अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (प्रारंभ ते 2000)
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
महाराष्ट्रात इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. इंग्रजांनी महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणले. शिक्षण प्रसारासाठी नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या. शाळांची निर्मिती केली. एत्द्देशियांना शिक्षण देण्यासाठी, धर्म प्रचारासाठी, विविध विषयांवरची पुस्तके निर्माण केली. विविध स्वरुपात, प्रकारात धार्मिक वाङ्मय मराठी भाषेतून निर्माण केले. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात प्रारंभ काल हा साधारणत: इ.स.1818 मानला जातो. त्याची उत्तर सीमा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या इ.स. 1874 साली सुरु झालेल्या निबंधमाला’पर्यंत संबोधली जाते.
इ.स. 1818 नंतरच्या अर्वाचीन मराठी वाङ्मयात इंग्रजी शिक्षणाच्या नव्या जाणिवांबरोबर, जुने वाङ्मय प्रकारही नव्या स्वरुपात साकार झाले. शिक्षणाचा प्रसार, मुद्रणाची व्यवस्था, वाचनाची आवड यांचा परिणाम म्हणून वाङ्मयाची सतत वाढ होत गेली. वाङ्मयाच्या क्षेत्रात नवे विचार, नवे सिद्धांत, नवे संप्रदाय, साहित्य विचार निर्माण झाले. बदलणार्या गतीमान मानवी जीवनाबरोबर साहित्याचे स्वरुपही पालटले. मराठी वाङ्मयाची कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, कविता, साहित्य विचार, समीक्षा विचार इत्यादी प्रकारात विपूल प्रमाणात निर्मिती होत गेली. वाङ्मय प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य, जनवादी साहित्य इत्यादी प्रवाहान्वये निर्मिती झाली.
मराठी वाङ्मयात विविध प्रकार आणि प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या साहित्याने विपुलता आलेली आहे. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे. काळ हा अखंड आहे. माणूस हाच प्रारंभ असून, विश्वाच्या पाठीवर माणूस असेपर्यंत वाङ्मय निर्मिती आहे. त्यामुळे वाङ्मयाचा शेवट अज्ञात आहे; असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.
अर्वाचीन कालखंड सुमारे दोनशे वर्षांचा आहे. प्राचीन कालखंडाच्या मानाने तसा लहान आहे. तरीही ह्या कालखंडात विविध प्रवाह, प्रकारांनी विविधापूर्ण वाङ्मय निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन समृद्धतेचा, विपुलतेचा विवेचक परामर्श घेण्याच्या हेतु:स्तव म्हणजेच सदरील पुस्तक लेखन होय.
Arvachin Marathi Wagmayacha Itihas
- मुद्रण पूर्वोत्तर कालखंड : 1) प्रास्ताविक, 2) मुद्रणपूर्व लेखन, 3) मुद्रणपूर्व ग्रंथ प्रेरणा, 4) मुद्रणोत्तर काल, 5) ख्रिस्ती धर्मप्रसार आणि वाङमय, 6) गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिनस्टन, 7) इंग्रजांचा शिक्षणप्रसार – मराठी वाङमय, 8) महाराष्ट्र नवसंस्कृती युगारंभ
- नियतकालिके आणि निबंध वाङ्मय : 1) नियतकालिक, 2) वृत्तपत्र, 3) निबंधवाङ्मय, 4) वृत्तपत्रेः 1) दर्पण 2) मुंबई अखबार 3) प्रभाकर 4) अन्य नियतकालिके, 5) मासिकेः 1) दिग्दर्शन 2) ज्ञान चंद्रोदय 3) उपदेशचंद्रिका 4) मराठी ज्ञान प्रसारक 5) विविध ज्ञान विस्तार, 6) दंभहारक, 6) आजकालची वाङ्मयीन नियतकालिकेः 1) नवभारत 2) आलोचना 3) वाङ्मयशोभा 4) वैखरी, 5) अस्मिता दर्श 6) प्रतिष्ठान 7) संशोधन पत्रिका 7) इतर नियतकालिके
- निबंध वाङ्मय – निबंधकार : 1) निबंधमाला पूर्व, 2) निबंधमालाकार – विष्णुशास्त्री चिपळूणकर, 3)लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख, 4) सुधारक – गोपाळ गणेश आगरकर, 5) केसरी – बाळ गंगाधर टिळक, 6) काळकर्ते – शिवराम महादेव परांजपे, 7) साहित्य सम्राट – नरसोपंत चिंतामण केळकर, 8) नवाकाळ – कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, 9) संदेश – अच्युत बळवंत कोल्हटकर, 10) भाषांतर – कै. विेशनाथ काशिनाथ राजवाडे, 11) ख्रिस्ती निबंधकार – 1) बाबा पदमनजी 2) श्रीमती फेरार, 12) निबंध वाङ्मय इ.स. 1920 च्या पुढे, 1) वामन मल्हार जोशी 2) काका कालेलकर 3) श्री. म. माटे, 13) काही निबंधकार
- लघुनिबंध निबंधकार : 1) मराठी निबंध, 2) लघुनिबंध, 3) लघुनिबंधकार – 1) प्रा.ना. सी.फडके 2) वि. स. खांडेकर 3) प्रा. अनंत काणेकर 4) वि. पां. दांडेकर, 5) इरावती कर्वे 6) ग. त्र्यं. माडखोलकर 7) श्रीनिवास कुळकर्णी, 4) काही निबंधकार
- मराठी रंगभूमी – नाट्यवाङ्मय : 1) नाट्यकला, 2) नाटक व्याख्या, 3) पाश्चात्य रंगभूमी, 4) भारतीय रंगभूमी, 5) नाट्य कला बीजे- 1) कळसूत्री बाहुल्यांचा खेळ 2) दशावतारी नाटके 3) लळिते 4) पोवाडे 5) तमाशा, 6) तंजावरची मराठी नाटके, 7) आद्य मराठी नाटककार, 8) नवे मन्वंतर, 9) फार्स प्रहसन, 10) बुकीश नाटके, 11) भाषांतरित नाटके – 1) संस्कृत नाटकांची भाषांतरे 2) इंग्रजी नाटकांची भाषांतरे, 12) ऐतिहासिक सामाजिक नाटके, 13) पौराणिक नाटके, 14) समारोप
- मराठी नाट्यवाङ्मय – नाटककार : 1) अण्णासाहेब किर्लोस्कर, 2) गोविंद बल्लाळ देवल, 3) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 4) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, 5) राम गणेश गडकरी, 6) भार्गवराम विठ्ठल वरेरकर, 7) प्रल्हाद केशव अत्रे, 8) मोतिराम गजानन रांगणेकर, 9) मराठी नाट्यसृष्टी – एक दृष्टीक्षेप, 10) विष्णु वामन शिरवाडकर, 11) प्रा. वसंत कानेटकर, 12) नाटककार विजय तेंडुलकर, 13) चि. त्र्यं. खानोलकर, 14) मराठी रंगभूमी – काही नाटककार, 15) मराठी रंगभूमी – विविध प्रवाह, 16) दलित रंगभूमी, 17) परळ रंगभूमी, 18) एकांकिका, 19) नाट्यछटा