आंतरराष्ट्रीय संबंध
International Relations (S-4)
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्र-राष्ट्रातील संबंधांसोबतच आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय करार, राजनय यांचादेखील विचार केला जात असतो. याशिवाय अनेक सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक घटक हे देखील आंतरराष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करण्याची क्षमता बाळगतात. माहिती व दूरसंचार क्षेत्रातील बदलांमुळे आता नवनवीन प्रसारमाध्यमांद्वारे आणि त्यांच्या साधनांद्वारे जागतिक जनमत घडवले जाते व त्यातून आंतरराष्ट्रीय संबंध प्रभावित होतात. याशिवाय आर्थिक संस्था तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या यादेखील राज्यांच्या पर राष्ट्रीय धोरण निर्मिती प्रक्रियेला प्रभावित करीत असतात. दहशतवाद, पर्यावरणीय समस्या तसेच करोनासारख्या आरोग्यदायी समस्यांमुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. लोकशाहीकरण्याच्या मार्गात देखील अनेक अडथळे निर्माण होत आहेत. दुसरीकडे जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांना तिसऱ्या जगातील देश बळी पडत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून अस्तित्वात असलेल्या अमेरिकेसमोर चीन व्यापार व आर्थिक क्षमतेच्या आधारे आव्हान उभे करू पाहत आहे त्यामुळे भूराजकीय समीकरणे बदलत आहेत. पूर्वी महासत्तांमधील तणाव कमी करण्यासाठी अलिप्त राष्ट्रगट एक हक्काचे व्यासपीठ होते. परंतु आता या चळवळीला मरगळ आली आहे तिला नव्या स्वरुपात उभे करणे गरजेचे आहे. चीन हा भारताच्या शेजारी देश असल्यामुळे भारतीय उपखंडातील प्रादेशिक संघटना व परराष्ट्र धोरणावर अमेरिका-चीन संबंधांचा निश्चितच परिणाम होणार आहे. इत्यादी मुद्द्यांचा या पुस्तकात सविस्तरपणे विचार करण्यात आला आहे.
Antarrashtriya Sambhand
- आंतरराष्ट्रीय संबंध : 1.1 प्रस्तावना, 1.2 आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, 1.3 आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या, 1.4 आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास, 1.5 आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप, 1.6 आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती, 1.7 आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्व.
- आंतरराष्ट्रीय संबंधाचे दृष्टीकोन : 2.1 आदर्शवादी दृष्टिकोन, 2.2 वास्तववादी सिद्धांत, 2.3 व्यवस्थावादी सिद्धांत, 2.4 मार्क्सवाद.
- दुसरे महायुद्ध आणि शीत युद्ध : 3.1 दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, 3.2 दुसऱ्या महायुद्धाची वैशिष्ट्य, 3.3 शीतयुद्ध, 3.4 शितयुद्धाची कारणे, 3.5 शितयुद्धाच्या अवस्था, 3.6 शीतयुद्ध समाप्तीचे कारणे, 3.7 शीतयुद्धानंतरची जागतिक व्यवस्था.
- आंतरराष्ट्रीय संघटना : 4.1 संयुक्त राष्ट्र संघटना, 4.2 आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना, 4.3 प्रादेशिक संघटना.
- गटनिरपेक्षतेचा सिद्धांत : 5.1 गटनिरपेक्षतेचा अर्थ आणि मुलभूत सिद्धांत, 5.2 गटनिरपेक्षतेचा उदय, 5.3 गटनिरपेक्षता एक चळवळ, 5.4 शीतयुधोतर काळात गटनिरपेक्ष चळवळीची प्रासंगिकता.
- जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध : 6.1 जागतिकीकरणाचा अर्थ, 6.2 जागतिकीकरणाचा विकास आणि परिणाम, 6.3 जागतिकीकरणाच्या मर्यादा, 6.4 राज्याची भूमिका.
- आंतरराष्ट्रीय संबंधातील राजकीय अर्थव्यवस्था : 7.1 नववसाहतवाद, 7.2 नवीन आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, 7.3 दक्षिण-उत्तर विभागणी, 7.4 दक्षिण-दक्षिण सहकार्य.
- समकालीन जागतिक समस्या : 8.1 आंतरराष्ट्रीय दहशतवाद, 8.2 पर्यावरण समस्या, 8.3 दारिद्य्र, विकास आणि भूक (अन्न) समस्या, 8.4 मूलभूत हक्क.