कथाविश्व
Authors:
ISBN:
₹50.00
- DESCRIPTION
- INDEX
कथांची निवड करतांना सद्य ः कालीन जीवनाचे प्रश्न व मूल्यविवेक यांचा विचार केलेला आहे.
‘मानवता हे मूल्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रदेश विशिष्टता यांच्या पलीकडे असलेले सर्वेच्च मूल्य आहे’ – हे वामन चोरघडे यांच्या ‘हादरा’ या कथेचे प्रमुख सूत्र आहे.
‘प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून घटनांचे वार्तांकन केले नाही तर एखादी क्षुल्लक घटना मोठ्या उद्रेकाचे कारण ठरु शकते.’ हे अरुण साधूंच्या ‘दंगा’ कथेतून सूचित केले आहे.
‘माणूस हा बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे. पण बुद्धीच्या पाठीमागे भाव असावा की भोग? बुद्धीचा उपयोग भोगासाठी केला की माणसाचा पशू होतो’. हा रत्नाकर मतकरींच्या ‘एक माणूस आणि एक पशू’ या कथेचा आशय आहे.
‘केवळ देणं हाच ज्यांचा जीवनधर्म आहे; अशी माणसं जेव्हा स्वतःसाठी मागतात तेव्हा त्यांच मोठेपण संपून जातं.’ हे कल्पवृक्षाच्या रुपकातून विजया दिक्षित यांनी ‘एका झाडाची इच्छा’ या कथेतून मांडलेलं आहे.
‘श्रद्धा, लेाकश्रद्धा, अंधश्रद्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांचे संस्कार. बालसुलभ मनावर कसे कोरले जातात’ याचे प्रत्ययकारी दर्शन योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ कथेतून घडते.
‘वठलेलं झाड फुलवण्यासाठी कोवळ्या अंकुराचा बळी देणं कितपत संयुक्तिक आहे.’ हा प्रश्न ‘महात्मा’ कथेद्वारे लक्ष्मण लोढे यांनी उपस्थित केला आहे.
‘रोजा-एकादशी आणि भाकरी यांची कष्टकर्यांच्या वेदनेशी-जोडलेली नाळ’ संजीव गिरासे यांच्या ‘जकात’ कथेत दिसते.
सारांश या कथा विद्यार्थ्यांना व वाचकांना व्यक्तीजीवन व समष्टीजीवनाचं उन्नयन करणार्या मूल्यांची ओळख करुन देतील. असा विश्वास वाटतो. कथेच्या रुपबंधाच्या अभ्यासाच्या जोडीने कथेतील चिरंतन मूल्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे.
Kathavishrva
- मनोगत
- हादरा – वामन चोरघडे
- दंगा – अरुण साधू
- एक माणूस आणि एक पशू – रत्नाकर मतकरी
- बाबल्याची कढई – वा. रा. सोनार
- एका झाडाची इच्छा – विजया दीक्षित
- हेलपाटा – उत्तम बावस्कर
- गुडदाणी – योगीराज वाघमारे
- महात्मा – लक्ष्मण लोंढे
- कवडसे – प्रतिभा कणेकर
- जकात – संजीव गिरासे
- कसाई – अशोक कोळी