खानदेशातील दलित साहित्य
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
दलित साहित्यामध्ये कविता, कादंबरी, नाटक, जलसे या प्रकाराव्यतिरिक्त खानदेशी दलित साहित्यामध्ये वैचारिक लिखाणही झालेले दिसते. दलित साहित्याची थोरवी व दलित साहित्याची अटळ निर्मिती संदर्भात प्रा. सुषमा तायडे (अहिरे) आपल्या संशोधनांनी निष्कर्ष नोंदवतात, ‘दलित साहित्यातील अनुभवाची जी भूमी आहे. तिच्यावर अजून कोणी पाय ठेवला नव्हता तो प्रथम दलित साहित्यिकांनी ठेवला आहे. ह्या दाहक सामाजिक वास्तवाच्या रुपात काही बदल होत नाही. तोपर्यंत दलित साहित्याची निर्मिती अटळ व अपरिहार्य आहे. दलित साहित्य म्हणून जे लिहिले जाईल ते सर्व श्रेष्ठ साहित्य असे मी मानत नाही आणि कुणी तसे मानूही नाही पण एक मात्र निश्चित की मराठीला आंतरराष्ट्रीय दर्जा, मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी ही निखालसपणे दलित साहित्यिकांवर येऊन पडलेली आहे.’ संशोधनांती हा काढलेला निष्कर्ष तंतोतत तर्कसुसंगत, यथोचित असून दलित साहित्यिकांना ही मोठी जबाबदारी आता पेलायची आहे. हे मात्र निश्चित!
Khandeshatil Dalit Sahitya
- खानदेशातील दलित साहित्याची प्रेरणा प्रयोजन व स्वरुप
- खानदेशातील दलित कवींचा कवितांचा अभ्यास
- खानदेशातील दलित नाटक आणि जलशांचा विचार
- खानदेशातील दलित साहित्यिकांच्या दलित कथा
- खानदेशातील दलित कादंबरी लेखन
- खानदेशातील दलित वैचारिक संशोधनपर आणि संपादकीय लेखन
- खानदेशातील वृत्तपत्रकारिता