सामाजिक मानसशास्त्र
Social Psychology
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
‘सामाजिक मानसशास्त्र’ हा विषय लक्षात घेताना सामाजिक आणि मानसशास्त्र या दोन घटकांना लक्षात घ्यावे लागते. सामाजिक या घटकात समाज हा पैलू विशेषत्वाने समोर येतो तर मानसशास्त्र या घटकात व्यक्तीच्या वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास असा अर्थबोध स्पष्ट होतो. सामाजिक मानसशास्त्राचे स्वरुप हे पूर्णत: वैज्ञानिक आहे, शास्त्रीय आहे. कारण त्यात वस्तूनिष्ठता, प्रामाणिकता, पूर्वानुमान, सार्वभौमिकता इ. घटक दिसून येतात. सामाजिक संदर्भात घडून येणार्या व्यक्तीवर्तनाचा अभ्यास करणे हेच सामाजिक मानसशास्त्राचे उद्दीष्ट आहे. सद्य:स्थितीमध्ये आपण वावरत असलेल्या सामाजिक वर्तुळात अनेक स्थित्यंतरे होत आहे. अनेक बदल होत आहेत. वर्तनाचे अनेक बिंदू परीवर्तीत होत आहेत. पूर्वग्रह, आक्रमकता, साचेबंद कल्पना यासारख्या संकल्पनेतून अनेक समस्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. मूलभूत पातळीवर संबंधात कटुता निर्माण होत आहे. या प्रश्नांची सोडवूणक करण्यासाठी या पुस्तकाची मदत नक्कीच होणार आहे. म्हणूनच हे पुस्तक विद्यार्थ्यासोबत प्रत्येकच वाचकाला अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.
Samajik Manasshastra
- सामाजिक मानसशास्त्र : स्वरुप व व्याप्ती : सामाजिक मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वरुप, व्याख्या; व्याप्ती, सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धती, सर्वेक्षण पद्धतीचे फायदे, सर्वेक्षण पद्धतीचे दोष; समाजमिती पद्धती, समाज आलेख, समाजमिती पद्धतीचे फायदे, समाजमिती पद्धतीचे दोष
- व्यक्ती आणि सामाजिक प्रत्यक्षीकरण : व्यक्ती प्रत्यक्षीकरण – संकल्पना; अशाब्दिक संप्रेषण, व्यक्ती प्रत्यक्षीकरणाचा उगम; गुणारोपण सिद्धांत – गुणारोपणाची मुलभूत तत्वे, छाप व्यवस्थापन, आत्मप्रत्यक्षीकरण; सामाजिक प्रत्यक्षीकरण – स्वरुप, सामाजिक प्रत्यक्षीकरणाची व्याख्या
- समाजभिमुख वर्तन : अर्थ, व्याख्या; समाजभिमुख वर्तनाचे घटक, बघ्याचा परिणाम; समाजभिमुख वर्तनाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण
- समूह : प्रस्तावना, व्याख्या; समूह संरचना, समूहाची कार्ये, समूह निर्मिती; समूहाचे प्रकार, समूह आणि कार्य निष्पादन, समूह एकात्मता; समूह एकात्मतेवर परिणाम करणारे घटक, समूह एकात्मतेचे परिणाम
- नेतृत्व : प्रस्तावना, व्याख्या; नेतृत्वाची कार्ये, नेत्याची वैशिष्ट्ये, नेत्याचे प्रकार, नेतृत्वाचे गुणविशेष, नेतृत्वाचे दृष्टीकोन
- अभिवृत्ती : परिवर्तन आणि मापन : प्रस्तावना, स्वरुप, व्याख्या; अभिवृत्तीचे घटक, अभिवृत्तीची परिमिती, अभिवृत्ती निर्मिती, अभिवृत्ती आणि वर्तन, अभिवृत्ती परिवर्तन; अभिवृत्ती परिवर्तनाची प्रक्रिया, पारंपरीक दृष्टीकोन; अभिवृत्ती परिवर्तनावर प्रभाव टाकणारे घटक, अभिवृत्ती मापन श्रेणी
- पूर्वग्रह आणि साचेबंद कल्पना : पूर्वग्रह संकल्पना, व्याख्या; पूर्वग्रहाची उगमस्थाने, पूर्वग्रह कमी करण्याची तंत्रे आणि योजना, साचेबंद कल्पना – स्वरुप; साचेबंद कल्पनेची उगमस्थाने
- आक्रमकता : स्वरुप, व्याख्या; आक्रमकतेचे प्रकार, आक्रमकतेचे सिद्धांत, आक्रमकतेचे निर्धारक घटक, बालकांशी दुर्वर्तन – शारीरिक आघात, लैंगिक आघात, भौतिक गरजांकडे दुर्लक्ष, भावनिक दुर्लक्ष, मानसिक आघात; कामाच्या ठिकाणी हिंसा; प्रतिबंध आणि नियंत्रण
- सामाजिक बदल आणि समस्या : स्वरुप, सामाजिक बदलाची कारणे; भारताच्या संदर्भामध्ये सामाजिक बदलाच्या समस्या, जन्म नियंत्रणातील घटक आणि लोकसंख्या; जन्म नियंत्रण, सामाजिक समस्या
- विचलनाचे मापन : संकल्पना; विचलनशीलतेला ज्ञात करण्याच्या पद्धती – 1) विस्तार – विस्तार वैशिष्ट्ये, मध्यमान विचलन, चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन
- सामान्य वितरण : संभाव्यता संकल्पना, संभाव्यतेचे नियम; सामान्य संभाव्यता वक्र – सामान्य संभाव्यता वक्राची वैशिष्ट्ये, सामान्य संभाव्यता वक्रापासून विचलन; स्क्यू वितरण, स्क्यू वितरणाची कारणे, स्क्यू वितरण काढण्याची पद्धत; कूरटोसीस वितरण, कूरटोसीस वितरण काढण्याची पद्धत