साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे निवडक ललित गद्य
Authors:
ISBN:
₹70.00
- DESCRIPTION
- INDEX
ललित निबंधात आत्मनिष्ठ लेखन असते. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या साहित्यात व्यक्त होणारे अनुभव हे ‘मी’ च्या जीवनातीलच असतात
कधी ते उघड उघड आत्मनिष्ठ लेखनपद्धतीने प्रत्यक्षरुपात, तर कधी वस्तुनिष्ठेचे रुप धारण करुन छुप्या पद्धतीने अगर दुसर्या व्यक्तींच्या (पात्रांच्या) नावावर अप्रत्यक्ष रुपात, तर कधी आदर्शवादाच्या, उदात्तीकरणाच्या प्रेरणेने स्वेतर मानवी मनाच्या आविष्काराच्या रुपात अवतरत असतात. म्हणजे अंतिमतः साहित्य हा आत्मनिष्ठेचाच आविष्कार आहे असे मानले तर ‘ललित लिबंण’ हा साहित्यप्रकार इतर सर्वच साहित्यप्रकारांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष रुपात व्यापून उरतो, असे मानावे लागते
पण तत्त्वज्ञानाच्या एवढ्या व्यापक पातळीवर जाऊन ललित निबंध या साहित्यप्रकाराचा विचार करणे इथे अभिप्रेत नाही
या सगळ्या मर्यादा गृहीत धरुन ललित निबंध या साहित्यप्रकाराचा विचार करायचा आहे.
– आनंद यादव
Sahitya Akadmi Purskar Pratpa Sahityikanche Nivadak Lalit Gadya