- DESCRIPTION
- INDEX
इतिहासाचे स्वरूप काळाप्रमाणे उदंड आहे. साधारणत: पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवी इतिहासाचा प्रारंभ होतो. मानवी जीवनाची झालेली उत्क्रांती, त्यातील टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय-अस्त, त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचा परामर्श इतिहासाच्या अभ्यासात केला जातो. मानवी जीवनाचा भूतकाळ म्हणजे इतिहास. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न साधारणत: इतिहासाच्या अभ्यासाद्वारे केला जावू शकतो. प्राचीन, अतिप्राचीन काळात इतिहासाला मर्यादा होत्या. आधुनिक काळात मात्र त्या नाहीत. प्राचीन काळापासूनच मानवाला सुंदर, कलात्मक, मौल्यवान, दुर्मिळ अशा कोणत्याही वस्तू अथवा अवशेषांबद्दल आकर्षण व कुतूहल असते. वस्तुसंग्रहालयातून मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या दिसतात. वस्तुसंग्रहालयाची कल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये जन्माला आली. वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. प्राचीन भारतात अनेक विद्यापीठे होती. या विद्यापीठात मोठी संग्रहालये होती. पण ती आजच्या वस्तुसंग्रहालयासारखी सुसज्ज नव्हती. देशभरातील अनेक संस्थानिकांनी आपआपल्या संस्थानात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची वस्तुसंग्रहालये स्थापन केलीत. मानवी जीवनात नाविन्यपूर्ण गोष्टी, वास्तू पहाण्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. ऐतिहासिक स्थळे, स्मारके, प्राचीन वस्तू व वास्तू, मंदिरे, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती, राजवाडे, नवी आकर्षक व जुनी घरे, किल्ले, गुहा, लेणी इ. पहाण्याची मानवी मनास अत्यंत उत्सुकता व कुतूहल असते.
Upyojit Itihas
- उपयोजित इतिहास आणि २१ वे शतक : इतिहासाच्या व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, उपयोजित इतिहास : अर्थ आणि उपयुक्तता, विविध विषयात इतिहासाचे उपयोजन, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील संबंध, समकालीन इतिहास अर्थ आणि स्वरूप
- पर्यटन आणि इतिहास : पर्यटन : अर्थ व व्याप्ती, पर्यटन विकासाचे घटक, पर्यटनाचे प्रकार, पर्यटक आणि पर्यटक मार्गदर्शक, पर्यटन क्षेत्रातील संधी
- प्रसार माध्यमे आणि इतिहास : प्रसार माध्यमे : अर्थ आणि प्रकार, मुद्रित माध्यम : प्रारंभ व विकास आणि भारतीय मुद्रणालये, वृत्तपत्रे : व्याख्या, उदय, भारतातील आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा आढावा, विजाणू शास्त्रीय माध्यमे, रेडिओ, दूरदर्शन, ई-माध्यमे
- संग्रहालय आणि इतिहास : संग्रहालय : अर्थ व प्रकार, संग्रहालय : संरक्षण आणि संवर्धन, संग्रहालयाचे ऐतिहासिक महत्त्व
- ऐतिहासिक संशोधन : पुरातत्त्व आणि पुराभिलेखागार व्याख्या व प्रकार, भारतातील पुरातत्त्व आणि पुराभिलेखागाराचा विकास, पुराभिलेखीय साधने, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, पुरातत्त्व आणि पुराभिलेखागारांचे ऐतिहासिक महत्त्व