Prashant Publications

उपयोजित मराठी

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493382
Marathi Title: Upyojit Marathi
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 96
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Upyoijit-Marathi-SPPU-by-Dr-Sandeep-Mali
Categories: ,

110.00

  • DESCRIPTION
  • INDEX

अभ्यासक्रमनिर्मितीप्रक्रिया किंवा प्रत्यक्ष अध्यापनात सहभागी नसणार्‍या सामान्य कुवतीच्या लेखनीबहाद्दरांनी विद्यापीठ अभ्यासक्रमात अंतर्भूत अभ्यासपत्रिकांच्या अनुषंगाने जुजबी टिपणे लिहिणे असे चित्र अगदी नजीकच्या काळापर्यंत उच्च शिक्षणक्षेत्रात दिसत होते आणि आजही ते बदलले आहे असे नाही. अशा व्यापारी मार्गदर्शक खटाटोपाच्या जाळ्यात अभ्यासक विद्यार्थीसुद्धा सहज सापडत होते. परिणामी पदवी स्तरावरील उच्च शिक्षणाचे उद्दिष्टच व्यापकपणे कधी फलद्रूप झाले नाही.
प्रामाणिक व पदवीचे उद्दिष्ट जाणणार्‍या अभ्यासकाकडून खरेतर अशा अभ्यासक्रमास अथवा अभ्यासपत्रिकेस साहाय्यभूत संदर्भग्रंथांचे लेखन होणे अपेक्षित असते. असे अभ्यासकच अतिसुलभीकरण व अव्याप्तपणा अशा दोषांपासून अलिप्त रहात आपली समज आणि तत्संबंधीचे समकालीन भान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.
डॉ. संदीप माळी ह्या विद्यार्थीमित्र अभ्यासकाने उपयोजित मराठी ह्या संदर्भग्रंथात पदवी स्तरावरील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे मूलभूत भान बाळगले आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. माळी ह्यांनी ह्या संदर्भग्रंथाच्या रूपाने भाषेच्या उपयोजित अंगाची वस्तुनिष्ठ ओळख करून देत मराठी भाषेचा उपयोजनव्यवहार प्रचलित पारंपरिक व अत्याधुनिक माध्यमांच्या संदर्भात प्रात्यक्षिक व विवेचक अशा दोन्ही अंगाने प्रस्तुत केला आहे. सर्वच विद्यापीठांच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक व भाषिक उपयोजनाची मुळाक्षरे गिरवणार्‍या सर्वांसाठी हा संदर्भग्रंथ उपयुक्त ठरेल ह्यात शंका नाही.

डॉ. प्रभाकर देसाई
प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

Upyojit Marathi

  1. भाषा आणि जीवन व्यवहार : भाषेच्या व्याख्या, भाषा आणि मानवी जीवन व्यवहार, भाषिक संपर्क, भाषा आणि भाषिक अस्मिता, मानवाच्या माणूसपणाचे लक्षण : भाषा, दैनंदिन जीवन व्यवहारातील भाषेचे कार्य, कार्यालयीन भाषा, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमे : भाषा, आकाशवाणीवरील भाषा कशी असावी?
  2. अर्जलेखन : अर्ज कशासाठी?, अर्ज लिहितांना…, अर्ज कसा लिहावा?; अर्जाचे विविध नमुने – विनंती अर्ज, नवीन चेकबुसाठी अर्ज, रजेचा अर्ज, परवानगी अर्जाचा नमुना, ना-हरकत दाखला नमुना, नोकरीसाठी अर्ज, नोकरीसाठीच्या अर्जाची साधारण रूपरेषा, नोकरीसाठी अर्ज लिहिताना घ्यावयाची काळजी.
  3. संगणकीय अर्जलेखन : युनिकोडमधून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अर्ज, युनिकोड प्रणाली, गुगल इनपुट, मोबाईलवर मराठी टाइपिंग, अँड्रॉइड फोनवर मराठी टाइपिंग, आयफोन किंवा आयपॅडवर मराठी टाइपिंग, जी बोर्डची वैशिष्ट्ये, युनिकोड मधून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मराठी टायपिंग करत असताना घ्यावयाची काळजी व वापरावयाची पद्धती
  4. स्वपरिचय : बायोडाटा म्हणजे काय? – बायोडाटा, रेझ्युमे, शैक्षणिक बायोडाटा/स्वपरिचय; व्यक्तींचा बायोडाटा गोळा करण्याचे मार्ग, बायोडाटा लिहिताना काय काळजी घ्यावी?
  5. प्रसारमाध्यमांसाठी लेखन : (1) वृत्तपत्रासाठी लेखन – वृत्तपत्रीय लेख, लेखांचे विविध प्रकार, वृत्तलेख लेखन : स्वरूप व तंत्र, लेख कसा असावा?, वृत्तपत्रीय लेख लिहितांना, वृत्तपत्रलेखासाठी विषय, स्तंभ लेखनाचे उदाहरण – ‘जगण्याची लढाई’- डॉ. राजन गवस (2) नभोवाणीसाठी लेखन – नभोवाणीची भाषा, भाषण लेखन : स्वरूप, आकाशवाणीवरील भाषण लिहितांना…; आनंदची अंग-आनंदाचे (आकाशवाणी जळगाव ‘शब्दअमृता’चे मालिकेत भाषण) – प्राचार्य डॉ. किसन पाटील (3) चित्रवाणी – माहितीपटासाठी संहिता लेखन (4) महाजाल : ब्लॉग लेखन – ब्लॉग पोस्ट म्हणजे काय?, ब्लॉग पोस्टची रचना, ब्लॉग पोस्टचा हेतू. ब्लॉग वरील लेखन करताना…; ब्लॉग : विचार सर्जन; कोरोना आणि शिक्षणक्षेत्रातील आणीबाणी – डॉ. गणपतराव ढेंबरे (5) नवसमाजमाध्यमांसाठी लेखन : फेसबुक, ट्विटर
RELATED PRODUCTS
Prashant Publications
Shopping cart close