किरकोळ विक्री व्यवस्थापन सिद्धांत आणि प्रक्रिया
Retail Management Principles and Process
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा छोटे भागच विक्री करीत असतो. किरकोळ विक्रेता घाऊक व्यापारी किंवा उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना पाहिजे त्या प्रमाणात हवी असलेली वस्तू उपलब्ध करवून देत असतो. किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक (उपभोक्ता) यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. सद्य:स्थितीत किरकोळ विक्री ही केवळ दुकानांद्वारेच केली जाते असे नव्हे, तर इंटरनेट, पोस्ट किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते व आधुनिक स्वरूप विचारात घेऊन सदरील पुस्तकात किरकोळ विक्री, विक्री व्यवस्था, विक्री पध्दती, विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, विक्रीचे अर्थशास्त्र, बाजारपेठेचे प्रभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उपभोक्ता वर्तणूक, विक्री विपणन मिश्र, मॉल व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक विचारप्रवाहात ग्राहकानंद, ई-रिटेलिंग अशा विविध विषय व तंत्र याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.
Kirkol Vikri Vyavasthapan Siddhant Aani Prakriya
- किरकोळ विक्री व्यवस्था : तोंड ओळख : किरकोळ विक्री – वैशिष्ट्ये; किरकोळ विक्री व्यवस्था – वैशिष्ट्ये; फरक, व्याप्ती; किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार – अ) फिरते किरकोळ विक्रेते ब) स्थायिक किंवा स्थिर किरकोळ विक्रेते किंवा व्यापारी; 1) विविध विभागीय किरकोळ विक्री दुकाने/एकछती किरकोळ विक्री दुकाने/केेंद्रधारक विक्रेते 2) साखळी पद्धतीची किरकोळ विक्री दुकाने/केंद्रधारक विक्रेते
- किरकोळ विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध : अ) किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायर्या ब) किरकोळ विक्री भांडाराचे स्थान – घटक, टप्पे; क) किरकोळ विक्री व्यवसाय नोंदविण्याची कायदेशीर कार्यपध्दत ड) किरकोळ विक्री भांडार रचना व आराखडा – 1) दुकानांतर्गत वस्तूंची मांडणी किवा रचना 2) दुकानाबाहेर वस्तूंची मांडणी किंवा रचना; आराखडा – घटक, प्रकार, जबाबदार्या
- किरकोळ विक्री व्यवस्थेतील बदलते प्रवाह : भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेची उत्क्रांती, सार्वजनिक वितरण व्यवस्था, जागतिक किरकोळ विक्री व्यवस्थेची सद्यस्थिती; भारतीय किरकोळ विक्री व्यवस्थेची सद्यस्थिती – भारतीय किरकोळ विक्री व्यवस्थेचे भवितव्य, भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेचा विकासातील आव्हाने/अडचणी, भारतीय किरकोळ विक्री क्षेत्रासंबंधी स्पर्धात्मक बलस्थानाची माहिती
- परंपरागत किरकोळ विक्री व्यवस्था : अ) असंघटीत किरकोळ विक्री क्षेत्र – फिरते किरकोळ व्यापारी – वैशिष्ट्ये, प्रकार; 1) फेरीवाले 2) बाजारातील व्यापारी 3) स्वस्त वस्तूंचे व्यापारी 4) रस्त्यावरील व्यापारी; ब) संघटीत किरकोळ विक्री क्षेत्र – 1) लहान विक्री केंद्र किंवा लहान दुकाने 2) सुपर मार्केट विक्री व्यवस्था किंवा (सुपर विक्री शॉप) 3) शॉपिंग मॉल्स विक्री व्यवस्था
- आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्था : अ) ई-व्यवसाय – अर्थ, विस्तार, आवश्यक साधने, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा ब) मोबाईल मार्केटिंग – वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा क) ई-शॉपिंग किंवा ई-खरेदी – कार्यपद्धत, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा ड) ई-किरकोळ विक्री व्यवस्था – आवश्यक उपकरणे आणि तंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व इलेक्ट्रॉनिक्स टेक्नालॉजी, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा
- किरकोळ विक्री व्यवस्थेचे अर्थशास्त्र : किरकोळ विक्री व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक, किरकोळ विक्री पर्यावरण म्हणजे काय?, किरकोळ विक्री पर्यावरणाची वैशिष्ट्ये, संघटीत किरकोळ विक्री व्यवस्था, बाजारपेठ प्रवेश; किरकोळ विक्री व्यवस्था पर्यावरण सिद्धान्त – अ) किरकोळ विक्री व्यवस्थेतील स्वाभाविक निवड सिद्धान्त – किरकोळ विक्री व्यवस्थेवर परिणाम करणारे प्रमुख पर्यावरणीय घटक