आधुनिक भारताचा इतिहास (1757 ते 1857)
History of Modern India (1757 to 1857)
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Adhunik Bharatacha Itihas (1757 to 1857)
- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील कामगिरी : युरोपियन व्यापार्यांच्या आगमनापूर्वीची भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती, भारतात युरोपियन व्यापाराचा प्रारंभ व विकास, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी विकास व प्रभाव, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील उद्योगधंदे, ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हेस्टिंग्ज, जॉन अॅडम्स, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड डलहौसी
- ब्रिटिश प्रशासन (इ.स. 1757 ते इ.स. 1857) : ब्रिटिश प्रशासनाचे स्वरुप व रचना, ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक धोरण, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, एल्फिन्स्टनचे प्रशासन, शिक्षण, मुद्रण व वृत्तपत्रे, महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, ख्रिश्चन धर्म प्रसारकांचे कार्य.
- ब्रिटिश प्रशासनाचे धोरण : 1858 चा भारताच्या सुशासनाचा कायदा, भारताचे प्रशासन, प्रशासकीय धोरण, भारतीय वृत्तपत्रावरील निर्बंध, ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचे व धोरणाचे परिणाम.
- ब्रिटिश सरकारचे भारताच्या शेजारील राष्ट्रांविषयीचे धोरण : नेपाळ, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, सिक्कीम, भुतान
- सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ : राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, प्रार्थना समाज
- प्रारंभीचे समाज व धर्मसुधारक : जगन्नाथ शंकर शेठ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, डॉ. भाऊ दाजी लाड, महात्मा जोतिराव फुले.
- उत्तरकाळातील समाजसुधारक : महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज.
- 1857 चे स्वातंत्र्य युद्ध : उठावाची कारणे, वाटचाल, महाराष्ट्रातील उठाव, अपयशाची कारणे, परिणाम व महत्त्व.