एल्गार वंचितांचा
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
राष्ट्रपतींच्या यादीत अनुसूचित 45 जमाती आहेत, त्यापैकी फक्त 12 जमातींना लाभ मिळतो; बाकी 33 जमाती या लाभांपासून वंचित असतात, त्या वंचित जमातींचा आक्रोश, विद्रोह या ‘एल्गार वंचितांचा’ या डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या कवितासंग्रहात आविष्कृत झाला आहे.
हे षडयंत्र आहे. आदिवासी कोळी जमातीच्या 4 गटांपैकी फक्त सोनकोळी गटाचा समावेश इतर मागासवर्गात असून कोळी ढोर- टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या तिन्ही गटातील आदिवासी कोळी यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये आहे. तथापि त्यांना लाभांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले गेले आहे. आदिवासींनाच आदिवासींविरुद्ध उभे करून मुद्दाम संभ्रमाचे वातावरण केले गेले आहे. हलबा, ठाकूर, माना, गोवारी इ.33 जमाती अशा उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या भावना, संवेदना, विचार, विद्रोह प्रातिनिधिक स्वरूपात या काव्यसंग्रहात अविष्कृत केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित या कवितांमध्ये वंचित जमातीतील कार्यकर्ते यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्याय, अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्याचे बळ या कवितांमधून मिळते. संविधानिक व न्याय्य हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळत आहे. संघटन वाढत आहे. स्फोटक अशा रसायनांचा जणू हा संग्रह आहे.
‘एल्गार वंचितांचा’ या काव्यसंग्रहातील विद्रोह अपूर्व असा आहे. हा वंचितांचा एल्गार माणुसकीचे शत्रू असणाऱ्या, अनुसूचित जमातींना वंचित ठेवणाऱ्या सर्व घटकांविरुद्ध आहे.
1. एल्गार
लढा झाला आहे सुरू, संघर्ष हा सुरू आहे, लढायचे आहे, स्वराज्य, युद्ध स्वराज्याचे, स्वराज्य येतया, होऊ विजयी आम्हीच, लढायला शीक, युद्ध आमचे हे सुरू, चक्रव्यूह भेदायचे!, आंदोलन, एल्गार, उंच ऊड पाखरा रे, स्फोट, लढाई ही आरपार, चालणे अटळ आहे, उठा, चला, सज्ज व्हा रे, आमचे आम्हीच होऊ मुक्तिदाते, काढू का शिंगाडं?, भीमशक्ती, रात्रंदिन असे युद्धाचा प्रसंग, आक्रमण…, ऊर्मी, स्वराज्यात…, पेटल्या मशाली ह्या, आता पेटले दिवे, पहाटे पहाटे, विजयगीत, निकल पडा है अब कारवाँ, उंच ऊड पाखरा रे, सत्यमेव जयते, समानता हवी आम्हां, होता सत्याचे दर्शन, चक्रव्यूह भेदणार, आता गाजवू आपण रण, स्फोट, घेतली शपथ, लढा लढा पुढे चला, स्वाभिमान.
2. जन्मसिद्ध हक्क
सूर्याला सामोरे जाऊ, उगवता सूर्य पहा, सूर्य – सिंह, स्वयंदीप व्हावे आता, सूर्य उगवला आहे!, जन्मसिद्ध हक्क, सिंह आम्ही, स्वराज्य येणार आहे!, आत्मभान यावे, वाटचाल, नवा सूर्य उगवेल, उगवता सूर्य पहा, प्रकाशाचे दूत आले, स्वामित्व हक्क, स्वराज्य आमचा जन्मसिद्ध हक्क, वाल्मीकीचा वंश, स्वराज्याची ध्वजा फडफडू द्या, उजेड पसरू दे, सूर्योदय, स्वातंत्र्यदिन, संविधान : शिरस्त्राण – पंचप्राण, पहा जरा पूर्वेकडे, नेते?
3. नेते
नेतृत्व, समाजाचे नेते (?), राजकीय पक्षांचे नेते, नको नको रे पुढाऱ्या, पुढाऱ्यांना दाखवूच, कुऱ्हाडीचे दांडे, आश्वासना भुलू नको, घराणेशाही संपावी, साहेब!, वकील, मतांचा हंगाम, कोळी जमातीचा आमदार असा हवा !
4. संघटन
हवे सत्तेचे कुरण, सहकार्याची भावना, संघटीत व्हा, लढा, सिंह जागा झाला, स्वयंसिद्ध, वाटमाऱ्या, सारे भाऊ एक झाले, पुरोगामी मुखवटा, क्रांती, पुन्हा नव्याने धरावी उभारी, दूधखुळे न राहिलो…, जागल्यांनो जागे रहा, एकजूट, पेरा आशावाद जनात, समाजाच्या कार्यकर्त्या, जागती हे दिवे, पाची बोटे एक होता, मन झाले सैरभैर, सामर्थ्य आहे एकजुटीचे, नका जाऊ हुरळून, फोडावे भांडार…, मधमाश्या, श्रेयासाठी, कार्य स्वराज्याचे करीं, उघडा डोळे, बना धीट, लढती तेच आपले, आत्मचिंतन करू या, अभ्यासक व न्याय, सत्य – “अ”सत्य
5. षडयंत्र
कारण विनाशा, होडी, बोगस, अजगर, हत्ती, गणना करताना, जमीन, गोम, पाणी चौद्वार तळ्याचे, द्या उत्तर, वर्षे झालीत सत्तर, गुलामगिरी, भ्रष्टाचाराचे आगार, आरक्षणचोर, दगा, नाही होत सगा, वर्षे अशी गेली किती?, नावे, गप्प राहतात?, दोस्ती, खोटारडे, बोगस!
6. अनुसूचित कोळी जमाती
कोळी ढोर नि महार, आम्ही आदिवासी, आदिवासी समाजाला, झलकारीबाई कोळी, टोकरे कोळी जमात, आमच्याच भूमीमध्ये…, अनुसूचीतल्या कोळी जमाती, उभारू गुढी, कोळी जमातीच्या मुला…, फटका, घरोबा, नथ्थू ठेंगेवाला, आखाजीचा सण, मूलनिवासी, संदर्भ : काळोखाचा इतिहास, कोळसा, पंढरीचे महादेव कोळी, टोकरे कोळी – नावाडी, गिरणाकाठ, मुंबा आई आणि कोळी, शेती सिंधीही घेतात, दयाळू मारवाडी, विठ्ठलाच्या पाया दिली कोणी वीट, पद्मश्री राहीबाई पोपरे, देव टोकरे कोळ्यांचे, टोकरे कोळ्यांची वस्ती, शेतमजूर बाया, मालती, मूलनिवासी, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या.
परिशिष्ट 1
आदिवासी अनुसूचित कोळी जमाती-समाज व संस्कृती