काव्यतरंग
Authors:
ISBN:
₹60.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे जगण्याचे दृष्टीकोन असतात. व्यवस्थेबद्दल काही बोलताना कवीची कविता ही व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमधून वाचकांसमोर येत असते. कवीच्या काव्यातील जाणिवांचा अपरिहार्य भाग काव्यरुपाने रसिक वाचकांसमोर येत असतो. त्यातून कवीचे भावविश्व व एकंदर परिस्थितीचे आकलन होताना दिसते. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचे केवळ वर्णन न करता कवी आजच्या माणसासमोरचे जगण्याचे प्रश्न टोकदारपणे मांडताना दिसतात. वाड्या-वस्त्या, ग्रामीण, निमशहरी, शहरी या परिसरातील मानवी जीवनाचे जगण्याचे ताणे-बाणे, अंतर्गत व बाह्य संघर्ष, कवींच्या लेखणीतून अपरिहार्यपणे येतात. भावनांनी ओथंबलेल्या कवी मनाचे अविष्कार विविध विषयांना थेटपणे भिडतात.
नव्या कवींकडे असलेली सर्जनात्मक प्रतिभा मानवी समाजव्यवस्थेला आस्वादात्मक पातळीवर कशा प्रकारे आकृष्ट करते यावर त्या कवीच्या कवितेचे मूल्यमापन होते. या कसोटीवर खानदेशच्या कवींनी लिहिलेल्या कविता एक नव्या दिशेकडे नेणार्या आहेत हे निश्चित.
Kavyatarang