Prashant Publications

My Account

अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती

Research Methodology in Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789389492323
Marathi Title: Arthashastriya Sanshodhan Paddhati
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 206
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Athshashrache-Sanshodhan-Paddhati-by-Dr-Dilip-R-Jagtap-Dr-Sumitra-Pawar-Dr-Arun-U-Patil

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्‍या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.
सदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.
सदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

Arthashastriya Sanshodhan Paddhati

  1. संशोधनाचा परिचय : 1.1 प्रास्ताविक, 1.2 संशोधनाचा अर्थ, 1.3 संशोधनाचे प्रकार, 1.4 अर्थशास्त्रीय संशोधन
  2. संशोधन आराखडा : 2.1 संशोधन आराखड्याचा अर्थ, 2.2 संशोधन आराखड्याची आवश्यकता, 2.3 संशोधन आराखड्याची गरज, 2.4 चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये, 2.5 संशोधन आराखड्याचे प्रकार, 2.6 संशोधनाची गृहीतकृत्ये
  3. तथ्य संकलन (भाग 1) : 3.1 तथ्य संकलन – अर्थ व व्याख्या, 3.2 तथ्य संकलनाचे प्रकार, 3.3 प्राथमिक तथ्य संकलनाच्या पद्धती, 3.4 मुलाखत पद्धती, 3.5 प्रश्नावली पद्धती, 3.6 निरीक्षण पद्धती, 3.7 अनुसूची पद्धती, 3.8 सर्वेक्षण पद्धती
  4. तथ्य संकलन (भाग 2) : 4.1 दुय्यम तथ्ये, 4.2 दुय्यम तथ्य संकलनाच्या पद्धती (माध्यमे), 4.3 दुय्यम तथ्यांचे गुणदोष, 4.4 व्यष्टी अध्ययन/वैयक्तीक अध्ययन, 4.5 तथ्य संकलनाची ऐतिहासिक पद्धती
  5. संशोधन व नमुना निवड : 5.1 नमुना पद्धतीचा अर्थ व व्याख्या, 5.2 नमुना आकार, 5.3 सांख्यिकी पद्धती विरोधी नमुना पद्धती, 5.4 यादृच्छिक नमुना पद्धती, 5.5 दुहेरी नमुना पद्धती, 5.6 कोटा नमुना पद्धती (बहुहिस्सा नमुना पद्धती)
  6. तथ्यांचे विश्लेषण : 6.1 तथ्यांचे विश्लेषण- अर्थ, व्याख्या व स्वरूप, 6.2 तथ्य विश्लेषणाचे वर्गीकरण, 6.3 सारणीकरण अथवा कोष्टक, 6.4 वारंवारिता विभाजन, संचित वारंवारिता, वर्ग सीमा, मध्यबिंदू, वर्गांतर यांचा अर्थ, 6.5 आलेख व चित्र, 6.6 संशोधन अहवाल
RELATED PRODUCTS
You're viewing: अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close