हत्ती गेला सुमाच्या घरी
Authors:
ISBN:
₹80.00
- DESCRIPTION
- INDEX
कवी प्रल्हाद खरे यांनी आपल्या छोट्याशा काव्यसंग्रहातून जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. गावात पाणी मिळत नाही… सांडपाणी आडवावे, झाडाला घालावे यातला भाव बाळबोध असेल पण तळमळ मात्र फार मोठी आहे. येनकेन प्रकारे निसर्ग, घर हे सारे काही काळजात जपून ठेवावे व त्यांना वाढवावे ही कवीची भावना अतिशय मौलिक आहे. कवीच्या हृदयातून येणारी तळमळ भावी पिएीला तारणारी आहे. आ जागतिकीकरणात जगभरातले देश अस्वस्थतेचे जीणं जगताहेत. आपला देशही याला अपवाद नाही. लहान मुलांनी हसावं, खेळावं, हुंदडावं, मुक्तपणे समाज जीवनात आनंद भरुन टाकावा असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. मात्र दुर्दैवाने आम्ही या मुलांसाठी कोणत्या जगाची निर्मिती करत आहोत? दिवसेंदिवस असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आहे, ही अत्यंत घातक बाब कुटुंबव्यवस्थेला व समाजाला उद्ध्वस्त करणारी आहे. मुलांसाठी कवी पहात असलेली सुंदर स्वप्नं साकार करण्याची जबाबदारी समाजातील सर्वच संवेदनशील घटकांवर आहे याचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
Hatti Gela Sumachya Ghari