खानदेशचे मराठी साहित्य कथा आणि कथाकार
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
‘कथा’ हा आदिम साहित्यप्रकार आहे. शेकडो वर्षे मौखिक वाङ्मयात कथा जीवंत होती. भारतीय साहित्यात कवितेनंतर कथा हा वाङ्मयप्रकार मोठ्या प्रमाणात लिहिला गेला. मराठी साहित्यातही कथेला विशेष स्थान आहे. इंग्रजी वाङ्मयाच्या अनुकरणातून आलेल्या लिखित मराठी कथेला स्वतःचा चेहरा प्राप्त व्हायला बराच काळ जावा लागला.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांसारख्या कथाकारांनी मराठी कथेला लोकप्रियता मिळवून दिली. पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात नवकथाकार गंगाधर गाडगीळ, जी.ए. कुलकर्णी यांनी कथेचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी अशा साठोत्तरी कालखंडातल्या विविध प्रवाहातील तसेच नव्वदोत्तर कालखंडातील कितीतरी कथाकारांनी मराठी कथेला नवा आशय-विषय देत एक नवा आयाम प्राप्त करून दिला.
खानदेशातील कथाकारांचाही मराठी कथेला समृद्ध करण्यात खारीचा वाटा आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजतागायत मराठी कथा वाङ्मयात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या बारा कथाकारांच्या कथांचा हा ऐवज म्हणजे खानदेशी मराठी कथा वाङ्मयाचा आरसा आहे.
Khandeshche Marathi Sahitya : Katha & Kathakar
Related products
-
निवडक कथा
₹75.00