आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)
Military System of Modern India (Up to 1947)
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.
Aadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)
- ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत सेना दल : अ) प्रास्ताविक, ब) प्रेसीडन्सी सैन्याची स्थापना व विकास, i) मद्रास सैन्य, ii) बंगाली सैन्य, iii) मुंबई सैन्य, क) रॉबर्ट क्लाईव्ह आणि लॉर्ड कार्नवालीसच्या सुधारणा.
- 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध : अ) प्रस्तावना, ब) उठावाची लष्करी कारणे, क) उठावाची व्याप्ती, ड) बंडाचे परिणाम.
- भारतीय सैन्याचे राष्ट्रव्यापी स्वरूप : अ) प्रस्तावना, ब) भारतीय राष्ट्रीय सेनेची स्थापना, क) भारतीय सैन्याचा उदय, ड) गणवेश आणि शस्त्रास्त्रे, इ) ईशान्य भारताच्या समस्या, i) भूतान, ii) सिक्कीम, iii) मणिपूर.
- भारतीय सेनेतील लॉर्ड किचनेरच्या सुधारणा : अ) प्रस्तावना, ब) अधिकारी हुद्द्याचे भारतीयकरण, क) किचनेरच्या सुधारणा, ड) तिबेट मोहिम, इ) पोशाख आणि साधने.
- नौसेना व वायुसेनेचे भारतीयकरण : अ) प्रस्तावना, ब) भारतीयकरणातील प्रगती, i) स्किन समिती, ii) नेहरू रिपोर्ट, क) भारतीय लष्करी प्रबोधिनी स्थापना, ड) भारतीय नौसेनेची स्थापना, इ) भारतीय वायुसेनेची स्थापना, फ) चॅटफिल्ड समिती.
- दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याची भूमिका : अ) प्रस्तावना, ब) भारतीय सैन्याची परिस्थिती, क) युद्ध योजनांमधील भारताची भूमिका, ड) चौथी भारतीय डिव्हिजन, इ) व्हिक्टोरिया क्रॉस विजेते.