आधुनिक जगाचा इतिहास (1780 ते 1919)
Modern World History (1780 to 1919)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी समाजाच्या इतिहासात 15 वे शतक हे नवविचार, नवसमाजरचना, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे ठरले. येथूनच आधुनिक युगास प्रारंभ झाला. याच कालखंडात मानवतावाद निर्माण होऊन ‘मानव’ हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. या कालखंडात अनेक विचारवंत उदयास आले. त्यांच्या नवविचारांनी वैचारीक क्रांती होण्यास सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होवू लागला. राजसत्ता व धर्मसत्तेला हादरे बसू लागले. 18 व्या शतकात अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समध्ये फे्रंच राज्यक्रांती झाल्याने त्यांचा परिणाम सर्वत्र होवून तत्कालिन काळात त्याचे प्रतिबिंब उमटले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संपूर्ण जगावर परिणाम करणार्या या घटना होय. सर्वच देशात नवे विचार, नवी राजकीय, सामाजिक व्यवस्था अशा नवयुगाचा प्रारंभ झाला.
प्रस्तुत पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती ते राष्ट्रसंघाची निर्मिती व कार्यापर्यंतचा जगाचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच नेपोलियन बोनापार्ट, व्हिएन्ना काँग्रेस, बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा, रशिया-जपान युद्ध, त्रिराष्ट्र मैत्री करार, पहिले महायुद्ध, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय, समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना, रशियन राज्यक्रांती, पॅरिस शांतता परिषद, विविध तह व करारनामे, राष्ट्रसंघ व दुसर्या महायुद्धाकडे वाटचाल या प्रमुख विषयांचा समावेश असून विषयाची मांडणी साधी सोपी व सर्वांना समजेल अशी आहे.
Aadhunik Jagacha Itihas (1780 te 1919)
- फ्रेंच राज्यक्रांती : राज्यक्रांतीची कारणे – 1) जुलमी राजसत्ता 2) 16 वा लुई 3) मेरी अन्त्वायनेत 4) आर्थिक दूरावस्था 5) सामाजिक व आर्थिक विषमता 6) अमेरीकन स्वातंत्र्ययुध्द
- नेपोलियन बोनापार्ट : नेपोलियनच्या मोहीमा; संचालक मंडळाची समाप्ती; ऑस्ट्रियाचा पराभव; फ्रान्स व इंग्लंड यांच्यात तह; नेपोलियनने फ्रान्समध्ये केलेल्या सुधारणा- 1) नेपोलियन संहिता 2) धार्मिक करार
- व्हिएन्ना काँग्रेस : व्हिएन्ना काँग्रेसने स्वीकारलेले सिद्धांत – सत्ता संतुलन, न्याययुक्तता, नुकसान भरपाई, परिषदेने घेतलेले निर्णय – आस्ट्रिया, प्रशिया, इंग्लंड, रशिया, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, इटली
- राष्ट्रांची निर्मिती – इटली व जर्मनी : (अ) इटलीचे एकीकरण- नेपोलियनचे योगदान, व्हिएन्ना काँग्रेस आणि इटलीचे विघटन (1815), क्रांतिकारी चळवळीची सुरवात, जोसेफ मॅझिनी, काऊंट कॅमिलो डी काव्हूर
- बिस्मार्कच्या नेतृत्वाखालील जर्मनीचे परराष्ट्र धोरण : तीन सम्राट (त्रि सम्राट) संघ (1872), जर्मनी-ऑस्ट्रिया द्विमित्र करार (1879), इटली-ऑस्ट्रिया-जर्मनी त्रिमित्र करार (1882)
- कैसर विल्यम दुसर्याच्या नेतृत्वातील जर्मनी : अंतर्गत धोरण- 1) समाजवाद विषयक धोरण 2) औद्योगिक विकास; जर्मनीची लष्करी प्रगतीत वाढ; कैसर विल्यम दुसर्याचे परराष्ट्र धोरण
- त्रिराष्ट्र मैत्री करार (1907) : फ्रान्स-रशिया मैत्री कराराची पार्श्वभूमी, फ्रान्स-रशिया जवळीकता व करार (1894), इंग्लंड व फ्रान्स मैत्री कराराची पार्श्वभूमी, इंग्लंड-फ्रान्स द्विराष्ट्र मैत्री करार (1904)
- रशिया-जपान युद्ध (1904-1905) : रशियाचा साम्राज्यवाद व चीनमध्ये प्रवेश
- पहिल्या महायुद्धाची कारणे व परिणाम : पहिल्या महायुध्दाची कारणे- 1) राष्ट्रांमधील गुप्त करार व दोन गटात विभागणी 2) लष्करात व शस्त्रांत प्रचंड वाढ 3) आत्यंतिक राष्ट्रवाद 4) वसाहत स्पर्धा
- पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा प्रवेश : अमेरिकन अध्यक्ष विड्रो विल्सन, विल्सनची 14 तत्वे
- समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना : (अ) समाजवाद समाजवादाची मूलतत्वे
- रशियन राज्यक्रांती : कारणे व परिणाम (इ.स.1917) : निहिलिझमचा उदय; रशियन क्रांतीची कारणे
- पॅरिस शांतता परिषद (इ.स.1919)
- तह – व्हर्साय, सेंट जर्मेन, न्युली, ट्रीनॉन, सिव्हर्स : (अ) व्हर्सायचा तह – व्हर्सायच्या तहाचे मूल्यमापन
- राष्ट्रसंघ : राष्ट्रसंघाचा उगम; राष्ट्रसंघाची ध्येये व उद्दिष्ट्ये; रचना – 1) आमसभा 2) समिती