साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवन
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रस्तुत ग्रंथाद्वारे साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवनावर नव्याने प्रकाश टाकलेला दिसून येतो. साताऱ्याच्या छत्रपतींचा राजदरबारातील सांस्कृतिक जीवनाचे विविध पैलू वाचकासमोर मांडलेले दिसून येतात. साताऱ्याच्या छत्रपतीनी (राजांनी) त्यांच्या दरबारात अनेक कलाकार, खेळाडु, सेवक व वैद्यक लोकांना राजाश्रय देवून आपल्या दरबाराचे महत्त्व वाढविले होते यात शंकाच नाही. त्यांच्या दरबारातील रितीरिवाज, करमणुकीचे कार्यक्रम, इतर चालीरिती, तत्कालीन सण आणि उत्सव, राजदरबारात साजरे होणारे धार्मिक विधी आणि राजदरबारातील वेगवेगळे विभाग यांचाही शोधपूर्ण आढावा घेतलेला दिसून येतो. ग्रंथात केलेले वर्णन अतिशय वास्तववादी स्वरुपाचे असून ते आजच्या काळातील महाराष्ट्रातील धार्मिक विधी व उत्सवांच्या वर्णनाशी बरेचसे जुळते मिळते आहे. त्यामुळे सदरील संशोधनात्मक ग्रंथ आजही महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी निगडीत असल्यासारखा वाटतो. साताऱ्याच्या राजदरबाराच्या सांस्कृतिक जीवनात तत्कालीन मराठा स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. हे तत्कालीन साधन ग्रंथाच्या पुराव्यावरुन म्हणता येईल. मराठ्यांच्या सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक ग्रंथापैकी हा एक अतिशय मौल्यवान ग्रंथ असून या ग्रंथाव्दारे मराठ्यांच्या इतिहासात नव्याने भर पडेल यात शंका नाही.
Sataryachya Chhatrapatinchya Rajadarbaratil Sanskrutik Jeevan
1. साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारी संस्कृतिचे विविध पैलू
- सातारा येथील वाडे, पेठ व राजवाडे
- सातारा शहरातील मंदिरे
- सातारा येथील शाहू छत्रपतीचा दरबार कलाकार लोकांना राजाश्रय
- उत्कृष्ट खेळाडूंना आश्रय व मासीक वेतन
- छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात वैद्यकांना राजाश्रय
- छत्रपती शाहूच्या दरबारात स्वामीनिष्ठ सेवक व पराक्रमी सेवकांचा सत्कार व जमीन इनाम
- छत्रपती शाहूमहाराजांची आज्ञापत्रे
- वर्षासन
- छत्रपतीच्या दरबारातील मानाची वस्त्रे व सन्मान
- दरबारी अधिकारी
- साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील रितीरिवाज व कामगिरी
- छत्रपती शाहुंची करमणुक
- छत्रपती शाहूंच्या वाड्यातील प्राणी, पक्षी वैगेर
- छत्रपती शाहूंची प्रवास यात्रा
- छत्रपती शाहुंना परकिय वस्तुंची आवड
- छत्रपती शाहूंचा स्वभाव आणि उदारता
- छत्रपती शाहुंचा परिवार
- छत्रपती शाहु महाराजांची दिनचर्या
- साताऱ्याच्या छत्रपतीची धार्मिक सहिष्णुता
2. सातारा राजदरबारातील सण व उत्सव
- राज्यारोहण समारंभ
- विजयादशमी
- नवरात्र
- गणेश चतुर्थी
- गोकुळ अष्टमी
- संक्रांत
- होळी/शिमगा
- राजदरबारात साजरे होणारे जन्मोत्सव
- पुत्रोत्सव इत्यादी
3. सातारा राजदरबारातील धार्मिक विधी व उत्सव
- श्रीमंत पुजनाचा विधी
- व्रतबंधविधी
- अंबाबाईचा गोंधळ
- दसनवमीचा उत्सव
- धार्मिक विधी
4. छ. प्रतापसिंह, राज्यातील शिक्षण पद्धती व समाजजीवनावरील प्रभाव
5. राजदरबारातील सांस्कृतिक जीवनात राजघराण्यातील स्त्रियांचा सहभाग
6. सारांश आणि निष्कर्ष