औद्योगिक अर्थशास्त्र
Industrial Economics
Authors:
ISBN:
₹380.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक काळात औद्योगिक व आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. आधुनिक काळात ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय विकसित होत आहे. 1930 च्या जागतिक महामंदीच्या काळात औद्योगिक अर्थशास्त्र प्रस्थापित झाले. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये मोठे उद्योग, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कार्ये यांचे महत्त्व वाढल्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र असेही म्हणतात. म्हणून उद्योग आणि उद्योगासंबंधीचे घटक या विषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व याबरोबरच औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, उद्योग संस्थेची वर्तवणूक, संगनमत एकत्रीकरण यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच उद्योगाची स्थाननिश्चिती, स्थानिकीकरणाचे घटक त्यासंबंधीचा वेबरचा व फ्लोरेन्सचा सिद्धांत याविषयीचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. तसेच गुंतवणूक संशोधन विकास किंमतविषयक पद्धती, प्रकल्पाचे मूल्यमापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंमतविषयक निर्णय, किंमत पद्धतींचा हा अभ्यास केलेला दिसून येतो. पहिल्या भागात वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर दुसर्या भागात खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, उदारीकरण, जागतिकीकरण, लघुउद्योग व मोठे उद्योग, त्यांच्या भूमिका व समस्यांचा विचार केलेला आहे.
Audyogik Arthashastra
- औद्योगिक अर्थशास्त्र : अ) औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ व व्यापी ब) औद्योगिक अर्थशास्त्राची आवश्यकता व महत्व क) औद्योगिकरण आणि अर्थिक विकास व कृषी विकास
- औद्योगिक निर्णय आणि बाजाररचना : अ) स्पर्धा आणि सहकार ब) उद्योग संस्थेची वर्तणूक आणि बाजाररचना क) विक्रय नियंत्रण संघ, संगनमत, एकत्रीकरण आणि ताब्यात घेणे इ. संकल्पना
- उद्योगाच्या स्थाननिश्चितीचे विश्लेषण : अ) उद्योगाच्या स्थाननिश्चितीचा अर्थ ब) उद्योगाच्या स्थाननिश्चितीवर परिणाम करणारे घटक (निर्धारक) क) बेबरचा आणि फ्लोरेन्सचा उद्योगाचा स्थाननिश्चितीचा सिध्दांत
- उद्योगातील गुंतवणूक, संशोधन विकास आणि नवीन शोध : अ) गुंतवणूक विषयक निर्णय- 1) गुंतवणूक विषयक निर्णयाचे स्वरूप व प्रकार 2) प्रकल्पाची तयारी 3) प्रकल्प मूल्यामापनाच्या पध्दती
- किंमत आणि बिगर किंमत स्पर्धा : अ) उद्योगातील किंमती- 1) किंमत विषयक निर्णय 2) किंमत निश्चितीच्या निर्णयासाठी सामान्य परिस्थिती 3) किंमत निश्चितीच्या पद्धती
- औद्योगिकरण आणि भारतातील औद्योगिक क्षेत्र : अ) औद्योगिकरणाची भूमिका ब) भारतातील औद्योगिक विकासाचे पुनरावलोकन/सिंहावलोकन स्वातंत्र्य पूर्वकाळ
- भारतीय उद्योगाच्या समस्या : भारतीय उद्योगाच्या समस्या, आर्थिक संकट आणि 1991 नंतरचे औद्योगिक क्षेत्रातील संरचनात्मक बदल, भारतातील खाजगी उद्योगाच्या समस्या
- उद्योग व संस्थांचे शासकीय नियमन : उद्योग व संस्थांचे शासकीय नियमन, उद्योगातील शासकीय नियमनाची गरज/आवश्यकता, उद्योगाच्या शासकीय नियमनाचे मार्ग साधने, उद्योगाच्या शासकीय नियमनाचे उद्दिष्टे
- उद्योग व कंपन्यांचे विनियंत्रण : उद्योग व कंपन्यांना शासकिय नियंत्रणमुक्त करणे/विनियंत्रण, औद्योगिक विनियंत्रण/नियंत्रणमुक्त औद्योगिक धोरण, विनियंत्रण, उदारीकरण आणि खाजगीकरण
- जागतिकीकरण आणि भारतीय उद्योग : जागतिकीकरणाचा अर्थ, जागतिकीकरणाच्या दिशेने उचलेली पावले, जागतिकीकरणाचा भारतीय उद्योग आणि कंपन्यांवर झालेला परिणाम, विदेशी भांडवल
- औद्योगिक कामगार/श्रम : औद्योगिक कामगार, श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा आणि वेतननिश्चिती, भारतातील कामगार वेतन धोरण, सामुदायिक सौदाशक्ती/सामुदायिक वाटाघाटी (अलिकडील प्रवाह)