शिक्षक कसा असावा?
Authors:
ISBN:
₹85.00
- DESCRIPTION
- INDEX
या पुस्तिकेद्वारे शिक्षक बंधू-भगिनींना काही चांगले मिळत असेल तर मी त्याबाबत धन्यता मानतो. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना अक्कल शिकविणे हा या पुस्तकाचा उद्देश अजिबात नाही. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना जे शिकायला मिळाले ते आपल्या इतर शिक्षक बंधू-भगिनी समोर ठेवणे, एवढाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा आहे. माझ्या बावीस वर्षाच्या सेवेत मी एक परिपूर्ण शिक्षक बनलो, असा मी दावा करीत नाही. किंबहुना मला अजून बरेच काही शिकायचे आहे आणि स्वतःमध्ये असलेल्या उणीवा दूर करायच्या आहेत. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि स्वतःही शिक्षक असल्याने मला शिक्षक व्यवसायाबद्दल नितांत आदर आहे.
या पुस्तकात जसे मी शिक्षकांच्या काही दोषांवर भाष्य केले आहे तसे चांगल्या शिक्षकांच्या उदात्त कार्याला नमन देखील केले आहे. शिक्षकांच्या उणीवांवर केलेली चर्चा केवळ शिक्षकी व्यवसाय समृद्ध व्हावा व त्यातून समाज व राष्ट्र बळकट व्हावे याच हेतूने केली आहे. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना हीन लेखणे, हा त्या मागचा हेतू अजिबात नाही. तरीही माझ्या शिक्षक बंधू भगिनींचे मन जर या पुस्तकातील काही मजकुराने दुखावले गेले तर मी आधीच त्याची माफी मागतो व आपला शिक्षक व्यवसाय अजून समृद्ध व्हावा यासाठी मोठ्या मनाने ते या पुस्तकाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Shikshak Kasa Asava
- चारित्र्यसंपन्न व उत्तम प्रेरक
- विषय संपन्न व अध्यापन पद्धतीमध्ये प्रयोगशील
- आजन्म विद्यार्थी व तंत्रस्नेही
- उपक्रमशील
- उत्तम समन्वयक
- शिस्तप्रिय पण शिक्षा प्रिय नसलेला
- सकारात्मक व हसतमुख
- एकविसाव्या शतकाला सामोरे जाणारा कौशल्य वर्धक
- सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास साधक
- भ्रष्ट व्यवस्थेचा विरोधक
- नव-समाज निर्मितीचा कार्यकर्ता
- विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