आधुनिक युगातील गांधीविचारांची प्रासंगिकता
Authors:
ISBN:
₹495.00
- DESCRIPTION
- INDEX
महात्मा गांधीचे विचार हे सत्य, अहिंसा, श्रमप्रतिष्ठा, साधे राहणीमान या तत्वावर आधारित आहेत. महात्मा गांधीच्या मते ‘पृथ्वीवरिल साधनसामुग्रीव्दारे सर्व मानवाच्या गरजांचे समाधान होऊ शकते पण कोणत्याही व्यक्तीचा हव्यास पुर्ण होऊ शकत नाही’. त्यांनी सर्व मानवाच्या कल्याणासाठी निगडीत असलेल्या सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करून अनमोल विचार मांडले. महात्मा गांधीचे विचार आजही उपयुक्त आहेत. मुळात गांधीजी आजउद्याच नव्हे, तर चिरंतन आहेत. गांधीविचार आजच्या काळात केवळ उपयुक्त आहेत असे नव्हे, तर त्या विचारांशिवाय जगाला पर्याय नाही. नव्या युगाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर गांधीविचार हेच अंतिम उत्तर आहे. महात्मा गांधीचे विचार हे भविष्याचा वेध घेणारे होते. माझ्या स्वप्नातील भारत, हिंद-स्वराज्य, सत्याचे प्रयोग-आत्मकथा या विविध पुस्तकांत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
आजही महात्मा गांधींचे यंत्रविषयकविचार, स्वदेशीबाबतचे विचार, विश्वस्तवृत्तीबाबतचे विचार, सर्वोदयी विचार, अर्थशास्त्रीय व नितीशास्त्रीय विचार वर्तमान परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. एकंदरीत महात्मा गांधींचा विचार व मार्ग हे नैतीक आणि अहिंसात्मक तत्वावर अवलंबून असल्यामुळे आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या मार्गाचा अवलंब केला. ब्रिटीशांसारखा साम्राज्यवादी शत्रु समोर असताना देखील त्यांना नामोहरम केले.
आज 21 व्या शतकात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दारिद्य्र, हिंसाचार, उपासमार, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीवादी देशात गांधीविचारांनी आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.
Adhunik Yugatil Gandhivicharanchi Prasangikta