काव्यगंध
निवडक सोळा कविता : आशय आणि स्वरूप
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
जीवनवास्तवातून वाट्यास येणाऱ्या अनुभवविश्वाच्या अंतरंगाचे अल्पाक्षरी पण भेदक काव्यात्म दर्शन घडविण्यासाठी कविता आकाराला येत असते. व्यक्तीच्या वैयक्तिक भावविश्वाच्या पडझडीपासून भोवतालच्या जगण्यातील अस्वस्थताजनक घटना-प्रसंगांपर्यंत अभिव्यक्तीचा पैस असलेली कविता विशिष्ट रचनाबंधातून प्रत्ययास येत असते. आत्मनिष्ठ भावकविता ते समाजनिष्ठ जीवनवादी कविता अशा भिन्न भिन्न जाणीवांच्या संपुटातून आकारास येणारी काव्यरचना त्या त्या कविव्यक्तिमत्त्वाच्या जीवनविषयक आकलनाचे, जीवनदृष्टीचे प्रत्यंतर देत असते. अशा अंगाने कविता समजून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या भूमिकेतून सदर पुस्तक सिद्ध झालेले आहे. बहिणाबाई चौधरी ते सुदाम राठोड असा आधुनिक मराठी कवितेचा सुमारे शतकभराचा प्रवास लक्षात आणून देणाऱ्या एकूण सोळा कवितांचे हे संपादन आहे. जीवनविषयक आणि काव्यविषयक विविधांगी जाणिवांची दृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात पेरणाऱ्या या कविता प्रामुख्याने दीर्घरचनेच्या रूपबंधातून प्रत्ययास येतात. अभ्यासक्रमाच्या उद्देशाने सिद्ध झालेल्या पुस्तकाचा एक चांगला नमुना सदर पुस्तक प्रस्तुत करते.
– आशुतोष पाटील
भाग एक – निवडक सोळा कविता
1. देव अजब गारोडी! – बहिणाबाई चौधरी
2. तापीतीर – गणेश कुडे
3. ब्रोकन मेन – त्र्यंबक सपकाळे
4. मला हवी असणारी पहाट – प्रतिभा अहिरे
5. चल नांदायला ‘येडी’ – कृष्णा पाटील
6. ते दिवस आता कुठे – अरुण म्हात्रे
7. जलम – इंद्रजीत भालेराव
8. सोन्याबापू – संतोष पद्माकर पवार
9. दार उघड बये, दार ! – प्रज्ञा दया पवार
10. बाया पाण्याशीच बोलतात – अजय कांडर
11. दागिना – संजय चौधरी
12. दहशत – वर्जेश सोलंकी
13. म्होरकी – उषाकिरण आत्राम
14. आश्रमशाळेतून घरी जाताना – अनिल साबळे
15. म्हातारपणाकडे झुकलेल्या स्वातंत्र्याला – बालाजी नागटिळक
16. कचरा वेचणाऱ्या झिपऱ्या पोरी – सुदाम राठोड
भाग दोन – निवडक सोळा कविता : आशय आणि स्वरूप
1. कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कृषिजनसंस्कृती – डॉ.योगिता पाटील
2. कवी गणेश कुडे यांचे तापी माहात्म्य – डॉ.योगिता पाटील
3. विषमताधिष्ठ समाज रचनेचा आलेख रेखाटणारी कविता : ब्रोकन मेन – प्रा.ज्ञानेश्वर कांबळे
4. दलित चळवळीची मीमांसा करणारी कविता: मला हवी असणारी पहाट – प्रा.ज्ञानेश्वर कांबळे
5. विशुद्ध प्रेमाचे प्रतीक असलेली कविता : चल नांदायला ‘येडी’ – डॉ.संदीप माळी
6. अंतर्मनातील संवेदना व्यक्त करणारी अभिजात कविता : ते दिवस आता कुठे – डॉ.संदीप माळी
7. अंतर्मुख करणारी जन्मकथा : ‘जलम’ – डॉ.रमेश माने
8. भ्रष्ट व्यवस्थेविरोधातला एल्गार : सोन्याबापू – डॉ.रमेश माने
9. स्रियांच्या बदलत्या भूमिकेची ज्वलंत अभिव्यक्ती : दार उघड बये, दार! – प्रा.योगेश पाटील
10. दुष्काळाच्या विखारी झळाईत होरपळणाऱ्या स्त्रियांची करुण कहाणी : बाया पाण्याशीच बोलतात – प्रा.योगेश पाटील
11. माय आणि मुलीच्या नात्याची भावस्पर्शी कविता : दागिना – डॉ.योगेश महाले
12. महानगरातील भयप्रद जगण्याचे सूचन : दहशत – डॉ.योगेश महाले
13. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी कविता : म्होरकी – डॉ.विलास गावीत
14. शाळकरी मुलांचा करुणाभाव व्यक्त करणारी कविता : आश्रमशाळेतून घरी जातांना – डॉ.विलास गावीत
15. वंचितांच्या दु:खाचे रुदन : म्हातारपणाकडे झुकलेल्या स्वातंत्र्याला – डॉ.अक्षय घोरपडे
16. पारंपरिक मनोवृत्तीला दिलेला धक्का : कचरा वेचणाऱ्या झिपऱ्या पोरी – डॉ.अक्षय घोरपडे
भाग तीन – परिशिष्ट्ये
कविता : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये
संदर्भ ग्रंथसूची
कवींचा परिचय
कविता अभ्यासकांचा परिचय