वस्ती भूगोल
Settlement Geography
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
वस्ती हा मानवी संस्कृतीचा एक अविष्कार असतो. मानवी गरजा या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे मानवाचे पर्यावरणाशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे असते. वस्ती हा मानव आणि निसर्ग यांच्या क्रिया प्रक्रियांचा एक आलेख असतो. प्रत्येक वस्तीचा आकृतीबंध वेगळा असतो. वस्त्यांचे वितरण वेगवेगळे झालेले असते. त्या सर्व बाबींवर प्राकृतिक घटकांचा परिणाम झालेला असतो. वस्त्यांना प्राकृतिक घटकांमुळे एक विशिष्ट पार्श्वभूमी प्राप्त होते. मानवी संस्कृतीची विविध अंगे वस्तीत प्रतिबिंबित होत असतात. मानवाचा धर्म, मानवाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, सामाजिक पद्धती यांचा ठसा वस्त्यांवर पडलेला असतो. काळाच्या ओघात तंत्रज्ञान, मानवी संस्कृती, विज्ञान यात खूपच प्रगती होऊन याचा प्रभाव वस्त्यांवर होत असतो. वस्त्यांमधील विविध घटक परस्परावलंबी व परिवर्तनशील असतात. त्यांच्यातील संबंधाचे स्वरुप गतीमान असते. या गतीमानतेचा परिणाम वस्त्यांवर होतो. वस्ती व तिचे पर्यावरणाशी असलेले संबंध, वस्त्यांमधील परस्परसंबंध हे वेगवेगळे असून त्यांच्यात स्थलसापेक्षतेबरोबरच कालसापेक्षताही असते. हे सर्व परस्परातील संबंध लक्षात घेतल्याशिवाय वस्तीभूगोलास पूर्णत्व येत नाही.
Vasti Bhugol
- वस्ती भूगोल : वस्ती भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती, नागरी वस्ती भूगोल, ग्रामीण वस्ती भूगोल
- वस्ती – एक मानवी स्थिरता : वस्ती हा मानवाचा स्थिरभाव, वस्त्यांची ऐतिहासिक काळातील वस्तुस्थिती बदल
- ग्रामीण वसाहती : ग्रामीण वसाहतीच्या व्याख्या व वैशिष्ट्ये, ग्रामीण वस्ती भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती
- ग्रामीण वसाहती : आकार, आकृतीबंध : ग्रामीण वसाहतीचे प्रकार, ग्रामीण स्थायी व अस्थायी वसाहती
- ग्रामीण वसाहतीची कार्ये व सुविधा केंद्रे : ग्रामीण वसाहतीची कार्ये, ग्रामीण वसाहतीच्या कार्याची वैशिष्ट्ये.
- गावाची रचना : खेड्यांची भौतिक रचना – अ) खेडयातील रस्त्याचे कार्य, ब) गाव व वाडी
- वस्त्यांचे क्रम : वस्त्यांचे श्रेणी क्रम – अ) घरवस्ती, ब) शेतीवाडी, क) वाडी, ड) खेडे.
- भारतातील घरे व ग्रामीण वस्त्यांचे प्रकार : भारततातील ग्रामीण वस्त्यांचे प्रकार
- ग्रामीण वस्त्यांचे नियोजन : ग्रामीण वस्त्यांचे नियोजन, ग्रामीण भागातील जमीन उपयोगिता
- ग्रामीण व शहरी वसाहती : ग्रामीण व शहरी वसाहतीमधील फरक – 1) समाजाचे आकारमान
- नागरी वस्त्यांचा आकृतिबंध : नागरी वस्त्यांचे विविध आकारबंध – 1) रेषाकृती आकृतिबंध
- शहरे व त्यांची पार्श्वभूमी : पार्श्वभूमी विविधता – 1. रेषात्मक पार्श्वभूमी 2. सीमावर्ती पार्श्वभूमी
- शहरांचा आकार-वितरण : शहरांचा लोकसंख्या विषयक आकार, शहरांच्या क्रमवारीची संकल्पना
- भारतातील शहरांचा विकास व समस्या : भारतातील नगरांचा विकास व प्रमुख कामे
- नागरीकरणाच्या समस्या : 1. नगरांची वाढ व उपनगरांची निर्मिती 2. घनदाट लोकवस्तीमुळे निर्माण झालेल्या समस्या 3. जमिनीच्या किमती 4. शहरातील अति गर्दी 5. वाहतुकीची समस्या