इंडियन बिझिनेस लेजंड्स
Indian Business Legends
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतात जन्माला आलेल्या व भारतातच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून जगभर प्रसिद्ध झालेल्या उद्योजकांची ओळख सर्व भारतीयांना व्हावी यासाठी सदरील पुस्तकात सात सुप्रसिद्ध यशस्वी उद्योजकांचा परिचय घेतलेला आहे. उद्योजकांच्या जीवनाचा वेध घेतांना उद्योजकांच्या व्यापारी संघर्षाची व कठोर मेहनतीची माहिती नव्या पिढीच्या तरूणाईला मिळून उत्तर आयुष्यात येणार्या अडचणींचा ते सहज सामना करू शकतील. करीअर घडवण्यासाठी उद्योजकांच्या विविध प्रासंगिक, व्यावसायिक क्लृप्त्या त्यांना दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडू शकतील.
सदरील पुस्तकात जहांगीर टाटा, जीडी बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, आदित्यविक्रम बिर्ला व राहुल बजाज अशा सात मान्यवर उद्योजकांचे संक्षिप्त जीवन चरित्र रेखाटलेले आहे. या जीवन चरित्रात उद्योजकांनी उद्योगधंद्याची केलेली सुरूवात, उद्योग उभारतांनाचा जीवघेणा संघर्ष, उद्योगाच्या विस्तारासाठी घेतलेले कठोर परिश्रम यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे.
सदरील ‘इंडियन बिझिनेस लेजंड्स’ हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शनपर ठरेल यात शंकाच नाही.
Indian Business Legends