समकालीन युद्धपद्धती
Contemporary Warfare
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.
Samakalin Yuddhapaddhati
- आधुनिक युद्धपद्धती : आधुनिक युद्ध, युद्ध व युद्धप्रक्रिया, युद्धाची संकल्पना, उद्गम व कारणे, युद्धांचे प्रकार, जमात युद्धे, जागतिक युद्ध किंवा महायुद्ध, समग्र युद्धे, संरक्षणात्मक उपक्रमशीलता किंवा नक्षत्रयुद्ध; आधुनिक युद्ध पद्धती – प्रस्तावना, व्याख्या, आधुनिक युद्धाचे स्वरुप; आधुनिक युद्धतंत्राची वैशिष्ट्येे
- मर्यादित युद्धपद्धती : (अ) मर्यादित युद्धपद्धती- मर्यादित युद्धाचे स्वरुप, वैशिष्ट्ये, (ब) सर्वंकष युद्धपद्धती – प्रस्तावना, सर्वंकष युद्धाचे स्वरुप क) सर्वंकष युद्ध घटक- 1) वैचारिक किंवा भौतिक घटक 2) सशस्त्र राष्ट्र सिद्धान्त 3) स्वार्थतेचा मुलामा 4) वैज्ञानिक व तांत्रिक घटक 5) परमाणू आणि शीत युद्ध ड) सर्वंकष युद्धाचे परिणाम- 1) राजकिय परिणाम 2) आर्थिक परिणाम
- आण्विक युद्धपद्धती : अणुयुद्ध; अ) ओळख ब) संकल्पना क) आण्विकयुद्धाचे परिणाम – 1) ब्लास्टचे परिणाम 2) पृथ्वीवर होणारे परिणाम 3) तापमानाचे परिणाम 4) विकिरणांचे परिणाम; ड) अणूचा शांततेसाठी वापर ई) अण्वस्त्रे ई) जागतिक शांतता आणि भारत
- आर्थिक युद्धपद्धती : आर्थिक युद्धतंत्र- 1) ओळख 2) अर्थ 3) इतिहास 4) उद्देश 5) संकल्पना; संकल्पना- 1) मजबुत आर्थिक व्यवस्था 2) विविध मार्ग 3) जनतेचे सहकार्य 4) युद्धशास्त्र व अर्थशास्त्र यांचा परस्परसंबंध 5) सैन्य प्रशासन 6) युद्धास प्रभावित करणारी आर्थिक तत्वं किंवा आर्थिक तत्वांचा युद्धावर प्रभाव; आर्थिक तत्व- 1) सैनिकी साधनसामग्रीची पूर्तता 2) राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्न
- रासायनिक युद्धपद्धती : (अ) रासायनिक युद्धपद्धती – 1) अर्थ 2) उद्देश 3) इतिहास; रासायनिक गॅसचे प्रकार – 1) गॅसच्या शारीरिक स्वभावावर आधारित 2) मानवी शरीरावर प्रभावीत करण्याच्या आधारावर 4) रासायनिक युद्धाच्या पद्धती 5) रासायनिक युद्धाची वैशिष्ट्ये 6) प्रतिबंध किंवा सुरक्षात्मक उपाय, (ब) जीवाणू किंवा जैविक युद्धपद्धती – जैव व रासायनिक युद्धतंत्र – इतिहास; साधने – (अ) फोड आणणारे वायू (आ) अश्रुधूर (इ) मळमळकारक व वमनकारक वायू (ई) तंत्रिका वायू (उ) फुप्फुसक्षोभक वायू
- मानसशास्त्रीय युद्धपद्धती : मानसशास्त्रीय युद्धतंत्र – उद्दिष्टे, इतिहास; दुसर्या महायुद्धातील प्रचारयुद्ध – जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, जपान; मानसशास्त्रीय युद्धाचे तंत्र व मंत्र; प्रचार-प्रकार – प्रकाश, धूसर, कूट (कृष्ण); प्रचार-तंत्र पातळ्या वा आघाड्या, प्रचार-संस्था, संघटन व अधःसंरचना, आंतरराष्ट्रीय न्याय व संयुक्त राष्ट्र संघटना; सद्यस्थिती – 1) ओळख 2) अर्थ 3) उद्दिष्टे; मानसशास्त्रीय युद्धपद्धतीचे पैलू – 1) प्रचार 2) प्रचाराचा अर्थ 3) प्रचाराची वैशिष्ट्ये 4) प्रचाराचे प्रकार – अ) प्रकाश प्रचार ब) धूसर प्रचार क) कूट किंवा कृष्ण प्रचार; प्रचाराचे इतर प्रकार – अ) सामरिक प्रचार ब) आक्रमक प्रचार