- DESCRIPTION
- INDEX
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला असला तरी येथील अराजकतेचा फायदा घेऊन कंपनीने आपले राज्य स्थापन केले. कंपनीने भारत देशाचे आर्थिक शोषण सुरु केले. परंतु पुढे भारतीय लोकांमध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक जागृती झाली. यामधुनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. यापूर्वीच इ.स. 1858 मध्ये भारतावरील कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन व येथे ब्रिटनची सत्ता स्थापन झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याच आंदोनालात क्रांतिकारक व स्त्रियानीही महत्त्वाचे योगदान दिले. शेतकरी व आदिवासी लोकांनी केलेले उठाव व केलेल्या चळवळी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. संस्थानातील जनतेनेही प्रतिगामी राजवटींच्या विरोधात चळवळी केलया होत्या. राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम लीग दूर राहीली. यामधूनच पुढे पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. इ.स. 1858 पासून इ.स. 1947 पर्यंतचा भारताचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विविध स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.
Adhunik Bharatacha Itihas
1) भारतीय राष्ट्रवादाचा उदय, 2) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 3) जहालवादाचा उदय व विकास, 4) होमरूल चळवळ, 5) गांधी युगातील चळवळ, 6) मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, 7) राष्ट्रीय चळवळ व इतर पक्ष, 8) 1857 च्या उठावातील स्त्रिया, 9) राष्ट्रीय चळवळीतील स्त्रिया, 10) क्रांतिकारी चळवळीतील स्त्रिया, 11) महाराष्ट्रातील क्रांतीकारी चळवळ, 12) भारतीय क्रांतिकारकांचे परदेशातील कार्य, 13) संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ, 14) शेतकर्यांची चळवळ, 15) आदिवासींचे उठाव व चळवळी, 16) आधुनिक भारतातील खालच्या जातींच्या चळवळी, 17) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार व कार्य, 18) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व, 19) स्वामी दयानंद सरस्वती, 20) रामकृष्ण परमहंस, 21) स्वामी विवेकानंद