उपयोजित मानसशास्त्र
Applied Psychology
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
सुरूवातीला आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशाच आशयाने मानसशास्त्राला ओळखले जायचे. परंतू सद्यस्थितीत यात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. एकंदरीत मानवी जीवनाला विकासाच्या उंचीवर नेणारे शास्त्र म्हणून आता ते उदयास आलेले आहे. मानसशास्त्र हे मनुष्य व प्राणी यांच्या वर्तनाचे शास्त्र आहे. त्यात मानवी समस्या सोडविण्यासाठी या शास्त्राचे उपयोजनही केले जाते. 1937 नंतर उपयोजीत मानसशास्त्राला वेगळीच कलाटणी मिळाली. रशिया, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स येथे मानसशास्त्रविषयक अनेक संघटना निर्माण झाल्या. या संघटनांमधून वर्तन चिकित्सा, रोग चिकित्सा, उपचार चिकित्सा तसेच लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना मार्गदर्शन तसेच व्यवसायविषयक मार्गदर्शन, उद्योगविषयक मार्गदर्शन मिळू लागले.
मानसशास्त्राच्या व्यावहारीक जीवनातील उपयोगाच्या दृष्टीने उपयोजित हा शब्द लक्षात घ्यावा लागतो. वर्तनविषयक मुलभूत सिद्धांताचा आधार घेवून दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे हाच उपयोजित मानसशास्त्राचा उद्देश आहे. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखकर कसे होईल? समाधानी कसे होईल? चिंतामुक्त कसे होईल? ताणविरहीत कसे जगता येईल? अशा अनेक समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य मानसशास्त्र करीत आहे.
मानसशास्त्र प्रत्येक वर्तनविषयक किंवा व्यावहारीक क्षेत्रात घडणार्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करते. तसेच विविध क्षेत्रातील वर्तनविषयक समस्या सोडविण्यासाठी उपायांचा आराखडाही तयार करते व पूर्ण अभ्यासाअंती विशेषपूर्ण, वैविध्यपूर्ण तंत्राचा विकास करते. अशाप्रकारे उपयोजीत मानसशास्त्र व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ते विकासाचे कार्य करणारे शास्त्र आहे.
Upyojit Manasshastra
- उपयोजित मानसशास्त्र : उपयोजित मानसशास्त्राचे स्वरुप, ऐतिहासिक पार्श्वभूमी. उपयोजित मानसशास्त्राची क्षेत्रे – शैक्षणिक, संहमंत्रण, कुटूंब, आरोग्य, पर्यावरण, कायदा, क्रिडा, ग्रामिण विकास, सैनिक, गुन्हेगारी, सामूहीक, चिकीत्सा, कर्मचारी, अभियांत्रीकी, संघटनाविषयक उपभोक्ता मानसशास्त्र.
- आरोग्य आणि आजाराचे मानसशास्त्र : प्रस्तावना, शरीर आणि आरोग्य, शरीर प्रतिमा, स्वत:च्या शरीराबद्दल आपल्याला कसे वाटते?, आपले आदर्श शरीर, शरीर प्रतिमा व मानसिक आरोग्य, मानसशास्त्रीय घटक आणि शारीरिक आजार, ताणासंबंधी आजार, ताण आणि रोग प्रतीकारक यंत्रणा, आरोग्यासंबंधी धोके
- ताण : ताणाचा अर्थ, ताणदायक जीवन घटना, वातावरणातील ताणजनक घटना, कार्य परिस्थितीतील ताणजनक घटना, ताणाचे काही मुख्य परिणाम – हृदयविकार, अतिताण, कर्करोग, ताणामुळे खचून जाणे, ताणास दिल्या जाणार्या प्रतिक्रिया, शारीरिक प्रतिक्रिया, मानसशास्त्रीय प्रतिक्रिया.
- ताण व्यवस्थापन : जैव प्रतीभरण तंत्र, शिथीलन प्रशिक्षण, व्यायाम, ताणाच्या पूर्ववर्ती बोधात्मक अवस्थेत परीवर्तन घडविणे, वर्तनातील परिवर्तन, कार्य आणि वेळ व्यवस्थापन, अतिमानव संलक्षण, निर्भीड प्रशिक्षण, एकाकीपणा.
