Prashant Publications

कृषी भूगोल

Geography of Agriculture

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228811
Marathi Title: Krushi Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

कृषी व्यवसाय हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आपल्या भारत देशाचा विकास संपूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिलेले नसून व्यापारी तत्त्वावर तिचा उपयोग होवू लागला आहे आणि म्हणून शेतीकडे ‘उद्योग’ म्हणून पाहण्यात येवू लागले. पूर्वी शेती पारंपारिक पद्धतीने केली जात होती त्यावेळी कृषीतून निघणारे उत्पन्न मर्यादित स्वरूपाचे होते. नंतर औद्योगिक क्रांतीने कृषीतंत्रज्ञान विकसित होऊन कृषी अवजारांमध्ये अमूलाग्र बदल घडून आले. याच बरोबर जादा उत्पादन देणार्‍या आणि सुधारित बी-बियाणांचा वापर करण्यात येऊ लागला. किटकनाशकांचा, तणनाशकांचा वापर होऊ लागला. सेंद्रीय व रासायनिक खतांचा उपयोग कृषी उत्पन्न वाढीसाठी होऊ लागला. या सर्व घटकांमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. अशा या व्यवसायाचा भौगोलिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे ‘कृषी भूगोल’ होय. या विषयात कृषीविषयक सर्व अंगांचा सखोल अभ्यास अंतर्भूत आहे. 18 व्या शतकापासून कृषी विषयक अभ्यासास चालना मिळाली. त्यापूर्वी सॉवर आणि व्हॉवीलाव्ह यांनी कृषी आणि पशुपालन या संबंधी अभ्यास केला. 18 व्या शतकामध्ये कृषीवर होणार्‍या प्राकृतिक घटकांचा परिणाम कृषी भूगोलात अभ्यासला गेला. कृषी भूगोलात या संबंधीचा अभ्यास त्या काळात केला गेला. 19 व्या शतकामध्ये विविध प्रदेशातील कृषी विषयक अभ्यास केला गेला. औद्योगिक क्रांतीच्या कालावधीत शेतीतही क्रांती झाली. हरितक्रांतीस चालना मिळाली. कृषीत झालेला बदल अभ्यासण्याचे कार्य 20 व्या शतकाच्या कृषी भूगोलाने केले. हवामान व शेती यासंदर्भातला अभ्यास कृषी भूगोलामध्ये केला गेला. मृदेची सुपिकता व मृदा उत्पादनक्षमतेचा अभ्यास अलिकडच्या कृषी भूगोलात समाविष्ट आहे. जलसिंचनाचा शेतीवर होणारा परिणाम कृषी भूगोलात अभ्यासला जात आहे. अशाप्रमाणे काळानुसार कृषी भूगोलाच्या स्वरूपात बदल होत आहेत. व हे बदल सतत होत राहणार आहेत. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप हे गतिमान बनले आहे.

Krushi Bhugol

  1. कृषी भूगोलशास्त्राचा परिचय : कृषी भुगोल शास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरुप, व्याप्ती आणि महत्त्व, विकास, कृषी भूगोलशास्त्राच्या अभ्यासपध्दती-पर्यावरणीय प्रादेशिक, वस्तुनिष्ठ व वर्तणुक.
  2. कृषीला प्रभावित करणारे घटक : प्राकृतिक घटक- भूरचना- उतार, उंची, हवामान- तापमान, धुके, बर्फ, आर्द्रता, दुष्काळ, वारे, बेमोसमी पाऊस, सूर्यप्रकाश, मृदा, आर्थिक व सामाजिक घटक – जमीनीचा आकार व तुकडीकरण, मजूर, भांडवल, यांत्रिकीकरण, वाहतूक सुविधा, बाजारपेठ, शासकीय धोरण.
  3. कृषीचे प्रकार : उदर निर्वाह व व्यापारी शेती, शेतीचे वैशिष्टये, क्षेत्र व समस्या. स्थलांतरित शेती, सखोल उदरनिर्वाह शेती. जैविक शेती, मळ्याची शेती, भारतीय कृषी- समस्या व उपाय.
  4. कृषी प्रादेशिकीकरण : कृषी प्रादेशिकीकरणाचा अर्थ व संकल्पना, कृषी प्रदेश निश्चित करण्याचे तंत्र- अनुभवाधिष्ठीत तंत्र, एक घटक तंत्र, बहुघटक तंत्र, संख्यात्मक व गुणात्मक तंत्र, भारतातील कृषी विभाग – रंधवा एम. एस. ने विकसित केलेले कृषी विभाग.
  5. कृषी विकास : कृषी विकासाचा अर्थ व व्याख्या, भारतात खालील घटकांचे कृषी विकासातील योगदान – हरित क्रांती – अर्थ व त्याचे भारतीय कृषीवरील प्रभाव, श्वेत क्रांती, उती संवर्धन, हरितगृह, निळी व पीत क्रांती, आधुनिक जलसिंचन पध्दती – ठिबक व तुषार पध्दत, शाश्वत कृषी विकास.
RELATED PRODUCTS
Prashant Publications
Shopping cart close