औद्योगिकीकरण आणि सामाजिक-पर्यावरणीय समस्या
Industrialization and Socio-Environmental Issues
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
औद्योगिकीकरण म्हणजेच आर्थिक विकास म्हणता येईल. कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. औद्योगिकरण हा त्यातील एक घटक होय. कारण औद्योगिकीकरणाच्या वेगावर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. जगात वरचढ स्थानासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे विकसनशील देशांत अधिकतम उद्योगधंदे निर्माण करायला प्रोत्साहन देत आहेत, वेळ प्रसंगी दबाव आणत आहेत. आज देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणाद्वारा उत्पादन वाढविण्याशिवाय पर्याय उरला नाही.
प्रदूषण, मानवी स्वास्थ्य व समाजातील विविध समस्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजात विविध समस्या निर्माण होत आहे व प्रदूषणही वाढतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार सरकार बरोबर सर्व जनतेनेही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उद्योग हे शहराऐंवजी खेड्या-पाड्यात सूरु केले तर शहरीकरणाची समस्या कमी होऊन प्रदूषणही कमी होण्यात मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या देशातील औद्योगिकरणाचा विकास वाढविला पाहिजे औद्योगीक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली आहेत. औद्योगिक विकासामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. नैसार्गिक साधन संपत्तीचा औद्योगिक विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. नैसार्गिक साधन संपत्तीच्या अति वापरामुळे पर्यावरणावर त्याच्या प्रभाव दिसून येत आहे.
Audyogikikaran Ani Samajik-Paryavaraniya Samsya
- Development, Industrialization and Pollution Linkage : Evidence on Environmental Kuznets Curve – Dr. Abdul Shaban
- शासननिर्मित दुष्काळ निर्मूलनार्थ शेतीपाणी धोरणात आमूलाग्र बदल हवा – प्रा. एच. एम. देसरडा
- Environmental Impact Assessment – A Tool for Sustainable Development – Prof. S.T. Ingle
- विस्थापन : कारणे आणि उपाय योजना – डॉ. साईनाथ राधेशाम बनसोडे
- विस्थापितांच्या समस्या : एक समाजशास्त्रीय अध्ययन – प्रा. प्रकाश साहेबराव काळवणे
- विस्थापन आणि पुनर्वसन : एक सामाजिक समस्या – प्रा. सुनिल अजाबराव पाटील
- औद्योगिक करणाचा भारतीय समाजावर पडलेला प्रभाव – प्रा. डॉ. मधुकर आत्माराम देसले
- वाढते उद्योगधंद्यांचा भारतीय समाजावर पडलेला प्रभाव – प्रा. खेमराज वसंत पाटील
- औद्योगिकरण व सामाजिक समस्या – डॉ. पल्लवी एस. भावसार
- Social Effects of Industrialization in India– Ms. Megha Y. Patil, Dr. Prof. Kalpana P. Nandanwar
- औद्योगिकीकरणाचा लघु उद्योगांवरील परिणाम व लघु उद्योगासमोरील समस्या– प्रा. साहेब विरभद्रराव पडलवार
- वस्तु व सेवा कर कायद्याचे धरणगाव तालुक्यातील लघु उद्योजकांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास– डॉ. विजयानंद अभिमन वारडे
- भारतातील औद्योगिकरणाची समस्या आणि विशेष आर्थिक क्षेत्रामुळे निर्माण झालेले प्रश्न– डॉ. हिरालाल वामन चव्हाण
- शेती क्षेत्रावरील औद्योगीकीकरणाचा परिणाम – प्रा. डिम्पल सुरेश पाटील
- हवामान बदलाची आव्हाने – प्रा. डॉ. सतीश जाधव
- औद्योगिकरण आणि पर्यावरणीय समस्या – प्रा. डॉ. सुगंधा आय. पाटील
- Rapid Industrialization & Environmental Issues – Prof. Shaikh Yunus Ab Rashid