- लोकांमध्ये मिसळणे : मित्र बनविणे, पहिली छाप, चुकीची छाप, लाजाळूपणा आंतरवैयक्तीक आकर्षण, आंतरक्रिया आणि आवड, शारीरिक आकर्षकता, समानता किंवा भिन्नत्व.
- मैत्री : प्रस्तावना, मित्र एकत्र येतात तेव्हा, एकमेकांकडे मन मोकळे करणे, समलिंगी आणि विरुद्धलिंगी मैत्री, मैत्री टिकणे किंवा तुटणे.
- विवाह आणि जवळीकता : प्रस्तावना, प्रेम, प्रेमाचे घटक, प्रेमाचे प्रकार, विवाह, वैवाहीक समायोजन, वैवाहीक जबाबदार्या मधील सहभाग, संवाद आणि संघर्ष, आर्थिक व्यवस्थापन, विवाहामधील लैंगिकता, वैवाहीक जीवनात काळानुरुप होणारे बदल.
- घटस्फोट आणि पुनर्विवाह : प्रस्तावना, घटस्फोटाचा अनुभव, एक पालक कुटुंब, पुनर्विवाह – उत्तर प्रौढावस्था, शारीरिक परिवर्तन, बोधात्मक परिवर्तन, वैयक्तीक समायोजन, सामाजिक समायोजन, निवृत्ती
- करियर निवड : प्रस्तावना, स्वत:ची पारख, अनुरूप करियर निवड, निर्णयाप्रत येणे, जीवनमार्गाची तयारी, कार्य समाधान, व्यवसाय भवितव्य, करियर विस्तार संभाव्यता, नोकरीतील बदल
- मानसिक विकृती : मानसिक विकृतीची ओळख, मानसिक विकृती म्हणजे काय?, मानसिक विकृतीचे वर्गीकरण, चिंता विकृती, सर्वसामान्य चिंतावस्था विकृती, दुर्भिती, अनिवार्य विचार कृती विकृती
- मानसिक उपचार पद्धती : जैव वैद्यकीय उपचार, विद्युत आघात उपचार, मानसशस्त्र क्रिया
- मानसशास्त्रीय उपचार : प्रस्तावना, सम्मोहन, मनोविश्लेषण उपचार, व्यक्ती केंद्रीत उपचार, तर्कसंगत भावनिक उपचार, वर्तन उपचार, बोधात्मक उपचार, समूह उपचार, सामाजिक उपचार, वैवाहीक उपचार
- मानसशास्त्रीय चाचणी : स्वरुप, व्याख्या, उपयोग, प्रकार आणि वर्गीकरण, मानसशास्त्रीय चाचणीचे कार्य, मानसशास्त्रीय चाचणीचा उगम, चाचणीमधील सामाजिक मान्यता, नैतिक मान्यता.
- चांगल्या मानसशास्त्रीय चाचणीची वैशिष्ट्ये : विश्वसनीयता- स्वरुप, व्याख्या, विश्वसनीयतेचे प्रकार, गती चाचणीची विश्वसनीयता; वैधता- स्वरुप, व्याख्या, प्रकार; मानक- स्वरुप, व्याख्या
- सहसंबंध : प्रस्तावना, सहसंबंधाचा अर्थ, सहसंबंधाचे प्रकार, स्थान क्रम सहसंबंध
- शुन्य गृहितकाची चाचणी : शुन्य गृहितक म्हणजे काय?, काम-वर्ग चाचणी, समान संभाव्यता गृहीतक, सामान्य संभाव्यता गृहीतक, स्वतंत्र गृहीतक, 2 x 2 काय वर्ग
- मध्यमानातील प्रमाणित त्रुटी : मध्यमानाची विश्वास मर्यादा, मध्यमानामधील अन्तराची सार्थकता, क्रिटीकल रेशो, टी.