साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य)
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
साहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.
– आशुतोष पाटील
Sahityavichar (Bharatiya Ani Pashchattya)