Prashant Publications

My Account

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

History of Modern Maharashtra

Authors: 

ISBN:

SKU: 9789395227926
Marathi Title: Aadhunik Maharashtracha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2023
Pages: 344
Edition: First

450.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

Aadhunik Maharashtracha Itihas

1. महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळ 
1) 19 व्या शतकापूर्वीचा महाराष्ट्र
2) प्रबोधन चळवळ
3) महाराष्ट्रातील समाजसुधारणा संस्था व संघटना
4) महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची कामगिरी
5) महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती
6) महाराष्ट्राची आर्थिक स्थिती

2. महाराष्ट्रातील समाजसुधारक 
1) महात्मा फुले (इ.स.1827-1890)
2) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (इ.स.1823-1892)
3) जगन्नाथ शंकरशेठ (इ.स.1803-1865)
4) आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ.स.1812-1846)
5) विठ्ठल रामजी शिंदे (इ.स.1873-1944)
6) राजर्षी छत्रपती शाहू महाराज (इ.स.1874-1922)
7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर (इ.स.1891-1956)
8) डॉ.भाऊ दाजी लाड (इ.स.1827-1874)
9) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (इ.स.1842-1901)
10) भाऊ महाजन (इ.स.1815-1890)
11) महर्षी धोंडो केशव कर्वे (इ.स.1858-1962)
12) दादोबा पांडूरंग तर्खडकर (इ.स.1814-1882)
13) विष्णूशास्त्री चिपळूणकर (इ.स.1850-1882)
14) विष्णूशास्त्री पंडित (इ.स.1827-1876)
15) डॉ.रा.गो.भांडारकर (इ.स.1837-1925)
16) गणेश वासुदेव जोशी (इ.स.1828-1880)
17) बाबा पद्मनजी (इ.स.1831-1903)
18) बेहरामजी मलबारी (इ.स.1853-1912)
19) गोपाळ गणेश आगरकर (इ.स.1856-1895)
20) पंडिता रमाबाई (इ.स.1858-1922)
21) रमाबाई रानडे (इ.स.1862-1924)
22) सावित्रीबाई फुले (इ.स.1831-1897)
23) ताराबाई शिंदे (इ.स.1850-1910)
24) रखमाबाई राऊत (इ.स.1864-1955)
25) जनाक्का शिंदे (इ.स.1878-1956)
26) लक्ष्मीबाई टिळक (इ.स.1868-1936)
27) काशीबाई कानिटकर (इ.स.1861-1948)

3. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळी 
1) स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील उठाव (इ.स.1818-1885)
2) अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-स्थापना
3) लो.टिळक कालखंड (टिळक युग)
4) महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
5) गांधी युग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ

4. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी 
1) स्त्री मुक्ती चळवळ
2) कामगार चळवळ
3) दलित चळवळ
4) आदिवासी चळवळ
5) शेतकरी चळवळ
6) संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ

5. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र (1947 ते 1960) 
– संयुक्त महाराष्ट्र चळवळ
1) संयुक्त महाराष्ट्र – ऐतिहासिक पार्श्वभूमी
2) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे टप्पे
3) संयुक्त महाराष्ट्र समिती – 1956
4) महाराष्ट्र राज्याची निर्मिती

RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 450.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close