समाजभाषाविज्ञान
Authors:
ISBN:
₹165.00
- DESCRIPTION
- INDEX
‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबाबत अधिकाधिक मांडणी करण्याची निकड आजही कायम आहे. किंबहुना भाषेचे समाज आणि संस्कृती यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी अशा अभ्यासदृष्टीची नितांत निकड आहे. यादृष्टीने डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. समाजभाषाविज्ञान या विषयाचे स्वरूप व व्याप्ती या मुद्यांपासून सुरू होणारे हे पुस्तक या विषयातील मूलभूत संकल्पनांची विस्ताराने मांडणी करणारी आहे. समाजभाषा व संस्कृती, समाज-संस्कृती स्तरांवरील भाषाभेद, पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिध्दांत, भाषानिर्मितीचे सिध्दांत या तात्विक मुद्यांसंबंधीची विस्ताराने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भाषिक प्रश्न आणि लिपी या दोन निराळ्या मुद्यांसंबंधी विवेचन आलेले आहे. सातत्याने या अभ्यासविषयासंबंधी चिंतन-अभ्यास करणार्या डॉ. जोशी यांनी अध्यापक-विद्यार्थी यांच्यासाठी सुलभपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून देणारी आहे.
Samaj Bhasha Vidnyan
- समाजभाषाविज्ञान : स्वरुप व व्याप्ती : 1.1 आधुनिक भाषाविज्ञानाचे स्वरुप, 1.2 समाज भाषा विज्ञान म्हणजे काय, 1.3 समाजभाषाविज्ञानाचे स्वरुप व व्याप्ती, 1.4 समाजभाषाविज्ञानाचे प्रकार, 1.5 समारोप
- समाजभाषाविज्ञानातील पायाभूत संकल्पना : 2.1 संदेशवहनक्षमतेची संकल्पना, 2.2 भाषिकभांडार व लघुक्षेत्र, 2.3 भाषासंपर्क, 2.4 भाषा नियोजन, 2.5 भाषेतील निबिद्धता, 2.6 भाषाप्रदुषण व भाषाशुद्धीकरण, 2.7 समारोप
- समाजभाषा व संस्कृती : 3.1 समाज आणि भाषा : सहसंबंध, 3.2 संस्कृती म्हणजे काय?, 3.3 भाषा: एक सामाजिक संस्था, 3.4 समाजसंकेत आणि भाषा, 3.5 वांशिक अर्थस्वरुप शास्त्र, 3.6 समारोप
- सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्तरावरील भाषाभेद : 4.1 व्यावसायिकांची भाषा, 4.2 भाषा आणि जातीव्यवस्था, 4.3 भाषा आणि लिंगभेद (पुरुषांची व स्त्रियांची भाषा), 4.4 प्रमाणभाषा व बोली : सहसंबंध, 4.5 समारोप
- पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिद्धांत : 5.1 फेर्दिना द सोस्यूर : ‘भाषिकव्यवस्था व भाषिक वर्तन’, 5.2 ब्युमफिल्ड : संरचनावाद, 5.3 नोम चॉम्स्की : रचनांतरण, 5.4 सपीर व वोर्फ : भाषिक सापेक्षतावाद, 5.5 ब्रॅझिल बर्नस्टाइल : न्यून सिद्धांत, 5.6 रुडॉल्फ होर्न्ले : आंतर-बर्हिवर्तुळ सिद्धांत, 5.7 समारोप
- भाषानिर्मितीचे सिद्धांत : 6.1 भाषानिर्मितीचे सिद्धांत, 6.1.1 बालभाषा सिद्धांत, 6.1.2 बहुभाषिक निर्मितीचा सिद्धांत, 6.1.3 एक भाषा निर्मितीचा सिद्धांत, 6.2 पिजिन भाषा, 6.3 क्रिऑल भाषा, 6.4 भाषिक आविष्कारांचा विस्तार, 6.5 समारोप
- भारतातील भाषिक प्रश्न : 7.1 भारताचा भाषिक नकाशा, 7.2 भारतातील भाषा संकुल, 7.3 भाषावार प्रांत रचना भूमिका, 7.4 भाषिक एकात्मकतेची संकल्पना, 7.5 राष्ट्रभाषेचा प्रश्न, 7.6 सरकारी भाषा मंडळाचा शिक्षण अहवाल, 7.7 समारोप
- भाषा आणि लिपी : 8.1 भाषा आणि लिपी साम्यभेद, 8.2 ब्राम्ही ते देवनागरी, 8.3 देवनागरी लिपीची वैज्ञानिकता, 8.4 देवनागरी लिपीतील त्रूटी, 8.5 देवनागरी लिपीच्या सुधारण्याचे प्रयत्न, 8.6 समारोप