Prashant Publications

My Account

आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या

International Security Issues

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493320
Marathi Title: Antarrashtriya Surksha Samasya
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 268
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Antarrashtriya-Surksha-Samasya-by-Dr-Devendra-G-Vishpute

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

दुसर्‍या देशावर आक्रमण करुन त्याच्या जमिनीवर कब्जा करणे आता अशक्य आहे, या संभावित अंदाजाला आज चीनच्या आक्रमक व निष्ठूर धोरणाने तडा जावून युध्दाची प्रमेये बदल्याचा समज फोल ठरतो आहे. जगात संघर्षाचे स्वरुप बदलून त्यात विद्यूत गतीने फेरबदल होत आहेत. पारंपरिक युध्दांची जागा आता दहशतवाद, अराष्ट्रीय घटकांचा हिंसाचार व धार्मिक मूलतत्त्ववादाने घेतलेली आहे. शीतयुध्दानंतर जगातील संघर्ष कमी होतील; युध्द जवळपास नष्ट होऊन सर्वसमावेशक लोकशाहीची प्रस्थापना जगात सर्वदूर होईल या भाकीताला तडे गेले आहेत. एकीकडे अण्वस्त्र-अवकाश स्पर्धा, सायबर हल्ले, वैचारीक व मूलतत्त्ववादी संघर्ष, इस्लामी दहशतवाद्यांचे घृणास्पद अमानवीय कृत्ये, आर्थिक युध्दाचे वातावरण तर दुसरीकडे मानवी प्रमादांमुळेच निर्माण झालेले निसर्गाचे असंतुलन यामुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचे जीवघेणे आगमन हेदेखील अत्यंत चिंताजनक आहे. प्रस्तुत पुस्तकात या सर्व मुद्द्यांचा यथायोग्य आढावा घेण्यात आलेला आहे.

