वाचन संस्कृती आणि बदलते आयाम
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
डॉ. अनिल नानाजी चिकाटे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असून ग्रंथालय व माहितीशास्त्र या क्षेत्रात तीस वर्षाचा अनुभव आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नामांकित नियतकालिकेतून 20 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये 30 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. मलेशिया, थायलंड, श्रीलंका, शांगाय इत्यादी देशात त्यांनी परिषदामधून लेख प्रस्तुत केलेत. तसेच तीन ग्रंथ देखील प्रकाशित केले आहेत. आतापर्यंत यांच्या मार्गदर्शनातून 12 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली आहे. णॠउ व खउडडठ या नामवंत संस्थेचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव येथील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र तसेच खान्देश पुराभिलेखागार व संग्रहालयाचे ते प्रमुख आहेत. कला व मानव्यशाखा प्रशाळेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथालयशास्त्र विषयातील अनेक संघटनांचे आजिव सदस्य आहेत.
हितेश गोपाल ब्रिजवासी हे खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या क्षेत्रात कार्यकरण्याचा त्यांचा सात वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असून. प्रकाशन क्षेत्रात सुध्दा त्यांची अनेक कार्ये आहे, यात त्यांनी लिहिलेल्या 3 ग्रंथांचा आणि 30 पेक्षा जास्त शोधनिबंधाचा समावेश होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध देखील सादर केले आहे तसेच राष्ट्रीय परिषदेत Research Scientist Award for Best Research Paper या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आले आहे. वर्तमानपत्रात देखील त्यांचे अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रीकेच्या संपादक मंडळावर देखील त्यांची निवड करण्यात आली असून विविध मासिक व नियतकालिकांच्या संपादनाचे कार्यसुध्दा त्यांनी केले आहे. ग्रंथालय भारती, नागपूर या संस्थेचे ते जळगाव जिल्ह्याचे सचिव असून या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सतत कार्यरत असतात. यांच्या कार्याबद्दल Smart Librarian या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डॉ. शर्मिला विठ्ठलराव गाडगे हे डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असून त्यांना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रात कार्य करण्याचा दहा वर्षांचा अनुभव आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे महाविद्यालयात समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील LIS नियतकालिकेत आतापर्यंत दहा लेख प्रसिद्ध असून एका ग्रंथाचे संपादक लेखिका आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदामध्ये लेखांचे वाचन केले आहे. कबचौ उमवि अंतर्गत प्राप्त संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील अनेक संघटनांच्या सभासद आहेत.
Vachan Sanskruti Ani Badalte Ayam
1. आधुनिक वाचन साहित्य आणि संसाधने – आशा विठ्ठल पाटील, हितेश गोपाल ब्रिजवासी
2. जीवन समृद्धीत वाचनाचे महत्त्व – भाऊसाहेब मुरलीधर नन्नवरे
3. आधुनिक युगातील वाचन साहित्य आणि संसाधने – कांतीलाल नानासो ताम्हाणे
4. वाचनाची आवड निर्माण करण्यात शालेय ग्रंथालय व ग्रंथपालाची भूमिका – कार्तिका महाजन
5. वाचनाचे महत्व आणि जीवन समृद्धी – किशोर रामदास माळी, अनिकेत नारायण वारूळकर
6. वाचन संस्कृती रूजविण्यात ग्रंथालय व ग्रंथपालाची भूमिका – माणिक सुजित राजोपाध्ये
7. वाचन ः जीवन समृद्धीचा मार्ग – मनीषा चव्हाण
8. चरित्र निर्मितीत वाचनाचे महत्व – प्रदीप तुळशीराम पाटील
9. वाचन आणि समृद्ध जीवन – सरदार नि. पाटील
10. वाचन : जीवन समृद्धीची नवी दिशा – स्नेहल संदीप पवार
11. वाचन आणि व्यक्तिमत्व विकास – तृप्ती राजेंद्र शहा
12. बदलत्या काळातील वाचन सवयी – विशाल आर. गजभिये
13. वाचन जीवन समृद्धीचा एक मंत्र – कविता ब्रिजेश मोगरे
14. सोशल मिडीया आणि वाचन संस्कृती – नेहा रमाकांत नाईक
15. वाचन साहित्याचे मूल्यमापन – बी. एस. पडवळ
16. वाचन आणि जीवन विकास – रोहिणी पांडे
17. वाचन काळाची गरज? – संदीप गेजगे, पवन शर्मा
18. वाचन सवयी वाढविण्याचे नवे प्रयोग – मिनाक्षी पंकज भदाणे
19. वाचन पद्धती आणि नवे प्रयोग – शितल अभिजीत धोत्रेे
20. आधुनिक काळात वाचनाची गरज – हेमंत एकनाथ बुधावले, दर्शना कदम
21. माहिती तंत्रज्ञान युगातील बदलणाऱ्या वाचकांच्या वाचन सवयी-काळाची गरज – स्वाती नरेंद्र नेरकर
22. वाचनातून जीवन समृद्धी एक दृष्टीक्षेप – कविता द. साळवे
23. आधुनिक वाचन साहित्य आणि संसाधनांचा परिचय : एक अभ्यास – पोर्णिमा गंथडे
24. समाजमंदीर, सजगमाता आणि सहवाचनानंद समाजमंदिर संवादिनी – अबोली चंद्रात्रे
25. आधुनिक वाचन संस्कृती आणि सोशल मिडीया : एक अभ्यास – अमूल सूर्यकांत तांबोळी, सपना अमूल तांबोळी
26. वाचन संस्कृती टिकवणारे महत्त्वपूर्ण पैलु : ग्रंथालय आणि ग्रंथपाल – प्रकाश फं. वाडकर
27. वाचनातून जीवन समृद्धी – रकटे ज्योती भाऊसाहेब
28. वाचन ः ग्रंथालय आणि ग्रंथपाल एक अभ्यास – शामला वि. ठाणेकर
29. आधुनिक काळातील बदलती वाचन संस्कृती : एक अभ्यास – हेमकांत एम. चौधरी
30. वाचन : संशोधनास वाव देणारा महत्त्वाचा घटक – भूषण आनंदा रणधीर, कोमल समिर भावसार