सांख्यिकीय पद्धती
Statistical Methods
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
आजच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही शास्त्रात सांख्यिकीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांख्यिकीमध्ये अंकाच्या स्वरूपात असलेली माहिती विशिष्ट पद्धतीने मांडली जाते व त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. आधुनिक काळात सरकारने कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला आपल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनासाठी प्रभावी साधन असल्यामुळे संख्याशास्त्राचा उपयोग हा बहुतेक सर्व शास्त्रांत केला जातो. सांख्यिकीची व्याप्ती ही विशाल स्वरूपाची आहे. विविध शास्त्राच्या अभ्यासात सांख्यिकीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीच्या सहाय्याने मूळ सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सांख्यिकीच्या सहाय्याने संग्रहीत सामग्रीचे वर्गीकरण, श्रेणीयन, सारणीयन आणि विश्लेषण करण्यात येते. याचप्रमाणे व्यवहारिक जीवनात ही सांख्यिकीची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Sankhyikiya Paddhati
- सांख्यिकीची ओळख : 1.1 सांख्यिकीची व्याख्या, 1.2 सांख्यिकीची व्याप्ती, 1.3 सांख्यिकीची कार्ये, 1.4 सांख्यिकीचे महत्त्व, 1.5 सांख्यिकीच्या मर्यादा
- सामग्रीची उगमस्थाने : 2.1 प्राथमिक सामग्री, 2.2 द्वितीयक सामग्री, 2.3 समग्र आणि प्रतिदर्श अनुसंधान पद्धती
- वारंवारीतेचे वाटप : 3.1 वर्गीकरण, 3.2 श्रेणीयन, 3.3 सारणीयन, 3.4 आकृत्याद्वारे समंकाचे निरूपण
- केंद्रिय प्रवृत्तीची परिमाणेे : 4.1 समांतर मध्य, 4.2 मध्यका, 4.3 भूयिष्टक, 4.4 चतूर्थक, 4.5 दशमक, 4.6 शतमक, 4.7 गुणोत्तर माध्य, 4.8 हरात्मक माध्य
- विचलन शिलतेची परिमाणे : 5.1 विस्तार, 5.2 चतुर्थक विचलन, 5.3 माध्य विचलन, 5.4 प्रमाण विचलन, 5.5. लॉरेंज वक्र
- सहसंबंध विश्लेषण : 6.1 सहसंबंधाचा अर्थ, 6.2 सहसंबंधाचे गुणधर्म, 6.3 सहसंबंधाचे प्रकार, 6.4 सहसंबंध काढण्याच्या पद्धती
- कालिक श्रेणीचे विश्लेषण : 7.1 कालमालेचा अर्थ, 7.2 कालमालेचे महत्त्व, 7.3 कालमालेचे घटक, 7.4 कालमालेचे प्रकार आणि पद्धती
- निर्देशांक : 8.1 निर्देशांकाचा अर्थ, 8.2 निर्देशांकाची रचना, 8.3 निर्देशांकाचे महत्त्व, 8.4 निर्देशांकाच्या मर्यादा, 8.5 निर्देशांक काढण्याच्या पद्धती
- विषमता, परिबल आणि वाशिंडता : 9.1 विषमतेचा अर्थ आणि मापन, 9.2 परिबल अर्थ आणि मापन, 9.3 वाशिंडता अर्थ आणि मापन
- प्रतीपगमन विश्लेषण : 10.1 प्रतीपगमनाचा अर्थ, 10.2 प्रतीपगमनाची समीकरणे
- संभाव्यता : 11.1 संभाव्यतेचा अर्थ, 11.2 संभाव्यतेची संकल्पना, 11.3 संभाव्यतेचे नियम
- क्रमपर्याय आणि संयोग : 12.1 क्रमपर्याय, 12.2 संयोग
- परिकल्पनेची चाचणी : 13.1 परिकल्पनेचे प्रकार, 13.2 परिकल्पनेच्या चाचणीची कार्यपद्धती, 13.3 मध्य प्रमाण दोष, 13.4 गुणानुसार लक्षणीय चाचणी, 13.5 लहान नमुने, 13.6 काई – वर्ग चाचणी
- प्रचरण विश्लेषण : 14.1 प्रचरण विश्लेषणाचा अर्थ व संकल्पना, 14.2 एक मार्गी वर्गीकरणात प्रचरण, 14.3 द्विमार्गी वर्गीकरणात प्रचरण विश्लेषण