साहित्य विचार (भारतीय व पाश्चात्य)
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
साहित्य आणि समाज यांचे जवळचे संबंध आहेत. कारण लेखक हा समाजाचाच घटक असतो. समाजात वावरताना त्याला भलेबुरे अनुभव येतात त्याचे चित्र तो साहित्यकृतीतून रेखाटतो म्हणून साहित्य म्हणजेच जीवनाचा आरसा होय असे म्हटलेले आहे आणि ते योग्य आहे.
‘साहित्य विचार’ ह्या पुस्तकाची निमिर्ती ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणामध्ये साहित्याविषयी विचार मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रकरणाची सविस्तर, सुलभ व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. या ग्रंथात साहित्याचे स्वरूप, काव्य शब्दांची व्याप्ती, संस्कृत साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे तसेच पाश्चात्य साहित्यकारांची साहित्य लक्षणे, मम्मटाची साहित्य प्रयोजने, पाश्चात्यांची साहित्य प्रयोजने, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती, व्युत्पत्ती, स्फूर्ती आणि साहित्य प्रकाराची संकल्पना, साहित्याची भाषा, साहित्य आणि समाज, साहित्याची अभिरुची तसेच रसविचार, रीतिविचार, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार इत्यादी घटकांचा सविस्तर आढावा प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.
प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, मराठीचे अध्यापन करणारे प्राध्यापक बंधुनाही अध्यापनासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.
– प्रा. डॉ. आनंदा बाबबुराव सोनवणे
Sahitya Vichar (Bhartiya va Pachhyatya)
1. साहित्याचे स्वरुप
1.1 साहित्याचे स्वरुप, संस्कृत मधील काव्य शब्दाची व्याप्ती
1.2 शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय
1.3 पौर्वात्य (संस्कृत) साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची विविध लक्षणे. भामह, दण्डी, कुंतक, वामन पंडित, आनंदवर्धन, जगन्नाथ पंडित, मम्मट, विश्वनाथ यांची साहित्य लक्षणे
1.4 पाश्चात्य साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे (जॉन्सन, कॉर्लाईल, वर्डस्वर्थ, कोलरिज, हॅझलिट, मॅथ्यु अर्नेाल्ड) यांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या व लक्षणे
2. साहित्याचे प्रयोजन
2.1 प्रयोजन स्वरुप, प्रयोजनाची व्याप्ती, प्रयोजनाचे प्रकार लेखकनिष्ठ आणि वाचक निष्ठ प्रयोजन
2.2 मम्मटाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने (यश, अर्थ, व्यवहारज्ञान अशुभ निवारण, कांतासंमित उपदेश आल्हाद किंवा आनंद प्राप्ती)
2.3 पाश्चात्यांची साहित्य प्रयोजने (पलायनवाद, इच्छापूर्ती, वा स्वप्नरंजन, जिज्ञासापूर्ती, उद्बोधन आत्माविष्कार, कॅथार्सिस)
3. साहित्य निर्मिती प्रक्रियेचे स्वरुप
3.1 निर्मिती म्हणजे काय? नवनिर्मितीचे स्वरुप व वैशिष्ट्ये
3.2 निर्मिती आणि उत्पादन यातील फरक
3.3 साहित्य निर्मितीची कारणे (प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती आणि व्युत्पत्ती, स्फूर्ती इत्यादी)
3.4 लेखकाचे व्यक्तिमत्वाचे गुण (कलावंतांची संवेदनशीलता, कलावंताचा अनुभव आणि सृष्टी, कलावंतांचे शैशवपण इत्यादी)
4. साहित्य प्रकाराची संकल्पना
4.1 साहित्य प्रकार निर्मितीची संकल्पना
4.2 साहित्याची आविष्कार पध्दती
4.3 साहित्याचे प्रमुख प्रकार : गद्य प्रकार व पद्य प्रकार
4.4 साहित्य प्रकारांचे वेगळेपण व वैशिष्ट्ये
5. साहित्याची भाषा
5.1 भाषेचे विविध प्रकार (समाजभाषा, प्रमाणभाषा, व्यक्तीभाषा, साहित्यभाषा)
5.2 भाषेवर परिणाम करणारे घटक (वय, लिंग, परिस्थिती, व्यवसाय)
5.3 शैली संकल्पना
5.4 शैलीचे स्वरुप व वैशिष्ट्ये
5.5 शैलीचे प्रकार : आशय तशी शैली, लेखक तशी शैली, साहित्य प्रकार तशी शैली
5.6 साहित्यिक भाषेचे वेगळेपण
6. साहित्य आणि समाज
6.1 साहित्यिक आणि समाजाचा परस्पर संबंध (भाषा, कलाकृतीचे अस्तित्व, कलाकृती विषयी समाज मनाचा प्रतिसाद, कलाकृतीचा विषय, आशय आणि भाषेच्या संदर्भात समाजाचा संबंध)
6.2 लेखकाचे समाजाशी नाते
6.3 भाषा, काळ आणि समाज या तत्त्वत्रयीचा साहित्य निर्मितीवर होणारा परिणाम
6.4 समाजावर होणारा कलाकृतीचा परिणाम
7. साहित्याची अभिरुची
7.1 अभिरुची म्हणजे काय? साहित्यिक अभिरुचीचे वेगळेपण
7.2 अभिरुचीचे विविध प्रकार, (ग्रामीण-नागर, बहुजन-अभिजन, सामान्य-विदग्ध इत्यादी)
7.3 अभिरुची नियत करणारे घटक (सांस्कृतिक वातावरण, आर्थिक वातावरण, वाङ्मयीन वातावरण)
8. साहित्य सिध्दांताची तोंडओळख
8.1 रस सिध्दांत
8.2 रीतिविचार
8.3 अलंकार विचार
8.4 वक्रोक्ती विचार