Prashant Publications

My Account

गुरु रविदास : जीवन आणि कार्य

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403277
Marathi Title: Guru Ravidas Jeevan ani Karya
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 294
Edition: First

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

ऐसा चाहूं राज मैं, जहाँ मिलै सबन कौं अन्न |
छोट-बड़ो सभ सम बसे, ‌‘रविदास’ रहैं प्रसन्न ॥

गुरु रविदासांनी मानवी मूल्यांची, समानतेची आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेची जोपासना करणारा वैचारिक लढा दिला. प्रचंड प्रतिभा, प्रभावी वाणी, संघटन कौशल्य, सामान्य जनतेविषयी आस्था, श्रद्धा, प्रेम, करुणा, बंधुत्व असे अष्टपैलू व्यक्तीमत्व गुरु रविदासांचे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानात आधुनिक काळातील उपयुक्त मुल्ये दिसून येतात. जसे की, कोणताही व्यक्ती त्याच्या जन्मामुळे लहान किंवा मोठा होत नाही तर त्याच्या कर्मामुळे होतो. एखाद्या व्यक्तीची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते. जर तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध असेल तर ईश्वर तुमच्या हृदयात वास करतो. सर्व मानव हे समान आहेत. मानवसेवा हिच खरी ईश्वरसेवा असून सत्याचा आग्रह धरला पाहिजे. जो माणूस सत्य बोलत नाही आणि जो विश्वासघात करतो त्याच्याबरोबर कोणताही व्यवहार ठेऊ नये. जोपर्यंत ही जात संपणार नाही, तोपर्यंत माणूस माणसाशी जोडला जाऊ शकत नाही. संपूर्ण सजीव सृष्टीसुद्धा एकाच घटकापासून (मातीपासून) बनलेली आहे व त्यांना बनवणाराही एकच असल्याने आपापसातील भेदभाव नष्ट केले पाहिजेत. जगात सर्वत्र अशी समाजव्यवस्था हवी की, सर्वांना पोटभर अन्न खायला मिळेल. जिथे लहान-मोठे, दीन-दलित, गरिब-श्रीमंत असा कुठलाही भेद असणार नाही. गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात मांडलेले विचार आजही उपयुक्त व विचार करायला लावणारे आहेत. म्हणूनच गुरु रविदासांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचा प्रपंच…

