इच्यार करीसन रे भो!
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
विविध प्रदेश बोलींनी मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करुन दिली आहे.उत्तर महाराष्ट्रातील अहिराणी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची बोली आहे. अहिराणीचीच सहोदर असणारी लेवा गणबोली हीसुद्धा या प्रदेशातील एक प्रमुख बोली आहे. समूहबोली म्हणून तिचे वेगळे असे स्थान आहे. व.पु.होले यांचे या लेखसंग्रहातील लेखन लेवा गणबोलीतच सिद्ध झालेले आहे प्रदेश लोकरीति, जीवनव्यवहार, परंपरा, संस्कृतिविषयीचे हे कथन आहे. वर्तमान समाजमनाचा कानोसा लेवाबोलीतून घेतला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखनरूपात मानसपात्रांच्या ‘बोलण्या’तूून सद्यःकालीन समाजाची विविध चित्रे रेखाटली आहेत. विविध जोडगोळ्यांच्या बोलण्यातून वर्तमान समाजमन आणि त्यावरचे समाजभाष्य प्रकटलेले आहे. लेवा बोलीतील ही संवादचित्रे आहेत. ग्रामीण समाज, शेती, लोकव्यवहाराच्या गोष्टी यात सांगितल्या आहेत. या जशा समाजाच्या भद्र-अभद्रपणाच्या गोष्टी आहेत तशाच त्या शहाणपणाच्या बोधकथाही आहेत. स्त्रीकष्टाच्या व त्यांच्या गुणांच्या कथा आहेत. एका प्रदेशातील समकालीन समाजावकाशाचे दर्शन त्यातून होते.
हा जीवनानुभव त्यांनी लेवाबोलीत संवादित केला आहे. जळगाव-बुलढाणा जिल्ह्यातील जिव्हाळकथनाने त्यास वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त झाली आहे. ‘रे-भो’, ‘काभ्र’ अशा संबोधनरूपांनी हा भाषावकाश रचला आहे. ‘सन’,‘त’ व ‘ये’ कारान्त रूपांनी सजलेले हे कथन आहे.
समाज, संस्कृती, प्रदेशविशिष्ट शब्दकळा, समूहनिर्मित सुलभ उच्चाररूपे व प्रादेशिक वाहती गद्यलय या बोलीत आहे. बोलीरूपे ही जशी त्या त्या प्रदेशाची संवादकथने असतात, तशीच ती मुख्य भाषेलादेखील संपन्न करत असतात. सांस्कृतिक संचित आणि लोकव्यवहार साठवून ठेवणारे हे प्रादेशिक बोलीकथन निश्चितच महत्त्वाचे आहे.
– डॉ. रणधीर शिंदे
Ichyar Karisan Re Bho
प्रस्तावना
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने
ऋणनिर्देश
1. …इच्यार करीसन रे भो !
2. हेतं त्याह्यलेच कयालं पाहिजे !
3. मानुसकीची जान
4. जिवघेनी गरज
5. रिक्शावाले भाऊ, असेबी अनं तसेबी
6. इची लेहू, कये ना वये… !
7. बही, कही सुदरतीन रे भो हे ?
8. देवदूत तसे गल्लाभरूही
9. त्याची खरी माय, मोठी माय …!
10. कशाचा बळीराजा नं गिळी राजा रे भो !
11. हौसे, नौसे अनं गौसे
12. लालगंद
13. गह्यऱ्या शिकेल, पन येळपट…!
14. कशी फसाळली आय काया पैशावाल्यायची !
15. माईकायटीस नावाचा रोग
16. आमच्या गावची जिजाऊ !
17. हागनखळी ..!
18. आमच्या वाळ्यातला सप्त्या
19. एकतीस डिसेंबर
20. धिंडे
21. कपळ्यायचा गोंदय
22. वांगे
23. जीवघेने लाळ
24. शिवरातची वारी
25. म्हैसचं हेल्गं
26. दगळुबोवाले झाली रे भो एकदाची नात…
27. परीक्षा लेकाची की बापाची ?
28. वयख कार्ड
29. ‘नर्मदे हर हर’
30. पैसे दिसन रोग इकत घेनाय…!
31. दार लागी जायजो तुह्यं…!
32. कमालआय रे भो या बायायची बी..!
33. गुपचुपची पुळी
34. डंगा
35. तहान लागली, की खंदा येहर
36. हे तं कुंभारावून बी गधळी शहानी झाली!
37. गांडूपटक
38. पोटजन
39. आशीर्वाद की बद्दुवा !
40. दारूबंदीचे नुस्ते नाटकं असता रे भो!
41. जीव बई गेला रे भो पुरा…!
42. उपकारायची फेळ
43. बोगस लोकायच्या देशा..!
44. मानुसकीले कलंक
45. पांडुरंग पावला…
46. आखाळ तयला
47. देवाचं नावच येतं रे भो कामा !
48. झाळं तं लावता पन् जगोईन कोन ?
49. इतकी अंदाधुंदी
50. चांगली बुद्धी दे रे ऽऽऽ बाप्पा…!
51. राक्षसायवर बी वरतान…!
52. देस चालोयनारे, कां असे ?
53. वा ऽ रे वा ऽऽ प्लॅनिंग !
54. निसर्गाची देन हिरव्या पालेभाज्या
55. बहीन बी देवीचं रूपच…!
56. बायायची ताकद
57. का इतके हदन च्या कदन बिलं ?
58. फटाके फोळताच काभ्र …?
59. थकोयलं बापा या एसटीच्या संपानं !
60. दिवाईचा फराय, जरा संबाईसनच…!
61. अस्सा पाहिजे ‘टाईमपास’
62. चक्रोई टाकनार लगन
63. लावानं भो सन्सं भरीत पार्टीचा
64. ज्याच्या घरी गाय, तडी देवाचे पाय !
65. मार्गी लावतो तो मार्गेसर
66. कुडी भेट्टं रे याह्यले हे ट्रेनिंग?
थांबोयतो रे भो मी आता
वाचकांच्या प्रतिक्रिया
परिचय पत्र