आत्मविश्वास
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
जीवनानंदाचे सुख-समाधान प्राप्त करणे हे व्यक्ती-व्यक्तीचे कर्तव्य आहे. भीतीग्रस्त आयुष्य, सुख-समाधान, आनंद उपभोगू शकत नाही. जीवनात भीतीचा प्रवेश निरनिराळ्या मार्गांनी, घटनांनी होत असतो. त्यातही संशयाचे भूत फक्त भीतीच निर्माण करीत नाही तर पदोपदी आपल्या शक्तीस, मनोधैर्यास, आत्मबलास नष्ट करीत असते. त्याच संशयाच्या भीतीमधून पापकृत्य, क्रोध-राग किंवा अनैसर्गिक, अवांछित कार्य होत असते. मनाचा संकुचितपणा, मनातील भीती, मनातील साशंकता, मनावरील ताण, मनातील चिंता-काळजी, मनाची निराशा तुमच्या आत्मविश्वासाला धक्का पोहचवितात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मनावर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे, मनात भीतीचा लवलेशही निर्माण होवू देता कामा नये, मनावर कोणत्याही प्रकारे ताण-तणाव ठेवता कामा नये. जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी सकारात्मक दृष्टीकोनाबरोबर आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. मनोधैर्य किंवा आत्मबल व्यक्तीला सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचविते. उच्च मनोधैर्याच्या मानसिकतेतूनच भारतमातेची सुरक्षा अबाधित आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या, गावाच्या, देशाच्या कल्याणासाठी आपणही आपला आत्मविश्वास वाढवावा त्यासाठीच्या प्रक्रियेसाठीच हा लेखनप्रपंच!
Aatmavishwas
- आत्मविश्वासाचा आधार
- निर्भिडपणा
- भावना
- प्रेम
- तद्नुभूती
- राग/संताप
- ताण-तणाव
- मैत्री-स्नेह
- प्रेरणा
- सर्जनशीलता
- सकारात्मक
- इच्छाशक्ती
- ध्येय-लक्ष्य
- नैतिकता-मूल्ये
- निर्णय
- जबाबदारी
- संशय
- नेतृत्व