आधुनिक भारतीय भाषा : मराठी
Modern Indian Languages : Marathi
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांना माध्यमांची भाषा सांगणं, माध्यम समजावून सांगणं आणि संवादाच्या या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. जग बदलतं त्याच प्रमाणात परस्परसंबंध बदलतात आणि भाषाही बदलत जाते. भाषेच्या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय समज नसेल, तर त्यांना संवादाचे प्रयोजन समजत नाही आणि परिणामही समजत नाहीत.
हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण, ते विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने आधुनिक करते. नव्या जगाची भाषा शिकवते. व्यवहाराशी नाते जोडत, बदलांना आत्मसात करत पुढे जाण्यासाठी सज्ज करते. हे पुस्तक केवळ नव्या माध्यमविश्वाचे बाह्यरूप सांगत नाही, तर बदलाच्या या प्रक्रियेचे अंतर्बाह्य विश्लेषण करते. विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने आधुनिक करते. म्हणून या अभ्यासक्रमाच्याच नव्हे, तर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण ‘माध्यम’ आणि ‘संज्ञापन’ समजल्याशिवाय बदलणार्या जगाचे भान येणार नाही!
माझे तरूण सन्मित्र डॉ. हरेश शेळके तसेच डॉ. गीतांजली चिने या प्राध्यापकांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे मी त्यामुळेच स्वागत करतो.
संजय आवटे
राज्य संपादक, ‘दिव्य मराठी’ 2016 मध्ये भरलेल्या भूतान येथील
सहावे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
Adhunik Bhartiya Bhasha : Marathi
सत्र पहिले : मराठी भाषिक संज्ञापन कौशल्ये
- भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध : 1.1 प्रास्ताविक, 1.2 भाषेच्या व्याख्या, 1.3 भाषा आणि व्यक्तिमत्त्व यांचा सहसंबंध
- लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे : 2.1 प्रस्तावना, 2.2 भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे, 2.3 प्रसारमाध्यमांची स्वतंत्रता, 2.4 प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार, 2.5 प्रसारमाध्यमे आणि न्यायालये, 2.6 प्रसारमाध्यमे व इतर कायदे, 2.7 प्रसारमाध्यमाची तत्त्वे
- वृत्तपत्रांसाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन : 3.1 प्रास्ताविक, 3.2 बातमी म्हणजे काय?, 3.3 वृत्तपत्रासाठी बातमी लेखन, 3.4 वृत्तपत्रातील बातमीचे विषय, 3.5 वृत्तपत्रातील बातमीची रचना, 3.6 वृत्तपत्रातील बातमीची भाषा, 3.7 वृत्तपत्रातील मुद्रितशोधन
- नभोवाणीसाठी भाषणाची संहिता लेखन : 4.1 प्रास्ताविक, 4.2 नभोवाणीसाठी भाषणाची संहिता लेखन, 4.3 समारोप
- दूरचित्रवाणी, माहितीपटासाठी संहिता लेखन : 5.1 प्रास्ताविक, 5.2 दूरचित्रवाणीपटासाठी संहिता लेखन, 5.3 महितीपटासाठी संहिता लेखन, 5.4 तंत्राधारित चित्रपट वर्गीकरण, 5.5 माहितीपट : 5.5.1 माहितीपट म्हणजे काय?, 5.5.2 माहितीपट निर्मितीचे हेतू, 5.5.3 माहितीपटाचे संहितालेखन, 5.5.4 माहितीपटाची संहिता लेखनाच्या तीन पायर्या, 5.5.5 माहितीपटाचे महत्त्व, 5.6 समारोप
सत्र दुसरे : नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी
- भाषा, जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे, समाजमाध्यमे : 1.1 भाषा : 1.1.1 प्रास्ताविक, 1.1.2 भाषा : एक सामाजिक संस्था, 1.1.3 भाषा समृद्धीच्या अनेक बाजू, 1.1.4 भाषा आणि जीवन व्यवहार, 1.1.5 भाषा आणि माध्यमे, 1.2 जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे, 1.2.1 प्रास्ताविक, 1.2.2 सुरूवातीची माध्यमे, 1.2.3 वृत्तपत्र, 1.2.4 नियतकालिके, 1.2.5 आकाशवाणी, 1.2.6 दूरदर्शन, 1.3 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे, 1.3.1 प्रास्ताविक
- नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार : ब्लॉग, फेसबुक, ट्वीटर : 2.1 प्रास्ताविक, 2.2 नवमाध्यमे म्हणजे काय, 2.3 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार : 2.3.1 ब्लॉग, 2.3.2 फेसबुक, 2.3.3 ट्वीटर
- नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयक साक्षरता, दक्षता, वापर आणि परिणाम : 3.1 प्रास्ताविक, 3.2 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे साक्षरता, 3.3 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे दक्षता, 3.4 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे वापर, 3.5 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे परिणाम : 3.5.1 सकारात्मक परिणाम, 3.5.2 नकारात्मक परिणाम
- वेबसाईट आणि ब्लॉग, ट्वीटरसाठी लेखन : 4.1 वेबसाईट, 4.1.1 वेबसाईट म्हणजे काय, 4.1.2 मराठी वेबसाईटची गरज, 4.1.3 वेबसाईटचे प्रकार, 4.1.4 स्वत:ची वेबसाईट कशी तयार कराल, 4.1.5 प्रोफेशनल वेबसाईट कशी तयार करायची, 4.2 ब्लॉग, 4.2.1 ब्लॉगचे प्रकार, 4.2.2 ब्लॉग तयार करतेवेळी योग्य प्लॅटफॉर्मची निवड, 4.2.3 ब्लॉग कसा तयार करावा, 4.2.4 पुढील ब्लॉगला नक्की भेट द्या, 4.3 ट्वीटर : 4.3.1 ट्वीटर कसे वापरायचे समजून घेऊयात, 4.3.2 ट्वीटरवर ट्वीट कशी पाठवतात, 4.3.3 ट्वीटर मुमेंटसविषयी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम, 4.3.4 उत्तम ट्वीट्स कसे निवडाल
- व्यावसायिक पत्रव्यवहार : 5.1 पत्रलेखन, 5.1.1 पत्रलेखनाचे मुख्य प्रकार, 5.1.2 चांगले पत्रलेखन करताना कोणती काळजी घ्यायची, 5.1.3 पत्रलेखन कसे करावे, 5.1.4 मराठी पत्रलेखन मोबाईल अॅप्लीकेशनविषयी माहिती