Prashant Publications

My Account

औद्योगिक मानसशास्त्र

Industrial Psychology

Authors: 

ISBN:

SKU: 9788193692080
Marathi Title: Audhyogik Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 270
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Audyogik-Manasshastra-by-Pro-D-R-Jarode

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

रशियामध्ये 1920 पासून औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. औद्योगिक परिस्थितीमध्ये कर्मचार्‍याचे स्वास्थ कसे चांगले राहू शकते या दृष्टीने प्रयत्न केल्या गेले. कर्मचार्‍याचा एकंदरीत विकास साधला जावा, त्यातही व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी मध्यवर्ती संस्थेतर्फे कार्य केल्या गेले. भारतात 1919 मध्ये औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. या संदर्भाने याच वर्षात मानसशास्त्र विभागाला सुरूवात केल्या गेली. सद्यस्थितीत वाढत्या कामाबरोबर वाढणारा ताण औद्योगिक मानसशास्त्रामधील संशोधनाचा विषय झालेला आहे. कर्मचार्‍याच्या प्रेरणा वाढलेल्या आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीकोनातून औद्योगिक मानसशास्त्र उद्योगाच्या एकूण समस्याचे निराकरण करणारे शास्त्र ठरते तसेच उपयोजनात्मक साधन ठरत असल्याचे दिसून येते.

सद्यस्थितीत उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्याचबरोबर त्या उद्योगामध्ये स्थित व्यक्तीत चिंता, ताणतणाव, नैराश्य, संघर्ष, वैफल्य इत्यादीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. यावर उपाय करायचा असेल तर उद्योगामधील प्रत्येक घटकाचा मानवी मनाला, वर्तणुकीला केंद्रस्थानी ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणूनच या पुस्तकाचा उद्योगामधील कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक मार्गदर्शक इत्यादींना याचा फायदा होणारच आहे तसेच उद्योग क्षेत्रात ङ्गकरियरफ करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक महत्वाचे मार्गदर्शकच ठरणार आहे.

सदरील पुस्तकात औद्योगिक मानसशास्त्र, कार्य मुल्यांकन, कर्मचारी निवड, कर्मचारी प्रशिक्षण, नेतृत्व, प्रेरणा, मनोधैर्य, कार्य समाधान, कार्य ताण, व्यवस्थापन विकास, आंतरवैयक्तीक संबंध, उपभोक्ता वर्तन, जाहिरात, अपघात आणि नियंत्रण, औद्योगिक संघटना या घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.

Audhyogik Manasshastra

  1. औद्योगिक मानसशास्त्र : प्रस्तावना, व्याख्या, औद्योगिक मानसशास्त्राचा इतिहास
  2. कार्य मुल्यांकन : प्रस्तावना, व्याख्या, कार्य मुल्यांकनाची उद्दिष्ट्ये, कार्य मुल्यांकन समिती
  3. कर्मचारी निवड : प्रस्तावना, निवड प्रक्रियेतील घटक, निवड प्रक्रियेतील पद्धती
  4. कर्मचारी प्रशिक्षण : प्रस्तावना, प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये, प्रशिक्षण प्रक्रिया, प्रशिक्षण गरजा
  5. नेतृत्व : प्रस्तावना, व्याख्या, नेतृत्वाची कार्ये, नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये, नेतृत्वाचे सिद्धांत
  6. प्रेरणा : प्रस्तावना, व्याख्या, प्रेरणेची वैशिष्ट्ये, प्रेरणेचे प्रारूप, प्रेरणा सिद्धांत
  7. मनोधैर्य : प्रस्तावना, व्याख्या, मनोधैर्याचे निर्धारक घटक, मनोधैर्याचे मापन
  8. कार्य समाधान : प्रस्तावना, कार्य समाधानावर परिणाम करणारे घटक, कार्य समाधानाचे निर्धारक घटक
  9. कार्य ताण : प्रस्तावना, कार्य परिस्थिती व ताण, ताण आणि शरीरातील बदल
  10. व्यवस्थापन विकास : प्रस्तावना, व्यवस्थापन विकास म्हणजे काय?, व्यवस्थापन विकासाची उद्दिष्ट्ये
  11. आंतरवैयक्तीक संबंध : प्रस्तावना, आंतरवैयक्तीक संबंधात औद्योगिक संघटनेची भूमिका
  12. उपभोक्ता वर्तन : प्रस्तावना, औद्योगिक संघटना व ग्राहक (उपभोक्ता) वर्तन, विपणन
  13. जाहिरात : प्रस्तावना, जाहिरातीचे स्वरूप, जाहिरातीची उद्दिष्ट्ये, जाहिरात माध्यम
  14. अपघात आणि नियंत्रण : प्रस्तावना, व्याख्या, अपघात निर्धारक घटक
  15. औद्योगिक संघटना : प्रस्तावना, संघटनेची वैशिष्ट्ये, संघटना संरचना
RELATED PRODUCTS
You're viewing: औद्योगिक मानसशास्त्र 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close