Antarrashtriya Surksha Samasya

  1. आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – आंतरराष्ट्रीय सुरक्षेतील सद्यकालीन प्रवाह, अमेरिका केन्द्रित विश्वरचना (ब) राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा – राष्ट्रीय सुरक्षा, परकीय पाठबळामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यात वाढ, आंतरराष्ट्रीय सुरक्षा (क) पारंपरीक सुरक्षा आणि अपारंपरीक सुरक्षा – पारंपरिक सुरक्षा, अपारंपरिक सुरक्षा (ड) 21व्या शतकातील सुरक्षा डावपेच – संघर्षाची कारणे, अमेरिकेचे भावी डावपेच, अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा रणनीती, रशियाचे भविष्यकालीन सुरक्षा धोरण, चीनची आक्रमक व विस्तारवादी सुरक्षा नीती; समारोप
  2. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोरील अराजकीय घटकांचे आव्हान : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – अराष्ट्रीय घटकांची वैशिष्ट्ये (ब) वांशिक संघर्ष – म्यान्मार, पाकिस्तान, चीन, भारत, सुदान, नायजेरिया, कांगो, दक्षिण आफ्रिका, युगोस्लाव्हिया, क्रोऐशिया, बोस्निया व हर्झेगोविना, कोसोवो, सर्बिया, रशिया, श्रीलंका, कूर्द लोकांची समस्या, इंडोनेशिया (क) संघटीत गुन्हेगारी – मुंबईचे अंडरवर्ल्ड, संघटीत गुन्हेगारीला व्यवसायाचे स्वरुप, गुन्हेगारी टोळ्या, मादक पदार्थ, नियंत्रणासंबंधीचे आंतरराष्ट्रीय करार (ड) बेकायदा तस्करी (मादक पदार्थ, मानवी व छोट्या शस्त्रांस्त्रांची तस्करी) – मादक पदार्थांची तस्करी, व्यसनाचा भस्मासूर, मादक पदार्थांचा नरक : अफगाणिस्तान, कोकेनची अवैध तस्करी, संपूर्ण जगात जाळे; मानवी तस्करी, छोट्या शस्त्रांस्त्रांची तस्करी, छोट्या व हलक्या शस्त्रांचा ओघ (इ) उपाययोजना; समारोप
  3. पर्यावरण सुरक्षा : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – पर्यावरण असंतुलनाच्या दुष्परिणामांना प्रारंभ, पर्यावरण असंतुलन : सर्वात गहन समस्या (ब) वाढत्या लोकसंख्येचा आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम (क) वैश्विक तापमानवृध्दी आणि हरीतगृह प्रभाव – वैश्विक तापमान वृध्दी, आम्ल पर्जन्य, ओझोन वायुचा क्षय, हरितगृह परिणाम, पॅरीस करार, भारताचा वचननामा, वायुंच्या उत्सर्जनाचे प्रमाण, आर्थिक क्षेत्र-उर्जेचा वापर (ड) उर्जा, जल आणि अन्न सुरक्षा – उर्जा सुरक्षा, बहुसंख्य देशांचे परावलंबन, जल सुरक्षा, पाणी-अन्न सुरक्षा, अन्न टंचाईची कारणे, उपासमारी, कुपोषणात वाढ (इ) पर्यावरण सुरक्षेसाठीच्या उपाययोजना – विकसित देश विरुध्द विकसनशील देशातील वाद, पर्यावरण सुरक्षेसाठीचे प्रयत्न; समारोप
  4. व्यापार आणि आर्थिक संघर्ष : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य (ब) नैसर्गिक संसाधनांची चणचण – जागतिक खाद्यान्न उत्पादन, जागतिक खनिज उत्पादन, जागतिक उर्जा संसाधन उत्पादन, संसाधनांची चणचण, नैसर्गिक संसाधनांच्या तुटवड्यामागची कारणे (क) राष्ट्रांमधील व्यापार स्पर्धा (अमेरिका, रशिया, चीन, जपान, भारत) – जागतिक व्यापार, प्रमुख आयात व निर्यातदार देश, प्रमुख देशांची आयात-निर्यात, अमेरिका व रशियातील व्यापार संघर्ष, अमेरिकेचा रशियासोबतचा व्यापार, अमेरिका-चीन व्यापार युध्द, अमेरिकेचा चीनसोबतचा व्यापार, भारत-चीन व्यापार संबंध, अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार, भारत-चीन व्यापार (ड) विकसनशील देशांच्या समस्या, उपाययोजना; समारोप
  5. राष्ट्रांमधील धार्मिक व विचारधारेचा संघर्ष : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – संस्कृतींदरम्यानचा संघर्ष, सॅम्युएल हन्टिग्टन, डॉ. फ्रान्सिस फुकुयामा, अ‍ॅरनॉल्ड टॉयन्बी, बर्नार्ड लुईस, मॅक्स सिंगर व अ‍ॅरोन बिल्डाव्हस्की (ब) विश्वव्यापी वाढता धार्मिक मूलतत्ववाद – संघर्षात धार्मिक कारणांचे प्राबल्य (क) विविध आंतरराष्ट्रीय संघर्ष क्षेत्र – इराक आणि सिरिया, अफगाणिस्तान, इराण, उत्तर कोरीया; समारोप
  6. राष्ट्रांमधील आण्विक आणि अवकाश स्पर्धा : प्रस्तावना, संकल्पना, घोषित आणि अघोषित अण्वस्त्रधारी राष्ट्रे, अणुयुगाचा प्रारंभ, मॅनहॅटन प्रकल्प, पहिला अणुस्फोट, अण्वस्त्र सज्जतेचा इतिहास, हिरोशिमा, नागासाकी, जगाच्या अण्वस्त्र विकासाचे टप्पे (अ) अमेरिका विरुध्द रशिया – अवकाश स्पर्धेची अहममिका, उत्तर अटलांटिक करार संघटना-नाटो, वार्सा करार, तणाव कमी करण्याचे प्रयत्न (ब) अमेरिका विरुध्द चीन – अमेरिकेची चीनविरुध्द जोरदार आघाडी (क) भारत विरुध्द चीन – अमेरिकेचे सामरिक कार्यक्रम, अमेरिकेचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, सोव्हिएत रशियाचे सामरिक कार्यक्रम, इंग्लडचा अवकाश व आण्विक कार्यक्रम, फ्रान्सचा अवकाश व आण्विक कार्यक्रम, चीनचा अवकाश व आण्विक कार्यक्रम, भारताची स्वदेशी तंत्रज्ञानाचा आधारे प्रगती, आण्विक कार्यक्रम, भारताचा दैदिप्यमान अवकाश कार्यक्रम, पाकिस्तानचा अणू बॉम्ब, आंतरराष्ट्रीय अणू उर्जा आयोग, एनपीटी किंवा अण्वस्त्र प्रसारबंदी करार, अण्वस्त्र चाचणी बंदी करार (सीटीबीटी) (ड) आण्विक पुरवठा गटाची भूमिका – भारतच मुख्य लक्ष, चीनचा भारत विरोध; समारोप
  7. सायबर सुरक्षा समस्या : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना – इंटरनेट हेच शस्त्र (ब) सायबर गुन्हे – सायबर गुन्ह्याचे प्रकार, सायबर गुन्ह्यांचे विघातक परिणाम, भारताशी प्रतिस्पर्धी देशांचे सायबर युध्द, सायबर हल्ला ही आंतरराष्ट्रीय समस्या, सायबर गुन्ह्यांसंबंधीचे कायदे (क) आंतरराष्ट्रीय सुरक्षेला असलेले धोेके – अभासी गुन्हेगारी, काही देशांचाही सहभाग (ड) सायबर गुन्ह्यांपासून प्रतिबंध – सायबर गुन्ह्यांच्या घटना व त्याविरुध्दच्या तरतुदी, भारतातील सायबर कायदे; समारोप
  8. मानवी सुरक्षा समस्या : प्रस्तावना; (अ) अर्थ आणि संकल्पना (ब) मानवी सुरक्षेचे महत्त्व (क) मानवी सुरक्षेचे प्रकार – (1) आरोग्य सुरक्षा – साथीचे आजार, आंतरराष्ट्रीय आरोग्य सुरक्षा कार्यक्रम पत्रिका, आंतरराष्ट्रीय सुरक्षेची जोखीम, कोरोना/कोविड-19, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला (2) व्यक्ती सुरक्षा – मोकळा श्वास हवा! (3) सामाजिक सुरक्षा (ड) मानवी सुरक्षेसमोरील धोके – (1) हिंसाचार (2) स्थलांतर (3) दारिद्य्र; समारोप
RELATED PRODUCTS
You're viewing: आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close