व्यावहारिक व उपयोजित मराठी
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
‘भाषा आणि जीवन व्यवहार’ यांची सांगड घालणार्या या नवीन अभ्यासक्रमात परिभाषेच्या उपयुक्ततेबरोबर औपचारिक व अनौपचारिक लेखन प्रकारांचा परिचय विद्यार्थ्यांना होणार आहे. नोकरी प्राप्त करून घेण्यासाठीचे अर्जलेखन तंत्राबरोबर ‘स्वयंरोजगार प्राप्तीसाठी’ करावयाच्या ‘स्वपरिचय पत्र’ लेखनाचे तंत्र व उपयुक्तता लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे. इतिवृत्त व टिप्पणी लेखन तंत्राचा परिचय करून देतांना विद्यार्थ्यांना कार्यालयीन संज्ञापनाबरोबर संगणक क्षेत्रातील मुलस्त्रोत साधनांची ओळख उपयुक्त ठरणारी आहे. कोशलेखन प्रकारांचा परिचय त्यांना नवीन ज्ञानप्राप्तीला मार्गदर्शन करणारा आहे. भविष्यात व्याख्यानक्षेत्रात किंवा नवीन माहितीचे सादरीकरणासाठी ‘पॉवर पॉईंट’ तंत्राच्या उपयोजनाचा वापर आवश्यक ठरणार आहे. त्या तंत्राचाही वस्तुनिष्ठ पद्धतीने परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ती शैक्षणिक क्षेत्रात उपयुक्त ठरणारी क्षमता विद्यार्थी आत्मसात करतील. तसेच मायक्रोसॉफ्ट, एक्सेल या घटकांबरोबरच विकिपीडियासाठी लेखन तंत्र इ. घटकांचा समावेश प्रस्तुत अभ्यासक्रमात असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा विकास साधता येईल.
Vyavaharik v Upyojit Marathi
- भाषा आणि जीवनव्यवहार : 1.1 भाषा म्हणजे काय?, 1.2 परिभाषा : व्याख्या व उपयुक्तता, 1.3 परिभाषेचे क्षेत्र व शब्दकोश, 1.4 भाषिक व्यवहारक्षेत्र : 1.4.1 साहित्याची भाषा, 1.4.2 व्यावहारिक भाषा, 1.4.3 शास्त्रीय भाषा, 1.4.4 कार्यालयीन भाषा
- कार्यालयीन लेखन : 2.1 औपचारिक लेखन व प्रकार, 2.1.1 माहितीपत्रक, 2.1.2 परिपत्रक, 2.1.3 सूचनापत्रक, 2.2 अनौपचारिक लेखन व प्रकार : 2.2.1 ट्रविटर, 2.2.2 व्हाटसअप्, 2.2.3 चित्रफिती इ.
- अर्जलेखन : तंत्र व प्रकार : 3.1 अर्जलेखन म्हणजे काय?, 3.2 अर्जलेखनाचे तंत्र, 3.3 अर्जलेखनाचे प्रकार व उपयोजन : 3.3.1 स्व-परिचय पत्र, 3.3.2 स्वयंरोजगारासाठीचे अर्जलेखन, 3.4 जाहिरात लेखन : तंत्र व उपयोजन
- इतिवृत्त व टिप्पणी लेखन : 4.1 कार्यालयीन संज्ञापन, 4.2 इतिवृत्त लेखन, 4.3 इतिवृत्त लेखनाचे तंत्र, 4.4 इतिवृत्त लेखनाचे उपयोजन, 4.5 टिप्पणी लेखन : तंत्र व उपयुक्तता, 4.6 टिप्पणी लेखनाचे उपयोजन व मार्गदर्शक सूचना
- संगणक आणि मराठी : 5.1 आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची उपयुक्तता, 5.2 संगणक व्याख्या व प्रकार, 5.3 मराठी वापरातील संगणकातील साधने, 5.3.1 युनिकोड टंक म्हणजे काय?, 5.3.2 ओळखपत्र, 5.3.3 मायक्रोसॉफ्ट एक्सेल, 5.3.4 पॉवर पॉईंट
- कोशलेखन व नोंदलेखन : तंत्र व प्रकार : 6.1 कोशलेखन म्हणजे काय?, 6.2 कोशलेखनाची उपयुक्तता व प्रकार, 6.2.1 ज्ञानकोश, 6.2.2 शब्दकोश, 6.2.3 मराठी विश्वकोश, 6.3 नोंद लेखन म्हणजे काय? : 6.3.1 नोंदीची उदाहरणे, 6.3.2 नोंदीची भाषांतरे व उपयोजन, 6.4 विकिपीडिया लेखन : तंत्र व उपयोजन