आरोग्य मानसशास्त्र
Health Psychology
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.
प्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
Arogya Manasshastra
- आरोग्य मानसशास्त्राची ओळख : 1.1 आरोग्य मानसशास्त्र-व्याख्या, स्वरूप, उद्देश, 1.2 शरीर-मन संबंध, 1.3 आरोग्याचे जैवमनोसामाजिक प्रारूप, 1.4 आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, 1.5 उपयोजन
- ताण आणि साधक वर्तन : 2.1 ताण – व्याख्या, स्वरूप आणि प्रकार, 2.2 ताणाचे स्त्रोत, 2.3 ताणाला प्रतिसाद/प्रतिक्रिया (शारीरिक, भावनिक आणि वर्तनात्मक प्रतिक्रिया), 2.4 साधक वर्तन, 2.5 उपयोजन : तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक आधार वाढविणे
- दिर्घकालीन आरोग्य समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन : 3.1 दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, 3.2 दिर्घकालीन आरोग्य विकृतींना (जुनाट आजारांना) दिल्या जाणार्या भावनिक प्रतिक्रिया, 3.3 प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, 3.4 उपयोजन
- प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार : 4.1 जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, 4.2 आरोग्य तडजोड वर्तन वैशिष्ट्ये, 4.3 आरोग्यविषयक वैकासिक, लिंगभेद, व सामाजिक-सांस्कृतिक घटक, 4.4 आरोग्य प्रसार वर्तन