काव्यांकुर
Authors:
ISBN:
₹60.00
- DESCRIPTION
- INDEX
“…प्रीतिभावना, निसर्गजाणीव, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभावना ही मराठी कवितेतून सातत्याने आणि प्रत्ययकारीपणे आविष्कृत होणारी प्रधान आशयसूत्रे आहेत. त्यांचा आविष्कार करणार्या प्रातिनिधिक अशा निवडक कवितांचा समावेश सदर संपादनात केलेला आहे. अर्थातच या निवडीच्या केंद्रस्थानी कवी नसून कविता आहेत. विशिष्ट आशयसूत्र प्रभावीपणे व्यक्त करणारी प्रथितयश, प्रख्यात कवीची रचना असे या कवितांच्या निवडीमागील सूत्र आहे… कविता निवडताना त्या निरनिराळ्या कालखंडातील महत्त्वाच्या कवींच्या कविता असाव्यात याचे भान राखलेले आहे. एका प्रधान आशयसूत्राचे भिन्न भिन्न पैलू वा कंगोरे व्यक्त करणार्या कविता निवडाव्यात ही बाबही संपादन करताना आवर्जून लक्षात घेतलेली आहे… पदवीच्या प्रथम वर्षात शिकणार्या मुलांना कविता या साहित्यप्रकाराचा परिचय करुन देताना त्यांच्या भावनिक आणि वैचारिक विश्वाचे भरणपोषण करणार्या कविता या संपादनात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत… म्हणूनच कविता आणि जीवन या दोहोंची समज विकसित करणारे अंकुर विद्यार्थ्यांच्या मनातून फुलून यावेत ह्या अपेक्षेने हे संपादन सादर करीत आहोत…”
Kavyankur