वर्णनात्मक भाषा विज्ञान
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाने समाजासाठी संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी लोकांची, लोकांच्या माध्यमातून केलेली एक व्यवस्था आहे, तशी ती मानवेतर प्राण्यांपेक्षा मानवाची एक स्वतंत्र नवनिर्मिती आहे. भाषेशिवाय माणूस ही कल्पनाच करता येणार नाही. भाषा आहे म्हणून माणूस आपले विचार, भावना, कल्पना, संवेदना आणि संदेश मांडतो, स्पष्ट करतो. विचार ही एक मानवी अवस्था असली तरी ती प्रकट करण्याचे समर्थ माध्यम भाषा आहे. विचार जिथे सुरू होतात तिथे भाषेचीही सुरूवात होते. भाषा आणि विचार हे परस्पर निगडित आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचे सवंर्धन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचे व समाजाचे अस्तित्व आणि विकासाचे सातत्य टिकवून ठेवण्याचे अविरत कार्य भाषेतूनच होत असल्याने भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य असे अंग आहे. शब्द, वाक्य आणि अर्थ संकल्पना उलगडण्याची एक शास्त्रीय दृष्टी असलेली कला म्हणजे भाषा शास्त्र आहे.
Varnanatamk Bhasha Vidnyan
- भाषा-स्वरूप-कार्य व अभ्यास पध्दती : 1.1 भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये व कार्ये, 1.1.1 प्रास्ताविक, 1.1.2 भाषेचे स्वरूप, 1.1.3 भाषेचे वैशिष्टये, 1.1.4 भाषेची कार्ये, 1.1.5 भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र, 1.1.6 भाषाविज्ञान व्याख्या, 1.2 भाषेची संदेशन प्रक्रिया, 1.2.1 मानवातील संदेशन प्रक्रिया, 1.2.2 मानवेतर प्राण्यातील संदेशन, 1.3 भाषेची आणि भाषाभ्यासाची अंगे, 1.4 भाषा अभ्यासाचे महत्व व पध्दती परिचय.
- स्वनविचार : 2.1 स्वनविज्ञान : संकल्पना व स्वरूप, 2.2 स्वननिर्मितीची प्रक्रिया, 2.3 वागेंद्रियाची रचना व कार्य, 2.4 स्वरयंत्राची रचना, 2.5 स्वनांचे वर्गीकरण, 2.5.1 स्वरांचे प्रकार, 2.5.2 उच्चारण स्थानावर आधारीत स्वनांचे वर्गीकरण, 2.5.3 प्रयत्नावर आधारीत स्वनांचे वर्गीकरण, 2.6 स्वन-स्वनिम-स्वनांतर संकल्पना, 2.6.1 स्वन म्हणजे काय?, 2.6.2 स्वनांतर.
- स्वनिमविचार : 3.1 स्वन-स्वनिम-स्वनांतर संकल्पना, 3.1.1 स्वनिमांची वैशिष्ट्ये, 3.1.2 स्वनिमांचे प्रकार, 3.1.3 स्वनिम व स्वनांतर यांचे लेखनातील निर्देशन, 3.1.4 स्वनिम विनियोगाचे प्रकार, 3.2 मराठीची स्वनिमव्यवस्था.
- रूपिम विन्यास : 4.1 रूपिम संकल्पना, 4.2 रूपिका-रूपिम-रूपिकांतरे : परस्पर संबंध, 4.3 रूपिमांचे प्रकार, 4.3.1 अर्थानुसार रूपिमांचे वर्गीकरण, 4.4 रूपिम विनियोग, 4.4.1 रूपिम विनियोगाचे प्रकार, 4.5 रूपिकांतराचे प्रकार, 4.6 साधित शब्दांचे प्रकार.
- वाक्य विन्यास : 5.1 वाक्य म्हणजे काय?, 5.2 वाक्यविन्यास संकल्पना, 5.3 प्रथमोपस्थित संघटक पद्धती (वाक्यविश्लेषण व संघटक), 5.4 रचना म्हणजे काय?, 5.5 रचनांचे प्रकार, 5.6 वाक्यांचे विशेष, 5.7 वाक्य विश्लेषण पद्धतीतील उणिवा.
- अर्थविचार : 6.1 अर्थ : स्वरूप व संकल्पना, 6.1.1 अर्थ म्हणजे काय?, 6.1.2 अर्थाचे प्रकार, 6.2 अर्थक्षेत्र संकल्पना, 6.3 अर्थविन्यासातील अर्थाची प्रतिती देणारे महत्त्वपूर्ण घटक, 6.4 अर्थ व रूप यातील संबंध.
- मराठीचे भाषाकुल आणि मराठी भाषेची उत्पत्ती : 7.1 भाषाकुल म्हणजे काय?, 7.2 जागतिक भाषाकुल संकल्पना, 7.3 इंडो-युरोपियन भाषासंकुल, 7.4 भारतातील विविध भाषासंकुल, 7.5 मराठी भाषेची उत्पत्ती, 7.5 मराठीची उत्पत्ती, 7.5.1 मराठी भाषेचा जन्मकाळ निश्चित करणारी साधने, 7.5.2 मराठीची पूर्वापिठीका, 7.5.3 मराठीच्या उत्पत्तीसंदर्भातील डॉ.वैद्य-गुणे वाद, 7.5.4 उत्पत्ती संदर्भातील अभ्यासकांची मते.