आधुनिक जगातील घडामोडी
Glimpses of the Modern World
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले. बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात होऊन मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करून सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतता राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करून घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांंततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला.
प्रस्तुत पुस्तकात प्रबोधनाचे युग, धार्मिक सुधारणा चळवळी, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इटाली व जर्मनीचे एकीकरण, मेईजी क्रांती, पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय, विविध शांतता परिषदा, राष्ट्रसंघ, रशियन राज्यक्रांती, शीत युद्ध आणि सोव्हिएत रशियाचे विघटन इ. विविध मुद्द्यांचा सखोल विचारविमर्श केलेला आहे.
Adhunik Jagatil Ghadamodi
- आधुनिक युग : (अ) प्रबोधन – पार्श्वभूमी आणि स्वरूप, (ब) धार्मिक सुधारणा चळवळी – मार्टिन ल्युथर किंग
- क्रांतीचे युग : (अ) अमेरिकन राज्यक्रांती – कारणे आणि परिणाम, (ब) फे्रंच राज्यक्रांती – कारणे आणि परिणाम, (क) औद्योगिक क्रांती – कारणे आणि परिणाम
- राष्ट्रवाद : (अ) इटालीचे एकीकरण, (ब) जर्मनीचे एकीकरण, (क) जपान – मेईजी क्रांती
- पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय : (अ) पहिले महायुद्ध – कारणे आणि परिणाम, (ब) पॅरिस शांतता परिषद, (क) राष्ट्रसंघ, (ड) रशियन राज्यक्रांती – कारणे आणि परिणाम
- आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रीय चळवळी : (अ) डॉ. सन-यत्-सेन, (ब) म. गांधीजी – असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव आंदोलन, (क) डॉ. नेल्सन मंडेला
- हुकुमशाहीचा उदय : (अ) इटाली – मुसोलिनी, (ब) जर्मनी – हिटलर, (क) तुर्कस्तान – केमाल पाशा, (ड) जपानमधील लष्करवाद
- दुसरे महायुद्ध आणि जागतिक शक्तींचा उदय : (अ) दुसरे महायुद्ध – कारणे आणि परिणाम, (ब) संयुक्त राष्ट्र संघटना – रचना आणि कार्य
- शीतयुद्ध आणि तिसरे जग : (अ) शीतयुद्ध – कारणे, स्वरूप आणि घटना, (ब) जागतिक शक्तींचा उदय – अमेरिका, रशिया, (क) तिसरे जग – अलिप्ततावादी गटाची चळवळ, (ड) शीतयुद्धाचा शेवट आणि सोव्हिएत रशियाचे विघटन