबंधित समस्या इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.
Loksankhya Bhugol
- लोकसंख्या भूगोलाची ओळख : 1.1 लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.2 लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व, 1.3 लोकसंख्या भूगोलाचा इतर शास्त्रांची असणारा संबंध
- लोकसंख्या सामग्री आणि सादरीकरण : 2.1 जनगणना, 2.2 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, नमुना नोंदणी सर्वेक्षण, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण, जिल्हास्तरीय घरगुती सर्वेक्षण, 2.3 लोकसंख्या सामग्रीचे सादरीकरण, नकाशे, आलेख, संगणकाचा वापर
- लोकसंख्यावाढ आणि लोकसंख्या शास्त्रीय गुणधर्म : 3.1 लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक, 3.2 जनन आणि मर्त्यता : संकल्पना आणि मापण, 3.3 स्थलांतर – संकल्पना, कारणे व प्रकार
- लोकसंख्या रचना : 4.1 वय लिंग मनोरा/लोकसंख्या मनोरा, वयोरचना, 4.2 व्यवसाय रचना, अवलंबता भार/गुणोत्तर, 4.3 दिर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान
- लोकसंख्येच्या संकल्पना व सिद्धांत : 5.1 अतिरिक्त लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या, न्यूनतम लोकसंख्या, 5.2 माल्थसचा सिद्धांत, 5.3 मार्क्सचा लोकसंख्या सिद्धांत
- लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्येचे धोरणे : 6.1 भारतातील लोकसंख्येच्या समस्या, 6.2 विकसित देशातील लोकसंख्येच्या समस्या, 6.3 लोकसंख्याविषयक धोरणे : भारत आणि चीन
- लोकसंख्या एक साधनसंपत्ती आणि समकालीन घडामोडी : 7.1 भारतातील आरोग्याचे सूचक, 7.2 लोकसंख्या एक सामाजिक भांडवल, 7.3 मानवी विकास निर्देशांक
- नागरीकरण : 8.1 नागरीकरणाची संकल्पना, 8.2 भारतातील नागरीकरणाचा इतिहास, जागतिक नागरीकरणाचा कल, 8.3 भारतातील नागरीकरणाच्या समस्या