Guru Ravidas Jeevan ani Karya

  1. सामाजिक क्रांतीचे प्रणेते गुरु रविदास – बालाजी आर. गुरुडे
  2. सतमार्गाचे उपदेशक – गुरु रविदास – डॉ. केरबा कांबळे
  3. गुरु रविदास यांचे कालखंडातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती – डॉ. जितेश नारायण चव्हाण
  4. गुरु रविदासांचे मानवतावादी आणि सामाजिक विचार – संतोष यादव कोळी, डॉ. पंकजकुमार शांताराम नन्नवरे
  5. गुरु रविदासांची वैचारिक पार्श्वभूमी व त्यांचे विचार – डॉ. सुलभा उल्हास पाटील
  6. गुरु रविदास – जी. एस. कुचेकर पाटील
  7. गुरु रविदास यांचे दोह्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन – डॉ. सिंधू परसराम खंदारे
  8. गुरु रविदासांची विचारधारा आणि भारतीय समाज – डॉ. बालाजी मारूती गव्हाळे
  9. समतेचे आद्यप्रवर्तक! गुरु रविदास – डॉ. अशोक पुंडलिक सैंदाणे
  10. प्रस्थापित समाज व्यवस्थेला सुरुंग लावणारे – गुरु रविदास – जयसिंग वाघ
  11. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – गुरू रविदास – श्री. बालाजी रा. साबळे
  12. युगप्रवर्तक संतशिरोमणी हरिभक्त – गुरु रविदास – डॉ. दशरथ ठवाळ
  13. गुरु रविदासांचे तत्वज्ञान – डॉ. हणमंत महादेव लोंढे
  14. गुरु रविदासांच्या विचारातील जीवन मूल्य – डॉ. तुषार मधुकर माळी
  15. गुरु रविदास यांच्या समाज प्रबोधनाची सद्यस्थितीला आवश्यकता : चिकित्सक अभ्यास – डॉ. दीपा अनिल पाटील
  16. समतावादी विचाराचे प्रणेते : गुरु रविदास – प्रो. डॉ. रामदास वनारे, डॉ. पुंजाराम भगोरे
  17. ध्रुव तारा गुरु रविदास व सामाजिक अभिसरणे – इंजि. भाऊसाहेब नेवरेकर
  18. मानवी कल्याणाचा विचार मांडणारे थोर क्रांतीकारक गुरु रविदास – डॉ. सखाराम वाघमारे
  19. गुरु रविदासांच्या कवितेतील मानवतावाद – डॉ. एस. एल. बिऱ्हाडे
  20. क्रांतीकारी विचारवंत गुरु रविदास! – एस. टी. सोनुले
  21. विद्रोही गुरु रविदास… – डॉ. तोलमारे एस.एस.
  22. क्रांतीकारी विचारवंत : गुरु रविदास – ह.भ.प. तुळशीराम राजाराम गवई
  23. गुरु रविदास आणि त्यांच्या विचारांचे विश्लेषणाचा अभ्यास – डॉ. घोडके जितेंद्र विठ्ठलराव
  24. क्रांतिकारी गुरु रविदासांचे मानवतावादी, समतावादी, परिवर्तनवादी व विज्ञानवादी विचार : आजच्या काळाची गरज – श्री. दिपक धोंडीराम भगुरे
  25. गुरु रविदासांचे मानवतावादी विचार – प्रा. डॉ. नागोराव के. सोरे
  26. गुरु रविदास – प्रा. गौतम निकम
  27. गुरु रविदास यांचे समतावादी विचार : काळाची गरज – डॉ. अशोक कोलंबीकर
  28. गुरु रविदास यांचे जीवन कार्य – एक अभ्यास – डॉ. चंद्रशेखर एन. मोहोड
  29. गुरु रविदास व आजचा चर्मकार समाज – डॉ. प्रकाश विठोबा राजगुरू
  30. ज्ञानाचा सागर गुरु रविदास – बळीराम मारूती सुर्यवंशी (आळवाईकर)
  31. थोर क्रांतीकारक : गुरु रविदास – डॉ. विजय म. घुबळे
  32. गुरु रविदासांची विचारधारा – दर्शना पवार
  33. क्रांतिकारी व मानवतावादी : गुरु रविदास – डॉ. सतीश मस्के
  34. क्रांतिकारी सामाजिक विचारवंत : गुरु रविदास – किशोर भारत शिंदे
  35. गुरु रविदास महाराज यांचे जीवन कार्य – डॉ. विणकर विजय नागोजी
  36. अंधश्रद्धा निर्मूलनात गुरु रविदासांची भूमिका – डॉ. सुनंदा रेवसे
  37. गुरु रविदास : मानवतावादी बुद्धीमान संत – डॉ. अशोक शहाजी भालेराव
  38. गुरु रविदास एक महान समाजसुधारक – डॉ. दिपक सुभाष वाघमारे
  39. गुरु रविदासांचा मानवधर्म – डॉ. रमेश के. शेंडे
  40. गुरु रविदास : कर्मयोगी, निधर्मी व भक्तीचा महिमा – डॉ. मीना लाहनु आहेर
  41. सतगुरु रविदासांच्या साहित्यातील सौंदर्य – डॉ. शंकर रामप्रसादजी चांदेकर
  42. गुरु रविदास यांचा सामाजिक दृष्टिकोन – डॉ. अंगद किशनराव चित्ते
  43. गुरु रविदासांच्या विचारांचे आधुनिक काळातील उपयोजन – डॉ. नामदेव व्ही. तेलोरे
  44. समतावादी महामानव : गुरु रविदास – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
  45. गुरु रविदास यांच्या विचारांची प्रासंगिकता – प्रा. डॉ. सचिन कारभारी जाधव
  46. मैं रविदासिया – डॉ. संजू कौतिक भटकर
  47. गुरू रविदास यांचा मानवी हक्कासाठी संघर्ष – एस. एस. अहिरे
  48. थोर महापुरुषांनी गुरु रविदासांबद्दल काढलेले गौरवोद्गगार – गणेश कांबळे, श्रीमती सरोज बिसुरे
  49. गुरु रविदासांचे जीवन कार्य – डॉ. देविदास विक्रम हारगिले
  50. क्रांतिकारी विचारवंत : गुरु रविदास – डॉ. दयाराम पवार, श्रीमती रेणूका चव्हाण
  51. सर्वधर्मसमभाव शिकवणारे गुरु रविदास – डॉ. किरण सहादु खैरनार
  52. गुरू रविदासांच्या विचारांचे शैक्षणिक उपयोजन – डॉ. संतोष खिराडे
RELATED PRODUCTS
You're viewing: गुरु रविदास : जीवन आणि कार्य 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close