सेट/नेट भूगोल (पेपर 2 व 3)
SET-NET Geography (Paper 2 & 3)
Authors:
ISBN:
₹595.00
- DESCRIPTION
- INDEX
भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची दर्जेदार व अचूक माहिती असलेले ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्याला विकत घेवून अभ्यासणे तसेच एकाच ग्रंथालयात ही सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध असणे दुरापास्त आहे. तसेच भूगोलशास्त्रातील बहुसंख्य ग्रंथ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे नेट/सेट/जे.आर.एफ. भूगोल विषयाची तयारी करणार्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींंना तोंंड द्यावे लागते. या सर्व अडचणींंचा सखोल विचार करुन एकाच ग्रंथात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची माहिती प्रासादात्मक भाषेत अचूकपणे उपलब्ध करुन देणे हा या पुस्तक निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. सदर पुस्तकात भूगोलशास्त्राच्या विविध शाखांतील संकल्पना व पाठयांश मांडणी अभ्यासकाला सहज अवगत होईल अशी करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या संकल्पना आकृतींंच्या साहाय्याने स्पष्ट केलेल्या असून त्या स्वत:लेखकांनी संगणकावर तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक अचूकपणे तयार केलेल्या आहेत. सर्वांंना ज्ञात असलेल्या भूमीच्या भूगोलाची व्याप्ती अतिशय व्यापक असून त्यातील पाठयाशाची मांडणी मर्यादित पृष्ठांत करणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे सदर पुस्तकात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्वच घटक विस्ताराने स्पष्ट करण्याऐवजी स्वयंअध्यापनानुभव व नेट/सेट परीक्षेतील प्रश्नांचे स्वयंअध्ययन व अवलोकन करुन अचूक पध्दतीने संक्षेपाने स्पष्ट करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक घटका नंतर नेट/सेट प्रश्नसंचातील काठीण्य पातळीचा विचार करुन वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांंना स्वअध्ययन करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांंचा प्रश्नसंच सोडविण्याचा सराव व्हावा म्हणून 900 प्रश्नांचा समावेश असलेले चार सराव प्रश्नसंचासह नेट व सेट परीक्षांचे दुसर्या व तिसर्या पेपरचे प्रश्नसंच उत्तरांसह समाविष्ट केले आहेत.
Set-Net Bhugol (Pepar 2 V 3)
- भूरुपशास्त्र
- हवामानशास्त्र
- सागरी विज्ञान
- जैविक भूगोल
- भौगोलिक विचारप्रणालीचा इतिहास
- लोकसंख्या भूगोल
- वस्ती भूगोल
- आर्थिक भूगोल
- राजकीय भूगोल
- सामाजिक आणि सांस्कृतिक भूगोल
- प्रादेशिक नियोजन
- भारताचा भूगोल
- नकाशाशास्त्र
- सांख्यिकी पध्दती
- सराव प्रश्नसंच क्रमांक 1 ते 4
- नेट जून 2012 (पेपर -2)
- नेट जून 2012 (पेपर – 3)
- नेट डिसेंबर 2012 (पेपर – 2)
- नेट डिसेंबर 2012 (पेपर – 3)
- सेट फेब्रुवारी, 2013 (पेपर – 2)
- सेट फेब्रुवारी, 2013 (पेपर – 3)
- नेट जून, 2013 (पेपर – 2)
- नेट जून, 2013 (पेपर – 3)
- सेट डिसेंबर, 2013 (पेपर – 2)
- सेट डिसेंबर, 2013 (पेपर – 3)
- नेट डिसेंबर, 2013 (पेपर – 2)
- नेट डिसेंबर, 2013 (पेपर – 3)
- नेट जून, 2014 (पेपर – 2)
- नेट जून, 2014 (पेपर – 3)
- थोडक्यात महत्त्वाचे